सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप तुम्हि माझ्या दोन्ही पोस्ट वाचा बघु नीट आधी. मी दोन्हि गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत.

गणूशून्य किंवा गणूटिंब,

बरेच दिवस तुमची अतिशय अभ्यासपूर्ण मतं वाचत होतो. आज अखेरीस राहवलं नाही म्हणून उत्तर देतोय. तुमच्यासारख्या लोकांसाठीच या वेबसाईटची निर्मिती झाली आहे. नीट वाचा आणि तुमच्या मनात असलेल्या किंबहुना नसलेल्याही प्रश्नांची उत्तरं मिळवा..

आणि हो... फार विनोदी लिहिता बुवा तुम्ही... पुढे मागे मायबोलीवर 'विनोदी लेखनस्पर्धा' झाली तर त्यात नक्की भाग घ्या.. डोळे झाकून पाहिलं बक्षीस मिळवाल !!

अजून एक... व्यक्तिपूजा जेवढी वाईट त्याहून ९९ पटीने (म्हणजे (आमच्या) सचिनने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत मिळून जितकी शतकं केली आहेत तेवढी) व्यक्तीद्वेष वाईट हेही विसरू नका.. !!!!

आणि हेही वाचा.. मुद्दा पटावा म्हणून नाही.... सहज सामान्यज्ञानात भर पडावी म्हणून

Amazing unusual stats of Sir Sachin -

In his career, Sachin has faced 47,788 balls = 7985 overs
Has faced 788 different bowlers...528 of them failed to get him out even once.....
He has hit 1981 ODI and 1892 Test fours, most by any batsman...
Has hit 600 runs of Murlitharan ....most of any bowler...
Has spent 1148 hours on crease and has run 716km to score all his runs Happy

http://www.facebook.com/sachinandcritics

आज अखेरीस राहवलं नाही म्हणून उत्तर देतोय. >>> मी धन्य पावलो आज! Proud

आणि हो... फार विनोदी लिहिता बुवा तुम्ही... पुढे मागे मायबोलीवर 'विनोदी लेखनस्पर्धा' झाली तर त्यात नक्की भाग घ्या.. डोळे झाकून पाहिलं बक्षीस मिळवाल !! >>>

एवढी नाहि हो माझी लायकी. बरेच नग आहेत माझ्याहुन भारी! Proud

व्यक्तिपूजा जेवढी वाईट त्याहून ९९ पटीने व्यक्तीद्वेष वाईट हेही विसरू नका. >>>> मला सचिनबद्दल द्वेष आहे हे फक्त व्यक्तिपूजा करणारेच म्हणु शकतात. कारण त्यांना व्यक्तिपूजा आणी व्यक्तीद्वेष यांच्या मधला stand माहितीच नाहि.

अहो stats कसले देताय! तुम्हाला मुद्दाच समजत नाहि तर उगाचच बोलु नये. क्रीकेट मध्ये सचिन ग्रेट आहे याबद्दल कोणी वादच घालत नाहिये पण म्हणुन त्याला भारतरत्न द्यावे का नाहि हा मुद्दा आहे. Proud

सचिनला योग्य वेळी भारतरत्न मिळेलच यात कोणतीही शंका नाही. तेव्हा ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे त्यांनाच काथ्याकूट करू दे.
कर वाचवण्याचा प्रयत्न करणे आणि बुडवणे यात फरक आहे.

कर वाचवण्याचा प्रयत्न करणे आणि बुडवणे यात फरक आहे.
---- प्रामाणिक पणे कर वाचवण्याचा प्रयत्न करणे नक्कीच चुकीचे नाही आहे. मध्यम वर्गिय लोकं LIC अथवा PPF किंवा अजुन काही मार्गांचा वापर करुन सरकारच्या तिजोरीत कमीत कमी कर कसा जमा होईल याच्या प्रयत्नात असतांत, तसा प्रयत्न करणे यांत काहीही वावगे नाही आहे.

पण उत्पन्नाचे स्त्रोत बदलणे किंवा जाहिरातीमधुन मिळालेली मिळकत हे खेळातुन आले आहे असे दाखवून कर ५ कोटींनी कमी भरणे या प्रकाराला नक्कीच कर वाचवण्याचा प्रयत्न म्हणता येणार नाही. जेव्हा तुमच्या कडे निष्णात कर सल्लागारांची फौज दिमतीला आहे तेव्हा अशा चुका नजरचुका ठरत नसतांत.

क्रिकेट मधील महान कामगिरी आणि सामाजिक बांधिलकी या दोन भिन्न गोष्टी आहेत.

सचिनला योग्य वेळी भारतरत्न मिळेलच यात कोणतीही शंका नाही >>> मलाहि नाहि कारण भारतरत्न हे देखील मतांच्या राजकारणावरुनच दिले जाते Proud

कर वाचवण्याचा प्रयत्न करणे आणि बुडवणे यात फरक आहे. >>>>
कायदेशीर मार्गाने कर वाचवायच प्रयत्न करणे आणी कायदे मोडुन कर वाचवणे/कायदे मोडुन स्वताचा फायदा करुन घेणे हाच तो फरक आहे मयेकर साहेब

>> तुम्हाला मुद्दाच समजत नाहि तर उगाचच बोलु नये..

हाहाहाहा हाहाहाहाहा

अरे या न्यायाने तर क्रिकेट या विषयावर तुला तोंड उघडण्यपूर्वीच बंद करावं लागेल आणि आयुष्यभर मौनव्रत घ्यावं लागेल. तेव्हा असले स्वतःला घातक नियम बनवण्यापूर्वी काळजी घे.

>> एवढी नाहि हो माझी लायकी.

या संपूर्ण बाफवर पहिल्यांदा काहीतरी समंजस बोललास... अभिनंदन !!!!

आणि हो.... अजून एक.. 'नाही' लिहिताना ही ला दुसरी वेलांटी द्यायची असते.. पहिली नाही !!!

क्रिकेट मधील महान कामगिरी आणि सामाजिक बांधिलकी या दोन भिन्न गोष्टी आहेत. >>>>
१०००% अनुमोदन.

इथे कुणीच सचिनच्या क्रिकेट मधील महान कामगिरी बद्दल शंका उपस्थित करत नाहिये. तो क्रिकेट जगात महान आहेच, यावर कुणाचंच दुमत नाही. त्यामुळे stats देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला ही माहिती आहे हे सगळं.

प्रश्न हा उपस्थित केला जातोय की प्रथम त्याने भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची कर्तव्यपूर्ती केलीय का? आणि याचे उत्तर नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.

भारतरत्न देण्यात येणार्‍या व्यक्तीने (मग ती कोणीही असो) आधी देशाप्रती आपली कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडावीत एवढाच मुद्दा आहे.

या संपूर्ण बाफवर पहिल्यांदा काहीतरी समंजस बोललास. >>>
मुर्खपणाबद्दल बोलत होतो मी! असो. तुम्हि तुमची लायकी सिद्ध केलित हे बरे झाले हे वाक्य लिहुन. Proud

अडकित्ता, डु आय घेताना जरा जपुन नावे घ्या! नाहितर खरा आयडीचा सुपारीसारखाच स्वतःच्या अडकित्यात अडकुन भुगा व्हायचा. Proud

कर वाचवण्याचा प्रयत्न करणे आणि बुडवणे यात फरक आहे.>>>>> कर वाचवण्याचा प्रयत्न करणे (ते सेविंग्ज वगैरे करुन , काळापैसा करुन नव्हे )आणि करमाफी मागणे यात फरक आहे हो सायब...... करमाफी मागितली काय आणि कर चुकवला काय एकच... आता तुमी आमी जर का म्हणलं द्या आमाला करमाफी औंदा घर बांधाय काढलयं तर सरकार देतय का? का आपण मागतोय द्या म्हणुन.... मग या सायबांनी तर का मागावं.... हा मुद्दा आहे....

प्रश्न हा उपस्थित केला जातोय की प्रथम त्याने भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची कर्तव्यपूर्ती केलीय का? आणि याचे उत्तर नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.>>>>>>>>>>

डोके जरा चालवा......निवडुंग आणि चाणक्य (डोम्बलाचा) (गणु चा डुआय)............

