Submitted by रामकुमार on 20 March, 2011 - 15:28
लाख जुन्या त्या सुरुवातींवर
नवी सुरुवात करावी लागेल
खूप उशीर होणापूर्वी
लगेच सुरुवात करावी लागेल!
शेतकरी मी स्वप्ने पाही
कधी न भरल्या कोठाराची
नवे कर्ज अन् जुने बियाणे
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
ग्रंथही सारे कालच मिटले
फोल!रितेपण त्यांचे कळले
पण धूळ तयांवर जमण्यापूर्वी
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
संकट येई मानवनिर्मित
नैसर्गिक वा लाटा येती
खेळ मांडण्या नवा वाळुचा
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
अंतरातला देव येतसे
परत फिरूनी जाण्यासाठी
त्याच्या येण्याकरिता क्षणभर
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
रामकुमार
गुलमोहर:
शेअर करा
छान सुरुवात आहे..
सुरेख़ मनाला भावली.
सुरेख़
मनाला
भावली.
धन्यवाद मुक्ता,
धन्यवाद मुक्ता, पवन!
दोघांचेही आभार
रामकुमार - डावा झालो रस्ता
रामकुमार -
डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
छान लिहिले आहे.आवडले.पु.ले.शु.
मस्त
मस्त
एकदम झक्कास
एकदम झक्कास सुरुवात......
डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!>> मस्तच....
ग्रंथही सारे कालच
ग्रंथही सारे कालच मिटले
फोल!रितेपण त्यांचे कळले
पण धूळ तयांवर जमण्यापूर्वी
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
खरंय! चांगली सुरुवात.
''पुन्हा सुरुवात करावी ''या
''पुन्हा सुरुवात करावी ''या विचारालाच खूप खूप शुभेच्छा .सगळ्या कडव्यातल लॉजीक मस्त जमल आहे .
कविता आवडली .
खूप उशीर होणापूर्वी लगेच
खूप उशीर होणापूर्वी
लगेच सुरुवात करावी लागेल!
जबरी ...!!!!
शेतकरी मी स्वप्ने पाही
कधी न भरल्या कोठाराची
नवे कर्ज अन् जुने बियाणे
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
हा तर कालचा धोनीचा सिक्सर
डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
प्रचंड टाळ्या..
गझलियत ठासून भरलेली कविता !!