Submitted by संकल्प द्रविड on 17 March, 2011 - 03:14
यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी विकिपीडियावर पार पडलेल्या संपादनेथॉनेपासून बर्याच सदस्यांचा, आणि त्यातही मायबोलीकर सदस्यांचा विकिपीडियावरील सहभाग वाढला आहे. त्या सहभागाची खुद्द मायबोलीवर नोंद घेतली जावी आणि विकिपीडियावर चालू असलेल्या घडामोडींची, सध्या 'हॉट अॅक्टिव्हिटी' चालू असलेल्या लेखांची माहिती पोचवावी (आणि मायबोलीकरांचा सहभाग वाढावा ), म्हणून ही 'विकिपीडियाची रिक्षा'.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> चिमणराव, लिहा तर खरं आधी
>> चिमणराव, लिहा तर खरं आधी (शंका अन प्रश्नांमध्येच फार अडून राहू नका ).
कारण, असं पूर्वी झालेलं आहे माझ्या बाबतीत. रिव्ह्यू करणार्याने मी लिहीलेल्या एका लेखातले (विकीपिडियावर नाही) इंग्रजी शब्द काढून मराठी प्रतिशब्द भरले. त्यामुळे तसं लिहीण्यामागचा माझा उद्देश बोंबलला.
मला तुझं मत समजलं कि मग चावडीवर विचारेन.
मी पहिल्यांदा हा बीबी बघितला
मी पहिल्यांदा हा बीबी बघितला तेव्हा फक्त चित्रच होते. आता फार मोलाची भर पडलेली दिसतेय.
छान वाटलं.
मस्त माहिती आणि उपक्रम,
मस्त माहिती आणि उपक्रम, संकल्प. धन्यवाद.
याआधी अनेक वेळा विकीपिडिया बघूनही तिथे लिहावे कसे, ते कळत नव्हते. आता मलाही तिथे जमेल तशी भर घालायची इच्छा आहे.
यापुढेही तिथे चांगलं काम तुझ्या हातून व्हावं, यासाठी शुभेच्छा.
गेल्या महिन्याभरात
गेल्या महिन्याभरात विकिपीडियावर माहितीची दणदणीत भर पडली आहे. लक्षणीय भर पडलेले आणि माझ्या निरीक्षणास आलेले (काही लेख नजरचुकीने निसटले असण्याची शक्यता दाट आहे
) लेख खाली नोंदवले आहेत :
अभियांत्रिकी/तंत्रज्ञानविषयक
अंकीय संदेश
अनुरूप संदेशवहन
ऐरण
लोहार
विंडोज एक्सपी
हातोडा
व्यक्ती/चरित्रविषयक
अण्णा हजारे
ऊर्मिला मातोंडकर
केशव सीताराम ठाकरे
कोंग ली
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ हरी देशमुख
चंद्रकांत कामत
जे.के. रोलिंग
जॉन अपडाइक
जॉर्ज ऑर्वेल
जॉर्ज डब्ल्यू. बुश
ताराबाई मोडक
पंडिता रमाबाई
पांडुरंग सदाशिव साने
प्र.के. घाणेकर
प्रशांत पांडव
बाबा आमटे
बुल्ले शाह
भरत कामत
भाऊराव पाटील
भीमराव पांचाळे
महादेव गोविंद रानडे
माजिद माजिदी
रघुनाथ धोंडो कर्वे
रानिल विक्रमसिंघे
राम गणेश गडकरी
विल्यम जेफरसन क्लिंटन
विल्यम डॅलरिंपल
शांतलिंगस्वामी
सावित्रीबाई फुले
सुश्मिता सेन
जीवशास्त्र/वैद्यकशास्त्र/आरोग्यविषयक
अँजिओप्लास्टी
जीनोम
डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल
बोंबील
लॅपरोस्कोपी
वड
होमिओपॅथी
युद्धतंत्रज्ञान/युद्धविषयक
एमएम-१०४ पेट्रियट
पहिले आखाती युद्ध
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
हार्पून (क्षेपणास्त्र)
विज्ञान/हवामानशास्त्र/भूगोलविषयक
एफाटे
चंद्रग्रहण
नाणेघाट
फोंडा
मिसिमा द्वीप
षा'न्शी
सापेक्ष आर्द्रता
हवामानशास्त्र
आहारविषयक
चीझ
मायाळू
संस्कृति/भाषा/इतिहास व अन्य सामाजिक शास्त्रे
चातुर्मास
पहिला उंबेर्तो, इटली
फारसी भाषा
भारतीय सौर कालगणना
राष्ट्रीय भाषा
सातवाहन साम्राज्य
संस्था/संकीर्ण
विद्यापीठ अनुदान आयोग
येवां, विकिपीडिया आपलाच असां.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47348#comment-3013284
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत.
२७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे.
Pages