सचिन किती गरीब अनाथ मुलांचा शिक्षणाचा भार उचलतोय माहित आहे का??...ते ही बाकिंच्या सारखा गाजावाजा न करता?? नाही माहिति ना ......मग जा वेड्यांनो आधी त्याची माहीती काढा.......फुकट्चे इथे येउन बडबड करतात......असली माहीती तुम्ही आयुश्य्यात काढनार नाही......कारण त्याने तुमची तोंड बंद होतात ना.......मग कसे चलनार.......केवळ एकदाच रणजी सामना एकत्र खेळणार्या मित्राच्या ऑपरेशन चा खर्च उचलतो....का.......आता या वर आपल्या सारखे लोक बोलनार कि त्यात काय मोठा महान काम केले........अरे तुम्हि लोक उभ्या आयुष्यात किती जणांना मदत केली.....? आधी ते स्वतः च बघा मग दुसर्याना नावे ठेवा......

सचिन हा महान खेळाडू आहे यात कुणालाच शंका घेण्याचे कारण नाही ते त्याने स्वत:च्या खेळाने सिद्ध केले आहे आणी भारतरत्न या पुरस्कारासाठी योग्यच आहे... पण भारतरत्न हा पुरस्कार सचिनला कधीच मिळु शकणार नाही याचे कारण काही दिवस मिडीया आणी राजकारणी लोक हा विषय चघळतील आणी नंतर सोडून देतील आणी लोक सुद्धा हळुहळु ही गोष्ट विसरुन जातील, त्यामुळे जनभावनेचा आदर करुन त्याला भारतरत्न द्या असे फक्त आत्ता म्हणायचे.. ज्या गोष्टीतुन आपला किंवा आपल्या पक्षाचा फायदा नाही किंवा किमान विरोधकांचे नुकसान नाही त्या गोष्टीवर फक्त चर्च्या करायची असते...हे माझे मत नाही तर एका मंत्रीमहोदयानी खाजगी चर्चेत हे सांगीतले...:(

मुर्ख माणसे आहात..............

कर भरला नाही असे किती जण आहेत सचिन ने फक्त कर माफी मागितली या वर किती वाद करतात.......मला सुध्दा क्रिकेट आवडत नाही कारण त्याने इतर खेळ मारले जातात पण या करीता मला सचिन आवडत नाही असा होत नाही. ध्यानचंद महान खेळाडु होते. त्यांना सुध्दा मिळायला हवे... पण कधी जेव्हा ते त्यांच्या शिखरावर होते.. तेव्हा ही मागणी रास्त होती.. आता त्यांच्या नावाने तर पुरस्कार दिला जातो. त्याचे चाहते तेव्हा कुठे होते. नेमके सचिन ला मागणी करत असताना ध्यानचंद चे चाहते पावसाळी बेडका सारखे बाहेर आले..याचा अर्थ फक्त असा होतो की हे सगळे मुर्ख माणसे आहे .. पावसाळी बेडके.. नुसते विरोध करणे हेच यांचे काम ..इतके दिवस काय गटारात लपुन होतात काय..कि विहिरीत. ?

आणी कोण म्हनते सामान्य माणुस कर भरतो पुर्ण पणे... एक तरी माणुस दाखवा..? प्रत्येक जण कर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो.. उद्या जर एखाद्याला सांगितले कि जा एक अर्ज कर कर माफी चा ..मिळेल तुला.. तर तो काय नाही करणार.. करणारच तो..

वरती जे कोणी हे कर बुडवने प्रकरणा वर इतकी सचिन चे द्वेष करत आहेत..यांनी उभ्या आयुष्यात किती कर चुकवे केली असेल..?..

शेवटी माणुस हा माणुसच राहतो.. जिथे फायदा असेल तिथे तो नक्किच जाणार..सचिन काय आणि सुमित काय कोणी पण आधी फायदाच बघनार.. जिथे अण्णा फायदा बघु शकतात स्वतःचा तर सचिन ने बघितले तर काय झाले..???????????????????

