Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदा मुलीला लाडात म्हंटल , तू
एकदा मुलीला लाडात म्हंटल , तू लग्न झाल की मला सोडून जाणार ना....ती म्हणाली कुठे ? मी म्हंटल...नवर्याकडे....

म्हणाली...कशाला... sleepover साठी का??
भारी किस्से आहेत सगळ्यांचे
भारी किस्से आहेत सगळ्यांचे

एकदा माझ्या भावाला एका पाहुण्यांनी जाताना ५ रु दिले अन म्हणाले की आइसक्रीम खा रे! तर हा त्यांना म्हणतो "५ रु.त कुठे आइसक्रीम येतं?"
यावर दुर्लक्ष करायचं सोडून ते पाहुणे म्हणाले, "अरे कुल्फी खा मग" तर हा बाबांना म्हणतो "पण आपण फक्त क्वालिटीचंच आइसक्रीम खातो नं? कुल्फी खराब पाण्याने बनवली अस्ते नं?" हे भगवान!! सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले
(कुल्फीसाठी हट्ट करु नये म्हणून शिकवलेल्या ज्ञानाने घरच्यांना तोंडघशी पाडलं
)
एक किस्सा लेकाच्या मित्राचा.
एक किस्सा लेकाच्या मित्राचा. हे दोघं आठ महिन्याचे असल्यापासून एकाच डे केअरला जातात. डे केअरच्या पार्किंगमध्ये बरेचदा आमच्या गाड्या शेजारी पार्क केल्या जातात. २ महिन्यापुर्वी माझी गाडी सर्व्हिसिंगला गेली होती म्हणून मी नवर्याची गाडी घेऊन गेले. तर तो स्वतःच्या आईला म्हणतो, 'पहा ती ईशानची आई. ईशानच्या डॅडीची गाडी घेऊन आलीये. बाहेर किती थंडी आहे. आता त्याचा डॅडी घरी कसा जाणार ?' त्याची आई बिचारी मला सॉरी म्हणायला लागली.
घडण्यामागे "इन्ग्रजी" भाषेचा
घडण्यामागे "इन्ग्रजी" भाषेचा व संस्कृतीचा अन्तर्भाव प्राथमिक शिक्षणापासून असल्याचे कारण कितपत असेल? >>>
लिंबूजी.. तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला.. पण मला वाटतं तुमचा आशय चुकतो ..मुलं कधी कसे वागतील हे देशा गणिक फक्त भाषे मुळे कसं बदलेल.. त्यांच्या डोक्यात भाषा हा फक्त व्यक्त करायचे साधन असताना तुम्ही हे निकष कसे काढू शकता.. पाहिजे असेल तर मी अमेरिकन मैत्रिणींचे मुलांचे किस्से देते.. त्यात आणि ह्या किस्स्यात लॉजिकली काही फरक आहे असं मला वाटत नाही.. पण उगाच तुम्हाला असे निकष काढून आनंद मिळत असेल तर मी थांबवणार नाही..
