दशकपूर्तीच्या निमित्ताने - ६ ("मंडळ आभारी आहे")
मंडळ आभारी आहे...
दशकपूर्तीनिमित्त लिहिलेले वरचे लेख ज्यांनी वाचले, प्रतिसाद दिले, मते कळवली त्या सर्व मायबोलीकरांचे आभार. इतके वेगवेगळे अनुभव जमतील असे व्यापक व्यासपीठ आणि उपक्रमांत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि प्रशसनाचे आभार. असे काही लिहिण्याची कल्पना जेव्हा मी काहींना बोलून दाखवली तेव्हा त्या सर्वांनीच याला पाठिंबा दिला. "यातून काहीतरी चांगलेही व्हायचे तर होईल" (LOL) असेही कोणी म्हटले. त्याबद्दल कल्पना नाही, पण काही नव्यांना जुन्या मायबोलीबद्दल माहिती मिळाली असेल. मायबोलीकरांच्या भेटीगाठी, गटग कशी होतात, काही उपक्रम आणि त्याचे संयोजन याबद्दल कल्पना आली असेल. अगदीच काही नाही तर पार्ल्याचा पत्ता तरी मिळाला असेल!
मला माहीत आहे या लेखनात घटनाक्रम पुढेमागे झाले असण्याची शक्यता आहे, काही तपशील राहून गेले असतील. काहींची नावे राहून गेली आहेत. तरी ही मालिका लिहिताना, सगळं आठवताना मजा आली. काही गोष्टी लक्षात होत्या, काही जुन्यात शोधल्या. संदर्भ तपासताना नवीनच माहितीही हाती लागली... माझे मायबोलीवरचे प्रोफाईल आज सदस्यत्वाचा काळ "१० वर्षं ३ दिवस" दाखवते आहे. दशकपूर्ती झाली आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे कल्लोळाहून आल्यानंतरचा हा शेवटचा भाग.
तसं बरंच काही लिहायचं मनात होतं. "दशकपूर्ती म्हणजे दहा लेख हवेत", "पुढच्या लेखात मायबोलीवरच्या काही खटकलेल्या गोष्टी, किंवा भविष्यातली मायबोली याबद्दल काही लिहाल का" अश्या काही मागण्या/विनंत्या येत होत्या. "खटकलेल्या" म्हणण्यापेक्षा "या गोष्टी अश्या असत्या तर जास्त आवडलं असतं" या भाषेत (म्हणजे न खटकणार्या ) काही लिहावं असा विचार आला पण त्या गोष्टी ज्या त्या वेळी संबंधितांना माझ्याकडून सांगितल्या गेल्या आहेतच. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या पसंतीने होईलच असे नाही तेव्हा कधी त्यात बदल झाले, कधी झाले नाहीत.
भविष्यातल्या मायबोलीबद्दल काय बोलावे? फक्त माझा अजून फक्त दहा वर्षांच्या विचार केला तरी सांगता येणार नाही. मला जोवर यावेसे वाटते, आनंद मिळतो तोवर मी येत राहीन. "स्वतःला मिळणारा आनंद" हा निव्वळ स्वार्थी विचार बराचसा इथे येण्यामागे आणि लष्कराच्या भाकर्या भाजण्यामागे आहे. पण तो महत्त्वाचा आहे. पुनःपुन्हा इथे येण्यामागे आणि भाकर्या भाजण्यामागे तीच प्रेरणा आहे. यामुळे निगेटिव्ह विचार आपोआप बाजूला रहातात किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळते आणि ते कामाच्या आड येत नाहीत.