पण भारतरत्न हा पुरस्कार सचिनला कधीच मिळु शकणार नाही याचे कारण काही दिवस मिडीया आणी राजकारणी लोक हा विषय चघळतील आणी नंतर सोडून देतील आणी लोक सुद्धा हळुहळु ही गोष्ट विसरुन जातील>>> मला वाटतं क्रिकेट याला अपवाद असावं.... लोकांना राव स्वतःच्या घरातलं स्टॅट माहित नसेल पण सचिनच सगळ रेकॉर्ड तोंडपाठ आहे. बाकि सगळं लोक विसरतील पण जोपर्यंत क्रिकेट चालू आहे तोपर्यंत हा आयटम सुरुच राहणार...

एका मंत्रीमहोदयानी खाजगी चर्चेत हे सांगीतले>>>> हे भारी सांगीतलेत ... आमची पण ओळख ठेवा राव..... (एकदम कोल्हापुरची आठवण झाली, कुनाच्यात उठाय बसाय असतोय म्हाइत हाय न्हवं.... Happy )

सुमित, एक नं पोष्ट.... प्रत्येक वाक्य म्हणजे एक एक पोष्ट असल्यासारख आहे अतिशय... सुसंबद्ध... पण प्रॉब्लेम असा आहे कि जेंव्हा ध्यानचंद शिखरावर होते तेंव्हा आमी अजुन जलमायचं हुताव... आणि कर तर आमच आबा आज्या पन भरत हुतं... त्यात काय कुठ सुटनुक हाय व्हय... हां आता तुमच्या कडं काय बाय आय ड्याची कलपना असंल तर बिगिन सांगुन मोकळ व्हा बघु.... काय हाय चार पैसं सुटलं तर तुमाला बी देवु कि दोन पैसं...

पण प्रॉब्लेम असा आहे कि जेंव्हा ध्यानचंद शिखरावर होते तेंव्हा आमी अजुन जलमायचं हुताव.>>>>>

अरे जर तुम्ही जन्मलाच नव्हतात तर . तुम्हाला ध्यानचंद नुसता ऐकुन माहीती..????

जे स्वतः ला दिसते त्या वर विश्वास ठेवा.. दुसर्याचे ऐकुन किती दिवस मत प्रदर्शित करणार गणु सारखे....??

वाचा पेपर..माहीती काढा... कर वाचवण्याचे खुप रस्ते आहेत......( मी ते सांगण्याचे पैसे घेतो..) चांगला गुंतणुक सल्लागार शोधा.. तो तुमचा कर नक्की वाचवेल...

आणि एकच भाषा वापरा सर्वत्र.....

असंबध्द वाटते.......

उदयवन,
इथे वादविवाद चालू आहे, भांडणं नाही. वैयक्तिक टीका करण्याचं काहीही कारण नाहिये. मला ही भरपूर काही बोलता येतं, पण मी ही पातळी गाठणार नाही.

मी (उदय, आणि इतर) यांनी प्रत्येक मुद्द्यास अनुसरून पुरावे दिले आहेत. (जर आपण आधीचे पोस्ट वाचण्याची तसदी घेतली असेल तर.) बाष्कळ बडबड करत नाही आम्ही. तुम्ही जर एवढे मुद्दे मांडत आहात, तर त्यास समर्थनीय असे पुरावे पण दिलेत तर आम्हा वेड्यांच्या डोक्यात ही प्रकाश पडेल.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सचिन ने अशी मदत केली असेल तर अभिनंदन त्याचं. म्हणून कर्त्यव्य बजावण्यातली कसूर समर्थनीय आहे हे चूक. कर्त्यव्य आधी येतात, मग समाजसेवा. ते जर जमत नसेल तर समाजसेवेचं ढोंग पण करू नये माणसाने.

sumiit,

कर कोण भरतं किंवा नाही भरत, हा नीतीमत्तेचा भाग आहे. आपण हे statement generalize करू शकत नाहीत.

तुम्हाला ध्यानचंद नुसता ऐकुन माहीती..????>>>> काय करणार.... ध्यानचंद सोडाच... आर्किमिडीज न्युटन आइन्स्टाईन झालच तर शिवाजी महाराज तानाजी मालुसरे मदर तेरेसा आणि महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस हे सगळे ऐकुनच माहित आहेत हो... कारण तेंव्हा पण आमी अजुन जलमायचं हुताव... पण गणुच काय आमीपन त्यावर विस्वास ठेवतोच हो... काय करणार त्याला काय पर्यायच नाही...

