एक सुखद पाऊस

Submitted by भानुप्रिया on 6 April, 2011 - 09:18

अनुभवलीच नाही मी कधी..
पाऊसओली काळीभोर माती..
अन् गावासालीही नाहीत मला कधी..
त्यात भिजलेली नाती..

माझ्या प्राक्तनात नव्हतंच कधी
बरसणाऱ्या सरींमध्ये मनाचं हरवणं..
उधळलेल्या वाऱ्याबरोबर
मुक्त बेभान वावरणं..

माझं प्राक्तन होतं
फक्त गुरफटून राहणं..

गुरफटून राहणं,
माणुसकी हरवलेल्या
माणसांच्या’ जंगलात..
इथे माझं श्वास कोंडलेला..

थिजलेलाच राहिला..
माणूस’ नावाच्या मुखवट्यांकडे पाठ फिरवून
श्वासही मग निघून गेला..

त्याच्याविना निश्चल मी’
त्याच जंगलात..
एक सुखद पाऊस अनुभवत..
भिजत राहिले..

गुलमोहर: