सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================
To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta
To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta
बर, हा गणु कोण ?
बर, हा गणु कोण ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे
सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे कि BCCI भारताला representच करत नाहि. सचिन BCCI साठी खेळतो. त्यामुळे जो खेळाडु भारतासाठी खेळतच नाहि त्याला कसले भारतरत्न देताय ? >>
१) ध्यानचंद स्वातंत्रपूर्व काळात खेळले होते. सैन्यामध्ये होते ते सैन्य ब्रिटीश सत्तेच्या अमलाखाली होते. तीन ऑलिम्पिक खेळले त्यावेळी भारत ब्रिटीश अधिपत्याखाली होता.
२) अमर्त्य सेन जन्माने भारतीय असण्याव्यातिरिक्त त्यांचे भारतासाठी काय योगदान आहे?
३) मंडेला यांचा (गांधीजींचा अनुयायी असण्याखेरीज) भारतासाठी काय योगदान होते?
४) सत्यजित रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक हिंदी चित्रपट बनवला आहे. बाकी सारे बंगाली होते. यात भारतासाठीचे काय योगदान आहे. (त्यांच्याऐवजी दादासाहेब फाळके यांना नको मिलालायला हवा होता?)
५) राजीव गांधी आणि सरदार पटेल यांना एकाच वर्षी मिळण्यामागे काय गुपित असावे? सरदारांना तो कित्येक वर्षे आधीच नवता का मिळायला पाहिजे?
सुभाष बाबुना त्यांच्या मृत्यूचा दाखला नसल्यामुळे जाहीर केलेला पुरस्कार मागे घेण्यात आला. तेव्हा कोणीही आवाज उठवला नाही. आता कोणाला मिलो ना मिलो त्यासाठी काय झगडा चालू आहे? पुरस्कार मिळण्यासाठी मरणाचा दाखला द्यावा लागण्यायेवढी पातळी खाली उतरली आहे. कार्याचा गौरव हा खरोखर ह्या पुरस्काराचा हेतू राहिला आहे का? शिवाय भारतरत्न हे मतदान घेवून दिले जात नाही. त्यामुळे
घ्या आणि हा वाद संपवा.
नितीन तुमच्या सारखेच प्रश्न
नितीन तुमच्या सारखेच प्रश्न मला पण आले होते... एम जी रामचंद्रन हे नांव राहिले. बहुतेक ह्या निवडक पुरस्कार देण्यामागे बराचसा राजकीय भाग होता... हे सर्व पुरस्कार निव्वळ कार्य बघुन दिले गेलेले नाही आहे.
अ) १९५६ मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांना भारतरत्न १९९० मधे मिळाले. आता १९५६ ते १९९० पर्यंत सरकार झोपले होते कां?
ब) सरदार पटेल १९५० मधे गेले, त्यांना पुरस्कार १९९१ म्हणजे मृत्युनंतर ४१ वर्षांनी मधे मिळाला.
या दोन्ही घटनेत किती अक्षम्य दिरंगाई?
क) सुभाष बाबू - त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहिर झाला होता. ते गेले याला पुरावा नाही, मग तांत्रिक मुद्दा पुढे येतो. ते गेलेलेच नाही, त्याला सबळ असा पुरावाही नाही मग मरणोत्तर कसे म्हणता येईल. येथे त्यांच्या निकटवर्तियांनी पुरस्कार नाकारलेला आहे हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
मागच्या चुका मान्य केल्या तरिही भारत सरकारच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे सचिन तेंडुलकर भारतरत्नासाठी अपात्र आहे हे सहज लक्षात येते. आता अपात्र आहे म्हणुन त्याला मिळणारच नाही असे नाही. त्यामुळे भक्त मंडळींनी खुप काळजी करायचे कारण नाही :स्मित:.
माझी सचिनबद्दलची मते मी आधीच
माझी सचिनबद्दलची मते मी आधीच लिहीलेली आहेत, ती आता पुन्हा येथे लिहीत नाही.
आता याच्याशी संबंधित पण जरा वेगळा प्रश्न - भारतरत्नाच्या पात्रतेसाठी असलेल्या निकषांत क्रीडा क्षेत्र का नसावे? फक्त देशसेवेबद्दल असते तर कला क्षेत्र ही त्यात कसे? कला आणि क्रीडा हे दोन्ही साधारण सारख्याच महत्त्वाचे समजले जाते.
(बाकी सुभाषबाबूंबद्दल फक्त "मरणोत्तर" असावे का एवढाच वाद असायला हवा होता, त्याने पुरस्कारच वादात का गेला?)
येथे त्यांच्या निकटवर्तियांनी
येथे त्यांच्या निकटवर्तियांनी पुरस्कार नाकारलेला आहे हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.>>> हे माहित होते पण कुठे रेफरन्स मिळत नव्हता. त्यांच्या मुलीने, अनिता बोस (?) हा पुरस्कार स्विकारणार नाही असे कुठेतरी खुप पुर्वी वाचल्याचे आठवते...
मागच्या चुका मान्य केल्या तरिही भारत सरकारच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे सचिन तेंडुलकर भारतरत्नासाठी अपात्र आहे हे सहज लक्षात येते. आता अपात्र आहे म्हणुन त्याला मिळणारच नाही असे नाही. >>>>>
हे मात्र जगात भारी
अवांतर... सुभाषबाबुना
अवांतर... सुभाषबाबुना पुरस्कार देताना काँग्रेसच्या काही नतद्रष्ट मंडळीनी विरोध केला होता..तेंव्हा मिडीया सुद्धा आजच्या एवढा घरोघरी पोहोचला न्हवता.. काही पुढार्यानी मग ही तांत्रीक बाजु पुढे केली.. तेंव्हा वैतागुन सुभाषबाबुंच्या निकटवर्तीयानी सुद्धा एवढा विरोध असेल तर हा पुरस्कार नको असे सांगीतले होते.. थोडे दिवसात सर्व लोक हा वाद विसरुन गेले .. जसे आज सुभाषबाबुना विसरले आहेत.:(
>>> भारत सरकारच्या संकेत
>>> भारत सरकारच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे सचिन तेंडुलकर भारतरत्नासाठी अपात्र आहे हे सहज लक्षात येते.
भारतरत्न पुरस्कारासाठी खालील पात्रता आवश्यक आहे (भारत सरकारच्या संकेतस्थळावरून)
Any person without distinction of race, occupation, position or sex is eligible for these awards. It is awarded for exceptional service towards advancement of Art, Literature and Science, and in recognition of public service of the highest order.
सचिनचे क्रीडा क्षेत्रात अतुलनीय व उत्तुंग योगदान आहे. आपल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे सचिन क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचलेला आहे. सचिन हा आनंदाचे निधान आहे. आपल्या खेळाने त्याने २१ वर्षांहून अधिक काळ कोट्यावधी भारतीयांच्या चेहर्यावर हास्य फुलविले आहे व त्यांना निर्भेळ आनंद दिलेला आहे. भारतरत्न साठीच्या पात्रतेची जी वर व्याख्या दिलेली आहे त्याच्या आधारे तो भारतरत्नसाठी पूर्णपणे पात्र आहे हे सहज लक्षात येते.
>>> गणू तुझी चिकाटी जबरदस्त आहे...
एखाद्याबद्दल मनात आणि हृदयात पराकोटीचा द्वेष असला की अशी चिकाटी दिसून येते. या चिकाटीचे आपल्याला पुढेही प्रत्यंतर येईलच.
It is awarded for exceptional
It is awarded for exceptional service towards advancement of Art, Literature and Science, and in recognition of public service of the highest order. >>>
तुम्हाला इंग्लिश समजत असावे असे वाटत होते पण तुम्हि नंतर जे लिहिले आहे त्यामुळे तसे वाटत नाहि. म्हणुन मराठीत सांगतो - भारतरत्नाच्या व्याख्येत क्रिडा येत नाहि. त्यामुळे क्रिडा यात येत नाहि हे लक्षात आले असेल तर सचिनला भारतरत्न देण्याआधी भारतरत्नाच्या व्याख्येत क्रिडा येइल यासाठी प्रयत्न करा.
आपल्या खेळाने त्याने २१ वर्षांहून अधिक काळ कोट्यावधी भारतीयांच्या चेहर्यावर हास्य फुलविले आहे व त्यांना निर्भेळ आनंद दिलेला आहे >>> बर्याच जणांनी तसे हास्य फुलवले आहे म्हणुन त्यांना भारतरत्न द्यायचे ?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बोरगे, आधी चुका केल्या हे सचिनला (किंवा कोणालाहि) भारतरत्न देण्यासाठी justification कसे होउ शकते हेच मला समजुन शकत नाहि
Any person without
Any person without distinction of race, occupation, position or sex is eligible for these awards. It is awarded for exceptional service towards advancement of Art, Literature and Science, and in recognition of public service of the highest order.
----
मास्तुरे भारतरत्न साठी च्या निकषांची छान माहिती दिलीत. आता यामधे कुठेच आपल्या सर्वांचा लाडका सचिन बसत नाही
क्रिकेट हा खेळ असल्यामुळे क्रिडाप्रकारात मोडतो, क्रिकेट कला नाही आहे, क्रिकेट साहित्यही नाही आहे आणि विज्ञान तर म्हणता येणार नाही. जनतेची सेवा म्हणणे जनतेवर प्रचंड ओझे टाकल्यासारखे होते.
आता निव्वळ आनंद देणे हा काही पात्रतेसाठी निकष नाही आहे. मग आपल्या सर्वांचा लाडका मुन्नाभाई का नको भारत रत्ना साठी ? त्याने पण हसवले आहे, गांधीगिरी ला पुन्हा जन सामान्यांत स्थान दिले आहे. हे योगदान (त्याने केलेल्या चुका लक्षात घेतल्या वरही) पण महान आहे.
भारतरत्न प्रत्येक वर्षी द्यायलाच पाहिजे असेही नाही आहे. कुणी योग्य व्यक्ती नसेल तर ते त्या वर्षी देत नाही.
आता निव्वळ आनंद देणे हा काही
आता निव्वळ आनंद देणे हा काही पात्रतेसाठी निकषच नाही आहे. मग मुन्नाभाई का नको. >>.
दादा कोंडके ला द्या त्याने देखील बर्याच जणांना निव्वळ आनंद दिला आहे ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
एखाद्याबद्दल मनात आणि हृदयात
एखाद्याबद्दल मनात आणि हृदयात पराकोटीचा द्वेष असला की अशी चिकाटी दिसून येते. या चिकाटीचे आपल्याला पुढेही प्रत्यंतर येईलच. >>> एखाद्या गोष्टिला विरोध केला म्हणुन त्या माणसाबद्दल द्वेष आहे अशी जी तुमची मनसे स्टाइल समजुत असेल तर तुम्हाला हसावे का रडावे हे समजण्यापलिकडचे आहे. कितीतरी वेळा मी इथे आधीच्या पोस्ट मधे सांगीतले आहे की सचिनच्या क्रिकेट मधील कौशल्याबद्दल कोणताच वाद नाहिये, तरी तुम्हाला हे समजत नसेल तर तुमची फक्त कीव येते!
>>> क्रिकेट हा खेळ असल्यामुळे
>>> क्रिकेट हा खेळ असल्यामुळे क्रिडाप्रकारात मोडतो, क्रिकेट कला नाही आहे, क्रिकेट साहित्यही नाही आहे आणि विज्ञान तर म्हणता येणार नाही.
सचिन हा "भारतरत्न" साठी सर्वार्थाने पात्र असला, तरी, क्रिकेट हा खेळ असून तो कलाप्रकारात मोडत नाही, ह्या तांत्रिक मुद्द्यामुळे त्याला सध्या ते देता येणार नाही असे तुमचे मत दिसते.
अमर्त्य सेन ह्या अभारतीय व्यक्तीची कामगिरी कला, साहित्य, विज्ञान . . . अशा कोणत्याच प्रकारात मोडत नाही. आणि मोडत असली तरी त्यांच्या कामगिरीचा भारताला काही उपयोग झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही त्यांना भारतरत्न मिळालेच ना!
सचिन हा "भारतरत्न" साठी
सचिन हा "भारतरत्न" साठी सर्वार्थाने पात्र असला, तरी, क्रिकेट हा खेळ असून तो कलाप्रकारात मोडत नाही, ह्या तांत्रिक मुद्द्यामुळे त्याला सध्या ते देता येणार नाही असे तुमचे मत दिसते.
--- माझे मत अगदी स्वच्छ आहे. निव्वळ पात्रतेची निकषे बघितली (तुम्ही जरी येथे डकवली असली तरी वाचुन समजावुन घेतली आहे हे म्हणायचे माझे धाडस होत नाही), आणि स्वातंत्र बुद्धीने विचार केला तर आपला सर्वांचा लाडका सचिन हा भारत रत्नासाठी अपात्र आहे. अर्थात तो भारतरत्नासाठी अपात्र असला तरी त्याला ते मिळणारच नाही असेही म्हणता येणार नाही.
