पाणीपुरी , भेळपुरी, रगडा पॅटीस , वडापाव इत्यादीच्या चटण्या

Submitted by मेधा on 7 April, 2011 - 20:51

पाणीपुरी, भेळेच्या चटण्या, दाबेलीचा मसाला , वडापावची चटणी यांच्या कृतींसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाणीपुरीच तिखट पाणी घरीच करते मसाल्याशिवाय बरेचदा.
जीरे भाजून (मस्ट) बारीक करायचे. पुदीना, हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर छान वाटुन घ्यावे. यात जीर्याची पुड, काळे मीठ(पादेलोण) आणि एक लिंबाचा रस , अगदी थंड पाणी (बर्फच घालावा) घालुन मिक्स करावे. चव बघून साधे मीठ हवे असेल तर घालावे.
आता या तिखट पाण्यात २ डाव गोड पाणी घालावे.
अतिशय सुरेख पाणीपुरी चे तिखट पाणी होते. मसाला नसला तरी चालते. तरला दलाल च्या साईट वर ही मेथड वाचलेली.
मसाला घालून तिखट पाणी केले तरी त्यात एक लिंबाचा रस आणि गोड पाण्याचे दोन डाव घालूनच करते मी पाणी. बघा करून . अप्रतिम चव लागते.
नंतर नेहमी प्रमाने तिखट आणि गोड पाणी सेपरेट ठेवूनच पाणीपुरी द्यायची.

अरे मी २०११ मधे वडापावच्या चटणीची रेसीपी विचारली होती. अजुनही मला गाडीवर मिळते तशी चट्णी कशी बनवायची ते जमल नाहीये Lol टाकणार का कोणी प्लिज?

अदिती,
नवर्‍याने इं. ग्रो. मधून कोल्हापुरी ठेचाचे पाकिट आणले होते. ते संप्वायला प्रयोग केला तो जमला तेव्हापासून मी ब.वड्यासाठी तशीच चटणी करते.
१ - १ १/२ चमचा ठेचा, सुके खोबरे आणि बाळ भजी असे मिक्सर मधून काढते. मस्त होते चटणी.

>>
या काही काही बायका ना नुस्त्या दीप दीप करत बसतात जिथे तिथे>> हो ना, जसं काही कमिशनच मिळतंय. Wink
अदिति, लसणीची चटणी का? (घरी का करा? दीपची घेऊन या लसूण चटणी. बेष्ट आहे)

सीमा, फ्रोझन चटणी त्यातल्या त्यात वासरांत लंगडी गाय शहाणी पण मला सगळ्या बॉटल्ड् चटण्यांनां अ‍ॅडिटिव्हज् चा वास येतो, चव लागते आणि त्यांचे रंगही कृत्रिम दिसतात ..

आमच्या इंग्रो मध्ये एक वडापाव चटणी (याच नावाने) मिळते. ब्रँड आठवत नाहीये पण एव्हरेस्ट, बादशाह मसाल्याची पॅकेट्स असतात त्या टाईपच्या पॅकेटमध्ये असते. बरी वाटली चव.

अदिती,
खारी बुंदीही चालावी. मी अर्धा कप खोबरे किस आणि साधारण पाव कप बाळ भजी घेते. तिखट जास्त हवे असेल तर ठेचा वाढवायचा.

सीमा, फ्रोझन चटणी त्यातल्या त्यात वासरांत लंगडी गाय शहाणी पण मला सगळ्या बॉटल्ड् चटण्यांनां अ‍ॅडिटिव्हज् चा वास येतो, चव लागते आणि त्यांचे रंगही कृत्रिम दिसतात .. >>>>> अगदी अगदी !!
त्यातल्या त्यात दीप ला कमी वास येतो. एकदम फ्रेश चव हवी असेल तर घरी करण्याला पर्याय नाही.

या सर्व चटण्या चिंच, आमचूर पावडर न घालता करता येतील का? आणि येत असतील तर कशा करायच्या हे प्लीज कुणी सांगू शकाल का?

अदिती,
बाळ भजी खास वेगळी करायची गरज नाही.
बटाटावड्याचे कव्हर करायला जे सारण तयार केलेले असते तेच थेंब थेंब तेलात टाकून तळून घ्यायचे.
अ‍ॅक्च्यूअली बटाटे वडे गोलच करताना आजूवाजूला जे एक्स्टेन्सन आलेले (अमिबाचे पाय)तोडून टाकायचे .ते घालायचे मिक्सरात.

.

Pages