आत २ पैसं देतोय म्हनतोय न्हवं.... उद्या पेपर मध्ये असं हाय म्हटल्यावर तुमी म्हण्णार त्यावर कशाला विस्वास ठेवताय Happy बगा बाबा तुमच पोस्ट सुसंबद्ध मग आमच असंबध्द वाटणारच त्यात तुमचा काय बी दोष न्हाय...

कर कोण भरतं किंवा नाही भरत, हा नीतीमत्तेचा भाग आहे. आपण हे statement generalize करू शकत नाहीत.>>>>>>>>>>>> मग सचीन भरतो कि नाही हा सुध्दा त्याच्या नीतीमत्तेचा भाग आहे........तुम्हाला कोनी त्यावर स्टेट्मेंट द्या म्हणुन सांगीतलेले.....बाफ भारतरत्न द्या म्हणुन आहे.. त्याने कर भरला की नाही या वर नाही..तो त्याचा व्यक्तिगत बाब आहे.. जेव्हा तुम्ही दुसर्यावर बोलतात ना तेव्हा तुम्ही स्वतः ऐकायला शिका.......

निवांत साहेब मी असंबध्द हे आपल्या भाषे बद्दल बोललो आपल्या विचारांबद्दल नाही...कारण आपण काही पोस्ट शहरी भाषेत लिहीत आहत आणी काही गावरान...........

sumiit,

मी "नीतीमत्तेचा भाग" हे आपल्या "सर्वच जण कर बुडवतात" याला अनुसरून वापरलं होतं. असो.

मला माहित नव्हतं की कर बुडवणारे लोक पण भारतरत्न पुरस्कारास पात्र असतात. आपला हाच मुद्दा दिसतोय. आपणास त्यात काहीच चूक वाटत नसेल तर खुशाल द्यावं भारतरत्न. (आपल्या म्हणण्याप्रमाणे)

आपल्या माहितीसाठी म्हणून - प्रियांका चोप्रा ला पद्म अवार्ड nomination नाकारण्यात आलं होतं कर बुडवेगिरी प्रकरणात.

http://daily.bhaskar.com/article/BIZ-NEWS-priyanka-loses-on-padma-award-...

भारतरत्न साठी हे नियम शिथील केले गेले असतील तर खुशाल द्यावं रत्न..

आणी कोण म्हनते सामान्य माणुस कर भरतो पुर्ण पणे... एक तरी माणुस दाखवा..? प्रत्येक जण कर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो.. उद्या जर एखाद्याला सांगितले कि जा एक अर्ज कर कर माफी चा ..मिळेल तुला.. तर तो काय नाही करणार.. करणारच तो..>>>>

निवडुन्ग साहेब जरा वाचा काय लिहिले आहे.........सर्व जण कर बुडवतात असे नाही लिहीले आहे..

कृपया निट लक्ष देउन वाचा ............ Happy

त्याच्याच खाली आपण हे पण लिहिले आहे -

वरती जे कोणी हे कर बुडवने प्रकरणा वर इतकी सचिन चे द्वेष करत आहेत..यांनी उभ्या आयुष्यात किती कर चुकवे केली असेल..?..

असो. कर वाचवणे असा आपणास अर्थ अभिप्रेत असला तरी, सचिन साहेबांनी कर वाचवायचा आणि बुडवायचा दोन्ही प्रयत्न केलेले आहेत. सविस्तर लिंक्स आधीच्या पोस्ट्स मधे आहेतच.
(इथे कर वाचवणे म्हणजे कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करणे हे म्हणायचंय मला.)

मला जे काय म्हणायचं होतं ते स्पष्ट केलंय मी. आपणास कर वाचवणे/बुडवणे यात काहीच चूक वाटत नसेल तर ते आपलं मत.

हे. मा. शे. पो.

राम साहेब गंमत केली राव... Happy त्यात वैयक्तीक कॉमेंट्स वगैरे काही नाही हो....
एनीवे चर्चा वाहवुन भरकटुन झाली आहे.. कदाचित आता परत मार्गावर येइल.

Pages