येनकेन प्रकारे त्याला तेथे बसवायचेच हा दुराग्रह घातक आहे.
क्रिकेट हा खेळ असून तो
क्रिकेट हा खेळ असून तो कलाप्रकारात मोडत नाही, ह्या तांत्रिक मुद्द्यामुळे त्याला सध्या ते देता येणार नाही असे तुमचे मत दिसते. >>. म्हणजे काहिहि करा पण सचिनला भारतरत्न द्याच. अर्थात कायदे मोडणे हे काहि पहिल्यांदाच होत नाहिये सचिनसाठी त्यामुळे त्यात काहिहि विशेष नाहि![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अमर्त्य सेन ह्या अभारतीय व्यक्तीची कामगिरी कला, साहित्य, विज्ञान . . . अशा कोणत्याच प्रकारात मोडत नाही. आणि मोडत असली तरी त्यांच्या कामगिरीचा भारताला काही उपयोग झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही त्यांना भारतरत्न मिळालेच ना! > > परत तेच!
आधी चुका केल्या हे सचिनला (किंवा कोणालाहि) भारतरत्न देण्यासाठी justification कसे होउ शकते हेच मला समजुन शकत नाहि हे किती वेळा लिहायला लागणार माहित नाहि.
पण भारतीयांचे एक मात्र मस्त आहे. स्वतःला हवे तेव्हा कायदे मोडायचे, वाकवायचे त्यासाठी इतिहासातुन खोदुन justifications शोधायची. कायदे मोडण्यात, वाकवण्यात सर्वात पुढे. इतिहासात चुका झाल्या तर त्या चुका पुन्हा होउ नयेत म्हणुन प्रयत्न करणे बाजुलाच राहिले. आणी परत देशाला, राजकारण्यांना नावे ठेवायला मोकळे! धन्य आहे.
चाणक्य : कायदे हे काळानुसार
चाणक्य : कायदे हे काळानुसार बदलत जातात आणि गेले पाहिजेत. कला आणि क्रीडा क्षेत्रात काय फरक आहे? जर कला हा निकष होऊ शकतो तर क्रीडा का होऊ नये? ध्यानचंदला हा पुरस्कार केवळ क्रीडा क्षेत्र भारतरत्नाच्या व्याख्येत अजूनही बसत नसल्यामुळे मिळाला नसावा. जर कोणाला वाटते तो ध्यानचंद यांना आधी मिळावा तर त्यासाठी क्रीडा निकष लावावाच लागणार कि. आणि कायदेच काळानुसार बदलले गेले नाही पाहिजेत हे अगदी हास्यास्पद विधान आहे.
इतिहासात चुका झाल्या तर त्या चुका पुन्हा होउ नयेत म्हणुन प्रयत्न करणे बाजुलाच राहिले. आणी परत देशाला, राजकारण्यांना नावे ठेवायला मोकळे! धन्य आहे. >> खेळाडूना कला क्षेत्रातील लोकांयेवढा हि मान मिळू नये, हि सुद्द्धा इतिहासातील चूकच आहे कि? कला क्षेत्रातील लोकांयेवढे क्रीडा क्षेत्रातील लोकांचे योगदान महत्वाचे नाही असाही एक ग्रह असावा. मग क्रीडा क्षेत्र हा निकष टाकला तर काय फरक पडतो?
येनकेन प्रकारे त्याला तेथे बसवायचेच हा दुराग्रह घातक आहे. >> आणि येन केन प्रकरणी त्याला मिळूच नये हा सुद्द्धा घातक दुराग्रह आहेच कि?
मला वैयातिक रित्या वाटते सचिनला भारतरत्न मिळावा, आणि कोणीही कितीही गप्पा मारल्या तरी तो मिळणारच. त्यामुळे आपण वाद घालून त्यात काहीही फरक नाही पडणार.
जर कोणाला वाटते तो ध्यानचंद
जर कोणाला वाटते तो ध्यानचंद यांना आधी मिळावा तर त्यासाठी क्रीडा निकष लावावाच लागणार कि. आणि कायदेच काळानुसार बदलले गेले नाही पाहिजेत हे अगदी हास्यास्पद विधान आहे.
---- कायदे काळानुसार बदलायला काहीच हरकत नाही... पण भारतरत्न सचिनला मिळावे म्हणुन कायद्यात बदल करायची मागणी करणे हे अगदी हास्यास्पद आहे.
