Submitted by अ. अ. जोशी on 27 April, 2011 - 04:08
क्षितिजावर चमकलेली किनार
भेदून जाईल आरपार
या कल्पनेनेच चमकलेले मन
आठवत होते नेहमीचे क्षण...
रोज येतात दु:खे
सोनेरी किरणांना धरून
मी दिसण्याची वाट पहात
तिथेच, दारापाशी असतात बसून...
आतूर असतात कधीची
मला बिलगण्यासाठी....
रात्रीच्या सुखांचा पडदा बाजूला सारून
मीही जातो दार उघडण्यासाठी....
दार उघडताच दिसते
आसुसलेले दु:ख त्यांचे...
आणि घेतो मनातच हसून
दिवसातले... शेवटचे..!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सही!
सही!
खूप छान !!
खूप छान !!
आणि घेतो मनातच
आणि घेतो मनातच हसून
दिवसातले... शेवटचे..!>>> उत्तम ओळी! अभिनंदन!
-'बेफिकीर'!
छान ! आवडली..
छान !
आवडली..
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
रात्रीच्या सुखांचा पडदा
रात्रीच्या सुखांचा पडदा बाजूला सारून
मीही जातो दार उघडण्यासाठी....>>>>>>>>
छान
सर्व वाचकांस धन्यवाद!
सर्व वाचकांस धन्यवाद!