चालू घडामोडींकडे बघता एक मात्र वाटते की नजिकच्या भविष्यकाळात प्रत्येक मायबोलीकर कधी ना कधी कुठेतरी तुरुंगवास भोगून येणार! कानून के हाथ लंबे होते हैं! कुठल्यातरी देशातल्या कायद्याचा कुठेतरी बसून भंग केल्याने ते तुम्हाला उचलून त्या देशातल्या तुरुंगात टाकतील. एका वेळी कुठल्यातरी देशाच्या तुरुंगात (एकाच ठिकाणी) अनेक मायबोलीकर असतील त्यांचे "तुरुंग गटग" पण होऊ शकेल. म्हणजे "पुण्यातील बंगू गटग" सारखे "तिहारमधील एन्जे एवेएठी" किंवा "फ्रान्सच्या कारावासातील कल्लोळ". एरवी ड्रेस कोड कोणी पाळत नाही तो इथे आपोआप पाळला जाईल पण मेन्यूची फारशी अपेक्षा ठेवता येणार नाही. याचेही वृत्तांत येतील. "तुमच्यापेक्षा आमचे चांगले", "आम्ही पैले" वगैरे नेहमीचे टोले असतीलच. पण अश्या तुरुंग गटगमध्ये एकत्र असणारे लोक एकाच कारणासाठी, तत्त्वासाठी एकत्र आले असल्याने तेच खरे कंपू म्हणून ओळखले जातील.
दुसरं असं की बरेचसे लेखक/लेखिका 'माहेरी' निघून गेल्यामुळे (किंवा प्रताधिकार उल्लंघनासाठी 'आत' गेल्यामुळे) गुलमोहोरावर अगदीच तुरळक असतील (हे चांगले की वाईट माहीत नाही). "लग्नसंस्थेला रिटायर करा" असे आवाहन (आव्हान) झक्कींनी दिल्यामुळे भविष्यातील मायबोलीवरच्या "कोतबो" ची कल्पना येईल (खरं तर कल्पना करवत नाही हो!) मायबोलीचं सरासरी वय (म्हणजे मायबोलीकरांचं) मात्र वाढत चाललंय असं वाटतंय. माझ्याकडे काही आकडेवारी उपलब्ध नाही (हह?).
असो. 'जे जे होईल ते पहात रहावे..' एवढे लिहून मी माझी ही मालिका संपवते.
धन्यवाद.
शर्मिला, तुझा विपु बंद
शर्मिला,
तुझा विपु बंद केलायस. कुठे आणि कसं कॉन्टॅक्ट करायच?
शरद
शरद, तुम्हाला संपर्कातून मेल
शरद, तुम्हाला संपर्कातून मेल करत आहे.
लालू... मस्त लिहीलं आहेस.
लालू... मस्त लिहीलं आहेस. तुझ्यामुळे जुन्या माबोच्या आठवणी ताज्या झाल्या आणि या लेखाच्या निमित्ताने मला मी लिहीलेले AMBA चे जुने वृत्तांत पण सापडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
बापरे.... मला जवळ जवळ १२
बापरे.... मला जवळ जवळ १२ वर्षे होत आहेत आता मा बो वर. हे लेख दीड दोन वर्षांपूर्वी आलेले दिसताहेत मी पाहिलेच नव्हते. अर्थात माझा माबो वरचा वावर जवळ जवळ थाम्ब्लाच होता/आहे. एखाद्या संदर्भापुरते येणे होते. झक्की 'आहेत 'का अजून ? लालू तुला बरेच संगतवार आठवते आहे.. त्या मिंग्लिशचा मला खूप राग येई . त्यामुळे मी ते बन्द करण्याचा आग्रह करीत असे. पण मी नवीन असल्याने व जुन्या लोकांचा कम्पू असल्याने सगळेच मला 'हुडुत 'करीत.( अजूनही करतात :))
मिंग्लिशचा एक वेगळा बीबी होता
मिंग्लिशचा एक वेगळा बीबी होता ना? त्यात "I understand" साठी "I खालीउभाराहीलो" अश्या पद्धतीने बोलायचे लोक?
नाही इतके दयनीय नव्हते
नाही इतके दयनीय नव्हते भाषान्तर. storvi या आय डीला गोदामव्ही म्हनणे असे प्रकार चालत.
एक त्रिअक्षरी आय डी जो
एक त्रिअक्षरी आय डी जो मॉडरेटरही होता तो चक्क 'प्रचारक' ही होता.आणि तो गांधीवादी आय डीना आठवणीने 'समज' द्यायचा
(No subject)
Pages