मला वैयातिक रित्या वाटते सचिनला भारतरत्न मिळावा, आणि कोणीही कितीही गप्पा मारल्या तरी तो मिळणारच.
---- मला पण सचिनला नोबेल मिळावा असे वाटेल... पण आपल्या निव्वळ वाटण्याला काय अर्थ आहे?
>>> स्वातंत्र बुद्धीने विचार
>>> स्वातंत्र बुद्धीने विचार केला तर आपला सर्वांचा लाडका सचिन हा भारत रत्नासाठी अपात्र आहे.
सचिनची कामगिरी दैदिप्यमान आहेच. यापूर्वी भारतरत्न मिळालेल्या काहीजणांपेक्षा तर तो खूपच जास्त श्रेष्ठ आहे. तुम्ही स्वतंत्र बुध्दीने विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की निकषातला तांत्रिक मुद्दा सोडला तर तो या पुरस्कारासाठी सर्वार्थाने पात्र आहे. सर्व निकष लावून जर काही इतरांना पात्र नसताना सुध्दा भारतरत्न पुरस्कार मिळू शकतो, तर, सर्वार्थाने पात्र असूनसुध्दा तो त्याला तो मिळूच नये असा अट्टाहास का?
>>>> अर्थात तो भारतरत्नासाठी अपात्र असला तरी त्याला ते मिळणारच नाही असेही म्हणता येणार नाही.
अर्थात तो भारतरत्नासाठी पूर्णपणे पात्र असला तरी त्याला तो मिळेलच असेही म्हणता येणार नाही (कारण यापूर्वीही अनेकांना ते पात्र असूनसुध्दा हा पुरस्कार दिला गेलेला नाही). त्यामुळे सचिनची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेली असली तरी सचिनविरोधकांनी निराश व्हायचे कारण नाही.
>>> येनकेन प्रकारे त्याला तेथे बसवायचेच हा दुराग्रह घातक आहे.
तो कितीही थोर आणि पात्र असला तरी त्याला हा पुरस्कार द्यायला विरोधच करायचा हा दुराग्रह घातक आहे.
>>> भारतरत्न सचिनला मिळावे म्हणुन कायद्यात बदल करायची मागणी करणे हे अगदी हास्यास्पद आहे.
यात हास्यास्पद काय आहे? परिस्थिती कितीही बदलली तरी जुन्या कायद्यात योग्य ते बदल अजिबात करायचे नाहीत हा आग्रहच जास्त हास्यास्पद आहे. कायद्यात वेळोवेळी बदल होत आलेले आहेत आणि यापुढेही ते होतीलच. जर एखाद्या तांत्रिक व कालबाह्य मुद्द्यामुळे एखाद्याचे श्रेय नाकारले जात असेल तर त्यात बदल करण्यात काहीच गैर नाही. कायद्यामध्ये क्रीडा या प्रकाराचा समावेश नाही असा हास्यास्पद युक्तिवाद करून पुरस्कार नाकारण्यापेक्षा निकषांमध्ये योग्य ते बदल करणेच योग्य ठरेल. तसेच या बदलांमुळे इतर खेळाडूंचा सुध्दा (उदा. विश्वनाथ आनंद) या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल.
नितीन बोरगे, अनुमोदन!
नितीन बोरगे,
अनुमोदन!
निकषातला तांत्रिक मुद्दा
निकषातला तांत्रिक मुद्दा सोडला तर तो या पुरस्कारासाठी सर्वार्थाने पात्र आहे.
---- कृपया समजण्याचा प्रयत्न करा, निव्वळ तांत्रिक मुद्यामुळे एका थोर व्यक्तीला दिले गेलेले भारतरत्न केंद्राला काही वर्षांनी मागे घ्यावे लागले. केवळ एका शब्दाच्या खेळामुळे...
अर्थात त्या प्रकारामुळे त्या थोर व्यक्तीचा थोरपणा तसुभरही कमी झालेला नाही किंवा होत नाही.
>>> निव्वळ तांत्रिक
>>> निव्वळ तांत्रिक मुद्यामुळे एका थोर व्यक्तीला दिले गेलेले भारतरत्न केंद्राला काही वर्षांनी मागे घ्यावे लागले.
म्हणूनच या निकषांमध्ये बदल आवश्यक आहेत.