म्हणजे कळते होईस्तोवर घरातच इतरान्कडून ऐकलेले मातृभाषेतील संवाद व त्यातुन घेतले गेलेले व्यावहारीक व इतर ज्ञानाचे कण, परकी भाषा केजीपासुन असेल तर घेणे अवघड जात असेल का?>>>>
मवा कुठे राहते मला माहिती नाही.. तरी हि अजून आनंद होणार असेल तर हे पण ऐका . अमेरिकेत वयाच्या १.५- २ वर्षांपासून ८-९ तास डे केयर मध्ये राहून, मुलं एकमेकांशी, बाहेर पण इंग्लिश मध्येच बोलतात..माझे मुलं शुभम करोति, गणेश स्तोत्र, राम रक्षा पासून सगळं म्हणतात जे मी आज काल भारतात हि सगळ्यांच्या घरी बघत नाही, आजी आबांशी मराठीत बोलतात .मला ऑप्शन आहे त्यांना सक्ती करायचा मराठीत बोलण्याचा पण माझ्या साठी ती प्रायोरिटी नाहीये सध्या कारण.. मी भारतात परत येणार आहे.. तेव्हा बघेन काय करायचं
मी लग्न झाल्यावर १ वर्षानी
मी लग्न झाल्यावर १ वर्षानी भारतात आई-बाबांच्या भेटीला गेले. सगळी कडे आंनदी आंनद कि मी आली म्हणून....कोणच्या मनात काही शंका नाही मी का आली
मला परत आलेली बघून शेजारच्यांची चार वर्षाची मुल्गी तिच्या आईला म्हण्ते...."अग ताई ला बाळ होणार आहे म्हणून आली ती, मला काकूनि (म्हण्जे माझ्या आईने ) सांगितल"
काकू लगेच मझ्या आईला विचारायला आल्या "काहो तुम्ही सांगितली नाही good news मला"
आईला चक्रवायला झाल की सगळ्यांना माहीती आहे आणि तिला नाही...आणि ती पण मला लगेच विचारते..."का ग तू नेमकी का आली आहेस भारतात?"
गोष्ट पसरण्या आधी सगळ्यांच शंका निवारन केल...पण लहान मुलांन कस सुचत हे सगळ?
ठमे, माझ्या लेकीनेही वात आणला
ठमे, माझ्या लेकीनेही वात आणला होता की बाबाला पण दुदू आहे नि तुला पण मग आकारात फरक का?
अस्मादिक - तो बॉय आही नि ममा गर्ल आहे.
लेक - स्वतःला बघून मग मी पण बॉय आहे.
अस्मादिक - नाही ग! तू छोटी गर्ल आहेस.. मोठी गर्ल झालीस की तू ममासारखी होणार.
हे सगळे सुदैवाने बाथरुमात झालं.. हुश्श्य!
नंतर वेगळा एपिसोड.. बाबा माझा नवरा का नाही? आपण दोघी एकच नवरा "ठेवूयात" (?)
अस्मादिक - अग प्रत्येकीचा वेगळा नवरा असतो.. मी बघितलं की तो चांगला बाबा आहे का? आणि मग त्याला नवरा केला.
ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम-
माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई - गोड आहे हा तुझी मुलगी!
कन्या - मी मुलगी नाहिये.. छोटी गर्ल आहे, मोठी गर्ल झाली की मी ममासारखी होणार. (इथे हाताने ममासारखी म्हणजे कशी हे दाखवणे) मग मला नवरा मिळणार, पण मी आधी बघणार तो बाबा होउ शकतो का ते.. मग मी त्याला नवरा करणार!
हे धरणीमाते...
जाजु,
जाजु,
जाईजुई हसुन हसुन मेले मी.
जाईजुई हसुन हसुन मेले मी.
देवा ...काय अवस्था झाली असेल ना तुमची...
त्याच मैत्रिणीचे नाव शिल्पा
त्याच मैत्रिणीचे नाव शिल्पा आहे.. तिला "शिल्पा.. शिल्पा की जवानी" अशी हाक मारली तिने त्या दोन दिवसात.. मला वाटते आता ती कधीच आम्हाला टेलफर्टला बोलावणार नाही.
सांगीतलं ना - हे धरणीमाते.. पूर्णवेळ मी धरणीमातेचीच आळवणी करत होते!
भारीच किस्से! असाच नुकताच
भारीच किस्से!
असाच नुकताच घडलेला एक किस्सा.
आमच्या मेसवालीची चिमुरडी. वय वर्षे ६-७.
तिची आई स्वयंपाकघरात डबे भरत होती, बाहेर हॉलमधे आम्ही दोघे-चौघे टिव्ही बघत डब्याची वाट पाहत बसलेलो.
ही दारातूनच ओरडत आली,
"आई, लवकर बाहेर ये, तुला कुणीतरी पाहूणे बघायला आलेत"
जी आमच्यात खसखस पिकली ते पाहून बिचारी बाई गोरीमोरी होत आल्या पावली पुन्हा स्वयंपाकघरात पळाली!
