मालकी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

या रणरणत्या उन्हात,
दूरवरुन हे झाड खुणावत होतं तसं
किती तरी काळ..
'हो' 'नाही' म्हणता म्हणता
मी पोचतेच आहे इथे..
मोठा दिमाखदार वृक्ष.. डेरेदार
चहूबाजूंनी बहरलेला हिरवागार....
जरा टेकावं म्हणलं सावलीत....
की घट्ट मिठीच मारावी या जिवलगाला....?
इतक्या वेळ लक्ष न गेलेल्या भल्या मोठ्या कुंपणाकडे
आत्ता कुठे लक्ष गेलंय माझं
कुंपण ओरडून सांगतंय...
"सावलीवरही झाडाच्या मालकाचा मालकी हक्क आहे.."
आपल्या मालकीच्या उन्हात चालण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं

प्रकार: 

छान..

"सावलीवरही झाडाच्या मालकाचा मालकी हक्क आहे.."
आपल्या मालकीच्या उन्हात चालण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं>>> सुरेख. Happy

आपल्या मालकीच्या उन्हात चालण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं >> ये ब्बात! Happy
मस्त लिहीते आहेस मीनू.

धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल. बर्‍याच दिवसांनी लिहीताना खात्री नव्हती काही बरं उमटेल याची. तुमचे प्रतिसाद पाहून धीर आलाय. Happy

बर्‍याच दिवसांनी लिहीताना खात्री नव्हती काही बरं उमटेल याची. तुमचे प्रतिसाद पाहून धीर आलाय>>> आम्हालाही बर्‍याच दिवसांनी तुझं काही एकगठ्ठा वाचायला मिळतय आज Happy

मस्त! पोहोचलं Happy

आपल्या मालकीच्या उन्हात चालण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं>>>सौ बात की एक बात Happy लगे रहो...चांगल लिहितेयस