उदय, मला तुमचे एक मत सांगा. भारतरत्नच्या सध्याच्या निकषांमध्ये क्रीडा हा प्रकार सध्या नाही आणि फक्त म्हणूनच तो सचिनला देऊ नये असे तुम्हाला वाटते का? समजा या निकषांमध्ये योग्य ते बदल करून क्रीडा हा प्रकार निकषांमध्ये समाविष्ट केला तरीसुध्दा तो पुरस्कार सचिनला देऊ नये असे तुम्हाला वाटेल का?
हाइट झाली यार.... पालथा घडा
हाइट झाली यार.... पालथा घडा बघितला होता, पण ग्रिस लावुन अगदी ' वॉटर प्रुफ' असलेला पहिल्यांदाच बगितला. उदयराव, चुकुन माकुन घड्याला थेंबभर पाणी लागलच तर तुम्हालाच नोबेल (हो विज्ञानाचे ) मिळेल...
कायदे काळानुसार बदलायला काहीच
कायदे काळानुसार बदलायला काहीच हरकत नाही... पण भारतरत्न सचिनला मिळावे म्हणुन कायद्यात बदल करायची मागणी करणे हे अगदी हास्यास्पद आहे. >> ठीक आहे. मग तो क्रीडा क्षेत्राला मिळण्यासाठी बदल करायला तर हरकत नसावी.
मला पण सचिनला नोबेल मिळावा असे वाटेल... पण आपल्या निव्वळ वाटण्याला काय अर्थ आहे? >> तसं बघायला गेल तर इथल्या चर्चेला देखील अर्थ नाही. कारण पुरस्कार वितरण मतदान घेऊन होत नाही.
घ्या.
नोबेल बाबतच बोलत असाल तर तो ओबामाला शांततेसाठी मिळाला होता. आणि गांधीजींना कधीच नाही. बऱ्याच गांधी अनुयायांना मात्र मिळाला आहे.
समजा या निकषांमध्ये योग्य ते
समजा या निकषांमध्ये योग्य ते बदल करून क्रीडा हा प्रकार निकषांमध्ये समाविष्ट केला तरीसुध्दा तो पुरस्कार सचिनला देऊ नये असे तुम्हाला वाटेल का?
---- क्रिडा क्षेत्रासाठी खास राजीव गांधी खेल रत्न हा सर्वोच्च सन्मान आहे. जोडीला खास अर्जुन पुरस्कार आहेतच. असे असल्यावर सध्याच्या निकषां मधे बदल करण्याची अवशक्ता नाही आहे.
मग तो क्रीडा क्षेत्राला
मग तो क्रीडा क्षेत्राला मिळण्यासाठी बदल करायला तर हरकत नसावी. >>> तेच तर मी इतके दिवस म्हणत आहे.
भारतरत्नच्या सध्याच्या निकषांमध्ये क्रीडा हा प्रकार सध्या नाही आणि फक्त म्हणूनच तो सचिनला देऊ नये असे तुम्हाला वाटते का? समजा या निकषांमध्ये योग्य ते बदल करून क्रीडा हा प्रकार निकषांमध्ये समाविष्ट केला तरीसुध्दा तो पुरस्कार सचिनला देऊ नये असे तुम्हाला वाटेल का? >>>
सध्याच्या नियमात बदल करुन मग तो आधी ध्यानचंद , उषा , सचिनच्या आधीचे खेलरत्न असलेले ५ जण यांना द्या आणी मग सचिनलाहि द्या. कोण नाहि म्हणते आहे ?
पण उगाचच आत्ता तसा नियम नसतान, सगळे नियम वाकवुन, सचिन च्या आधी झालेल्या उत्तम खेळाडुंचे योगदान बाजुला सारुन तो सचिनला देण्याचा आग्रह हा तर दुरागहच आहे आणी हास्यास्पदही आहे.
>>> क्रिडा क्षेत्रासाठी खास
>>> क्रिडा क्षेत्रासाठी खास राजीव गांधी खेल रत्न हा सर्वोच्च सन्मान आहे.
सचिनला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा खूप पूर्वी म्हणजे १९९७ मध्येच मिळालेला आहे. १९९७ नंतर त्याची कामगिरी अजून बहरलेली असून त्याने क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम केले आहेत व १९९७ च्या तुलनेत आता तो क्रिकेटच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचलेला आहे. आता त्याच्या कामगिरीचा सन्मान फक्त "भारतरत्न" पुरस्कारानेच होऊ शकतो.
