रंगताना रंगामध्ये
यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे.....!
कान्हा, आतातरी थांब ना रे.....!
अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II
माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?
कसे ना मला आज कोडे सुटे?
ऐसेकैसे तरंग मनाशी उठे?
मनाशी उठे! मनाशी उठे!!
अरे सांग गिरिधारी केली काय जादूगिरी?
रंगामध्ये न्हाऊनिया का हसतो मुरारी? ...II१II
हातून सुटली कशी? घागर पडली कशी?
खोल पाण्यात जाऊनी बुडली कशी?
डोईवरचा पदर खांदी आला कसा?
रंगी रंगताना रंगात रंगला कसा?
रंगला कसा! रंगला कसा!!
अरे सांग गिरिधारी केली काय चमत्कारी?
रंगामध्ये भिजवली साडी चोळी सारी ...II२II
रासलीला कशा? तुझे रंग कसे?
सार्या गोकुळी आमुचे झाले हसे
रोज येते अभय पाणी भरण्यामिषे
तुझ्याप्रितीचे अजब बुलावे कसे?
बुलावे कसे? बुलावे कसे?
अरे थांब गिरिधारी झाली पुरी प्रितखोरी
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी ...II३II
गंगाधर मुटे
.......................................................
मुटेजी -छान .अप्रतिम.!!
मुटेजी -छान .अप्रतिम.!!
मस्त गाणं आहे..
मस्त गाणं आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहे ! -हरीश
भारी आहे !
-हरीश
कविता आवडली .
कविता आवडली .
मुटेजी, छान रंगलेली कविता
मुटेजी,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रंगलेली कविता !
होळी है !
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग बरसे .........!
मुटे साहेब, अप्रतिम जमली आहे
मुटे साहेब, अप्रतिम जमली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुटेजी, नेहमी प्रमाणे
मुटेजी, नेहमी प्रमाणे अप्रतिम............
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर्वांचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा
"रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी"
.... छानच
>>>रंगामध्ये भिजुनिया तू
>>>रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी ....
हेच खरे सत्य!
मुटे महाराज, होळीचं टयमिंग साधून टाकलेली कविता जाम आवडली ...! धन्यवाद!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर्वांचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होळीच्या शुभेच्छा
होळीच्या शुभेच्छा
छान आहे.
छान आहे.
Please check this Poetry
Please check this Poetry contest
, I am sure you would be interested in this
join group CHAUFULA - 2011 on facebook
http://www.wix.com/ankulkarni/chauphula
मुटे जी: सह्ह्हीच गाणे आहे.
मुटे जी:
सह्ह्हीच गाणे आहे. मस्तच चाल. सुंदर वर्णन.
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी ...II३II
यालाच म्हणती कृष्णलिला.सुंदर.
होळीच्या हार्दीक शभेच्छा!
होळीच्या हार्दीक शभेच्छा!
कान्हा मारू नको पिचकारी
कान्हा मारू नको पिचकारी
कान्हा मारू नको पिचकारी
कान्हा मारू नको पिचकारी