माझ्या वडीलांच्या कविता (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 April, 2011 - 12:45

माझे वडील शेतकरी कम सर्विस करणारे आहेत. शेती सांभाळण्यासाठी त्यानी कायमची नाईट शिफ्ट स्विकारली होती. लेख, कविता लिहीण्याचा त्यांना पहिल्यापासुन छंद होता. पण सर्विसच्या तारेवरच्या कसरतिवर त्यांना वेळ मिळाला नव्हता. पण काही वर्षापुर्वी प्रिमियरची व्हॉलेंटरी रिटायरमेंट निघाली त्यात वडीलांनी ती स्विकारली. आता त्यांना कविता करण्याचा छंद जोपासता येत आहे. मधुन मधुन काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तसेच मासिकांमध्ये त्यांचे लेखन छापुन येते. काही मित्रांनी त्यांना आता कविता संग्रह छापण्याचा आग्रह केला आहे. त्या कविता टाईप करण्यासाठी त्यानी माझ्याइथे दिल्या आहेत. त्या मी तुमच्यापुढे सादर करत आहे.

कविता लिहीण्यापुर्वी त्यांनी वाचकांना व इश्वरचरणी कवितारुपात प्रार्थना केली आहे:

१) प्रारंभ

सुचली म्हणून मी कविता लिहावी
अपेक्षा वाचकांसी सहन व्हावी
पिकात जशी बेणणी ऊगावी
प्रतिभा न माझी तशी ठरावी !!१!!

कल्पना विस्तारी जे खत-पाणी
जरुर ते देण्या बुध्दी असावी
आकार योग्य आणि योग्य वजनी
शब्द नी शब्दांची ठेवण असावी !!२!!

कडव कडव्यातून रंगत असावी
गीताची रचना सहज सोपी व्हावी
आरंभ करीता स्फुर्ती असावी
प्रार्थना ईश्वरा कर यशस्वी !!३!!

२) सुस्वागतम

सडे पांघरूनी प्रभाती फुलांचे
सुस्वागतम सुर्य किरणांनो तुमचे
आगमन तुमचे आरोग्य संपदाचे
चैतन्यमय होऊनी विश्व नाचे !!१!!

आम्हा स्पर्श हे थोर ऊपकार तुमचे
वंदीती पशू-पक्षी-प्राणी भक्ती भरे
नमती तुम्हां वृक्ष, डोंगर जलचरे
सुस्वागतम सुर्य किरणानो तुमचे !!२!!

तुम्हा दर्शता सृष्टी प्रसन्न नाचे
तुम्हा चुंबण्य अधीर होती वनचरे
गतीचक्र कार्य दश दिशांना फिरे
सुस्वागतम सुर्यकिरणानो तुमचे !!३!!

तुम्हा स्पर्शीता मंदिरी कळस चमके
तुम्हा वंदण्या नम्र कलीका नी पुण्ये
चरणधुत तुमचे जल वाहून ओढे
सुस्वागतम सुर्यकिरणानो तुमचे !!४!!

३) अ..अ..आई

अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

झुंजु मुंजु झाल तांबड फुटल
वाही झाडा पाणी पाट झुळझुळ
सुस्वरान गाई भुपाळी कोकीळ
घुमे घंटा नांदी उघडे देऊळ
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

क..क.. काऊ कावळ्यांची शाळा
सारे रांगेतुन झाडावर गोळा
क..का.कि..की बाराखडी कर्कष्ष गळा
ऐकूनिया घोकंपट्टी बसे कानठळा
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

ग..ग.. गंमत सकाळी सकाळी
गोठ्यात हम्माला कालवड झाली
काळ्या हम्माची गोरी ग गोजीरी
काठोकाठ कळशी दुधाने भरली
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

च.. च.. चिऊ, चिमण्यांचा थवा
पंखांनी अंगणी घालतात हवा
पहाटेचा वारा जाणावी गारवा
पेरूच्या डहाळी पोपट हिरवा
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

शिवारात हिरवा गार गार मळा
सुगंध फुलांचा, पानें सळ सळा
ऐटीत बदक भेटून म्हणतो मला
गुड मॉर्निंग बाळा जातो मी शाळेला
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

ट..ट.. टॉमी बोले ए.बी.सी.डी.
ख..ख.. खट्याळ मनी खोड खोडी
पाहुन उंदराची उडे घाबरगुंडी
फांदीवरुन फांदीवर खार माई उडी
अ..अ..आई, म..म.. मला
जाग आली तेंव्हा कोंबडा आरवला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुतै, सर्व प्रथम तुमच्या "वड्लांना माझा नमस्कार". Happy
(नुसतं वाचु नकोस जागुतै त्यांना सांग हे)

कविता छान आहे, खुप आवडली Happy

प्रार्थना तर अप्रतिम..

कल्पना विस्तारी जे खत-पाणी
जरुर ते देण्या बुध्दी असावी
आकार योग्य आणि योग्य वजनी
शब्द नी शब्दांची ठेवण असावी !!२!!>>> अहाहा...मस्त..., तशी संपुर्णच अर्थपुर्ण आहे. Happy

*ती ३ नं ची कविता 'बालकवितांमध्येही' टाक.

प्रार्थना खूप आवडली.
त्यांना माझाही नमस्कार.
या कविता पुस्तकरुपाने प्रसिद्ध करायच्य आहेत तर इथे सर्वच नाही द्यायच्या बरं !!

तुमचे प्रतिसाद मी प्रत्यक्श वडीला.न्ना दाखवले चातक. त्या.न्ना हा अनुभव नविन असल्याने आन.न्द झाला.

दिनेशदा तुमचा सल्ला योग्य आहे. मी आता
टाईपच करुन देईन त्या.न्ना नुसत्या.