पण मी आधी बघणार तो बाबा होउ
पण मी आधी बघणार तो बाबा होउ शकतो का ते.. मग मी त्याला नवरा करणार! >>>>

जाजु
(No subject)
जाईजुई
जाईजुई
माझी पुतणी चार वर्षाची
माझी पुतणी चार वर्षाची असतानाचा हा किस्सा-
तिला माझ्या आजेसाबा अजिबात आवडत नाहित (का नाहि आवडत हा आमच्या घरात वादाचा मुद्द्दा आहे)
खर तर त्या अत्यंत साध्या आहेत. एकदा पुतणी आणि त्या भांड्त असताना, तिचि उलटी उत्तर ऐकुन माझ्या जावेने तिला एक धपाटा लगावुन दिला. काहि वेळाने तिचे रडणे शांत झाल्यावर ती आजेसाबा कडे जावुन म्हणालि, "झाले तुमचे समाधान आता".
अजुन एक,
एका समारंभात आमचे एक स्नेहि काहि वेळ गप्पा मारल्यानंतर जायला निघाले, जाता जाता त्यांनी माझ्या भाचीची छोटिशी पपी घेतली. ती लगेच सगळ्यांसमोर "अय्या माझे बाबा पण माझ्या आईची अशीच पप्पी घेतात" माझा चुलत भाउ आणी वहिनी एकदम गोरेमोरे!!!
अय्या माझे बाबा पण माझ्या
अय्या माझे बाबा पण माझ्या आईची अशीच पप्पी घेतात>>> भयंकर!
जाईजुई>>>
सगळे किस्से भन्नाट ! जाईजुई
सगळे किस्से भन्नाट !
' एकत्रित परिणाम ' वाचून अजून हसू थांबत नाहीये 
जाईजुई
सगळेच किस्से भन्नाट! जाजु,
सगळेच किस्से भन्नाट!
जाजु,

माझी लेक मागच्या वर्षी मला एकदा म्हणाली, मला बाळ नकोय! तिला विचारले का? ती म्हणाली, बाळ आणण्यासाठी मला २-३ दिवस दवाखान्यात रहावे लागेल ना? मला बाबांना, तुला, राधाला सोडुन नाही रहाता येणार एवढे दिवस! I will miss my family!
वरचे काहिंचे किस्से वाचून इथे
वरचे काहिंचे किस्से वाचून इथे स्वतःच्या पोरांचेच किस्से अपेक्षित नाहीत असे समजून लिहिते,
माझ्या मावसबहिणीचा बघण्याचा कार्यक्रम होता आमच्या घरी. मोठी मावसबहिण आपल्या ३ वर्षाच्या मुलीला व लहान बहिणीला (जिचे लग्न ठरत होते) घेवून रहायला आलेली. एकंदरीत बहिणीची हि गुड्डी(तिचे नाव) खूप हुशार आहे. तिला आपल्या वस्तु जपून ठेवायची भारीच हौस दिसली ह्या दिवसात.. अगदी आपल्या आईची पिन,पर्स कुठली वगैरे. डे केयर मध्ये जायची तेव्हा ताईने बरेच ट्रेनिंग दिलेले, आपल्या वस्तु जपायच्या, दुसर्यांच्या वस्तुला हात नाही लावायचे वगैरे.
दुसर्या मावस बहिणीला ठरलेला मुलगा आलेला घरी, हि दुसरी का तिसरी भेट होती. बोलून झाले कि फिरायला जावू बाहेर असे ठरलेले त्यांचे व तसे ते निघतच होते, पण चहा पित होते म्हणून थांबलेले. छोट्या ताईने तिच्या ताईचा(गुड्डीच्या आईचा) एक छानसा चुडीदार घातला जो तिला आवडलेला. चहा पिता पिता गप्पा चाललेल्या, ह्या गुड्डी बाईसाहेब झोपलेल्या आत बेडरूममध्ये. मोठी मावसताई व आई किचनमध्ये आवरत होत्या.