आज मी खडकीच्या पॅराप्लेजिक
आज मी खडकीच्या पॅराप्लेजिक सेंटरला गेलो होतो. युद्धात आणि अन्यत्र अपंगत्व आलेल्या जवानांसाठी हे केंद्र काम करते. या जवानांना विश्वचषक जिंकल्यानंतर भेटण्याचे सचिनने कबूल केले होते. पण आयपीएलच्या रगाड्यामुळे त्याला वेळ काढता येणे शक्य नव्हते म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा सचिनने त्यांच्याशी संपर्क साधला आणि दिलखुलास गप्पाही मारल्या.
प्रत्यक्ष सचिनशी आपण बोलतोय याचा आनंद त्या शूरवीरांच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. आणि कार्यक्रमानंतर जेव्हा मी त्यांना विचारले की नक्की काय वाटले तुम्हाला...
तेव्हा एका जवानाने उत्तर दिले...
तो म्हणाला - आजवर खूप खेळाडू होऊन गेलेत. त्यांनी खूप चांगली कामगिरीपण केली आहे देशासाठी. पण सचिनबद्दल जी आपुलकी आणि आत्मियता वाटते तशी कोणाबद्दलही वाटत नाही. आपल्या देशातील प्रत्येकाला तो आपल्या घरातील एक सदस्य वाटतो. आम्ही भले सरहद्दीवर देशाचे रक्षण करतो पण आमच्यासाठी सचिन हा सर्वश्रेष्ठ फौजी आहे. तो आम्हाला आमचे दुख, त्रास, विवंचना आणि अपंगत्वही विसरायला लावतो. तो आमचा भाऊ आहे.
मग त्याला विचारले मी भारतरत्नाबद्दल...
त्यावर तो म्हणाला की अहो लाखो भारतीयांनी त्याला आधीच ते बहाल केलेय अभी तो सिर्फ फॉर्मालीटी बाकी है..
है कोई माई का लाल जो उसे ना बोले...
म्हणलो मनात आहेत रे बाबा काही लाल आहेत असे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आता त्याच्या कामगिरीचा सन्मान
आता त्याच्या कामगिरीचा सन्मान फक्त "भारतरत्न" पुरस्कारानेच होऊ शकतो. >>> मास्तरांचे अवघड झाले आहे. त्यांना सचिन आणी भारतरत्न याशिवाय काहि दिसतच नाहि!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आशुचॅम्प, माहितीबद्दल
आशुचॅम्प,
माहितीबद्दल धन्यवाद! काही महिन्यांपूर्वी सचिनने एका अंधशाळेलाही भेट देऊन तो त्या मुलांमध्ये रमला होता. प्रत्यक्ष सचिन आपल्याला भेटल्यामुळे त्या मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
इथले काही माई के लाल त्याच्या या कृत्यालासुध्दा मानभावीपणा म्हणतील यात संशय नाही.
>>> आम्ही भले सरहद्दीवर देशाचे रक्षण करतो पण आमच्यासाठी सचिन हा सर्वश्रेष्ठ फौजी आहे. तो आम्हाला आमचे दुख, त्रास, विवंचना आणि अपंगत्वही विसरायला लावतो. तो आमचा भाऊ आहे.
भारतातल्या बहुतकांच्या मनात (काही माई के लालांचा अपवाद वगळता) सचिनबद्दल अशाच भावना असतील याविषयी खात्री आहे.
या जवानांना विश्वचषक
या जवानांना विश्वचषक जिंकल्यानंतर भेटण्याचे सचिनने कबूल केले होते पण आयपीएलच्या रगाड्यामुळे त्याला वेळ काढता येणे शक्य नव्हते म्हणून >>> दिसले बरका सचिनचे भारतप्रेम
वारे सचिन. मुंबइहुन खडकीला एक दिवस येणे याला जमले नाहि.
मग त्याला विचारले मी भारतरत्नाबद्दल... >> तुम्हि पण ना आशुचैम्प !![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
अहो गेलाच होतात तर जरा त्या जवानांचे तरी कौतुक करायचे. ह्याला म्हणतात कर्मदरिद्रिपणा. तुम्हि त्या बहाद्दरांना भेटलात आणी काय विचारलेत तर म्हणे सचिनच्या भारतरत्नाबद्दल. धन्या आहे तुमची.
Pages