हि उठल्या उठल्या हॉलमधून आवाज येत होता म्हणून तिच्या आईला शोधत गेली. माझी बेडरूम तिरकी होती मी सहज बघत होते.... तिथे हिने दोन एक मिनिटे निरिक्षण केले की तिच्या मावशीने हिच्या आईचा चुडीदार घातलाय.. झाले..
इतका भोंगा पसरला की माझ्या आईचा ड्रेस तू का घातलास.. तुझे कपडे तू घाल...आताच काढ वगैरे. मग तिच्या आईला शोधत किचनमध्ये जावून सांगितले, मावशी तुझा ड्रेस घालून चाललीय.. तुला आता तुझा ड्रेस मिळणार नाही.
तिला मोठी ताई समजावतेय, अग काय झाले...मावशी आहे ना आपली तर हि लगेच, तुच म्हणालीस ना आपण दुसर्यांच्या वस्तु घ्यायच्या नाहीत मग मावशी का घेतेय?
शेवटी ताईला ड्रेस बदलूनच जावे लागले. तो सगळा प्रकार त्या मुलासमोर झालेला म्हणून छोटी ताई वैतगली. लग्न झाल्यावर ते चिडवत होते , हिला अशीच दुसर्यांच्या वस्तु घ्यायची सवय आहे ना..
मुलांची मेमरी खूप सॉलीड असते.
ह्याच चिमुरडीबरोबर माझे सुद्धा भांडण झालेले त्या दिवसात. तिच्या आईची एक बटरफ्लाय क्लिप होती केसांची, तिचा रंग काळा तर माझीही सेम राखाडी. एकदा मी माझीच लावून चाललेली तर पुन्हा तीच रडारड... मी गमतीने भांडले कशावरून तुझ्या आईची आहे. ताई बाहेर गेल्याने ह्या बाईसाहेबांनी ताईला सेल वरून फोन करून मम्मी तुझी क्लिप ब्लॅक आहे का ग्रे विचारून खात्री केली मग मला जावू दिले.
मी म्हणायची ताईला , काय पोलिस आहे ग घरच्या घरीच तुझ्या. बरेय तुला.
सगळेच किस्से एकदम धम्माल
सगळेच किस्से एकदम धम्माल
माझ्या मावशीची ३ वर्षाची मुलगी मला एकदा म्हणालेली, ताई, भारतात काय शाळा नाहीत का? तू तिकडे बाहेरच्या देशात शिकायला जातेस उगाचच... मला थोबाडीतच बसल्यासारखे झाले एकदम... कित्ती बरोब्बर आणि मुद्द्याचं बोलली ती...
हिच चिमुरडी 'शी' झाल्यावर हातात प्लॅस्टिकची पिशवी घालून धुवत असते... म्हणते, तुम्ही सगळे घाण लोक आहात... डायरेक्ट हाताने धुता
स्वच्छतेची बीजं तिच्यात अशी लहानपणीच रुजलेली आहेत. 
अजून एक किस्सा माझ्या छोटुकल्या मावसभावाचा. कोणीतरी वर लिहिलाय त्याला सिमिलर आहे. एका ताईच्या लग्नात जमलेल्या वर्हाडी मंडळींमध्ये बरेच नवीन लोक होते. आम्ही सगळे गाणी म्हणत होतो. एका चुणचुणीत मुलाला आम्ही गायचा आग्रह केला. हा पठ्ठ्या इतका अनुनासिक...की हिमेशलाही लाजवेल... तो इतका सिन्सियरली गात होता, की आम्हाला आमचे हसू दाबण्याची भयाण कसरत करावी लागत होती. मी आणि माझी बहिण जमिनीकडे बघून खुद्खुदत होतो.. एकमेकींकडे पाहिले असते तर हसू दाबणे अशक्य झाले असते. तितक्यात माझा मावसभाऊ इतका जोरात हसायला लागला आणि त्याला वरताण म्हणजे त्या मुलाच्या स्वरात गायलाही लागला... मग सगळेच हसायला लागले. तो गाणारा मुलगा बिचारा लाजून गोरामोरा!!! मुळात त्याला आपल्याकडून काय चुक झाली तेच समजेना
माझ्या मावस दिराला मुलगी
माझ्या मावस दिराला मुलगी बघायला गेले असतानाचा किस्सा.. पाहुनचार झाल्यावर मुलीचा फोटो आणून दाखवला.. सगळे जण आपले छान आहे फोटो अस कौतुक करत होते.. तर बरोबर आलेला ननदेचा छोटा म्हणतो " हं फोटोत दिसतात छान नंतर बघितल्यावर काहीपण असतात " सगळयांचे चेहरे असे गोरे मोरे झालेले... कसातरी आजकालची मूल पण ना भलतीच आगाउ म्हणून वेळ मारुन नेली ..
हा माझ्या मामेबहीणीचा
हा माझ्या मामेबहीणीचा किस्सा.
माझे सासरे चेहर्यावरुन खुप कडक वाटतात त्यामुळे त्यांच्याशी जरा जपुनच सगळे बोलतात. माझ्या साखरपुड्यादिवशी कार्यक्रम झाल्यावर सगळे मोठे अंगणात गप्पा मारत बसले होते तिथे माझ्या सासर्यांना जाऊन बहिणीने विचारले कि आवडली का साखर तुम्हाला? तुम्हाला माझ्या आत्याने कसले साखरेचेपुडे द्यायला बोलावल आहे ना ते घेऊन जावा पण आमची ताई तुमच्याइकडच्या कोणाबरोबर बाहेर गेली आहे ना त्यांना सांगा की ती आम्हाला हवी आहे पुड्याबरोबर घेऊन नाही जायची. (जेव्हा आम्ही दोघे देवाला गेलो होतो.)
आणी लग्नात हातात हळकुंड बांधताना म्हणते तो तुमचा फ्रेंडशिपबॅन्ड आहे का?आणी तिला कुणीतरी सांगितले की ताई सासरी जाणार आहे तर म्हणते आत्ताच्याआत्ता माझ पण लग्न करा मला पण लगेच जायच आहे.
जाईजुई
जाईजुई
>>>> मुलांना सरसकट
>>>> मुलांना सरसकट कार्टा/कार्टी असे शब्द वापरले जातात. पण त्याचा अर्थ अनौरस पुत्र / कन्या असा होतो. <<<
ललिता, तुला "करण्टा" या शब्दाविषयी सान्गायचे आहे का? करण्ट्या वा कपाळकरण्ट्या व "कार्ट्या" यात बोलिभाषेत अर्थात फरक आहे असे मला वाटते.
लिंबुला अनुमोदन. जाजु किस्सा
लिंबुला अनुमोदन.
किस्सा सुपर आहे.
जाजु
प्रित, तुमचा काहीतरी गैरसमज
प्रित, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी नि:ष्कर्ष काढलेला नाहीये, आनन्द वगैरे होण्याचे त्याहून दूर.
दोन स्पेसिफिक उदाहरणान्मधे मला जे जाणवले ते संयत शब्दात मान्डले आहे की भाषाविषयक दरीमुळेदेखिल असे प्रश्न्/प्रसन्ग/वाक्यरचना उद्भवु शकते का! "नॉट इन्व्हायटेड" या मुळे मला ही शन्का तीव्रतेने आली.
बाकी तुमचे चालुद्यात, छान आहेत किस्से!
जाजु तुझे किस्से सुपरफास्ट
जाजु तुझे किस्से सुपरफास्ट आहेत,

निमो... ____/\____
जाईजुई :हहगलो:
जाईजुई :हहगलो::हहगलो::हहगलो:
कारटा या शब्दाचा अर्थ बहुतेक
कारटा या शब्दाचा अर्थ बहुतेक स्मशानात राहून तिथले काम करणारा असा काहीसा होतो!
जाईजुई सही किस्से लिहीलेस.
जाईजुई सही किस्से लिहीलेस.
तद्दन फालतुपणा सुरू होतो आहे
Pages