Submitted by संकल्प द्रविड on 17 March, 2011 - 03:14
यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी विकिपीडियावर पार पडलेल्या संपादनेथॉनेपासून बर्याच सदस्यांचा, आणि त्यातही मायबोलीकर सदस्यांचा विकिपीडियावरील सहभाग वाढला आहे. त्या सहभागाची खुद्द मायबोलीवर नोंद घेतली जावी आणि विकिपीडियावर चालू असलेल्या घडामोडींची, सध्या 'हॉट अॅक्टिव्हिटी' चालू असलेल्या लेखांची माहिती पोचवावी (आणि मायबोलीकरांचा सहभाग वाढावा ), म्हणून ही 'विकिपीडियाची रिक्षा'.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या तीन आठवड्यांमध्ये
गेल्या तीन आठवड्यांमध्ये श्यामली, क्षिप्रा, श्रद्धा, मी आणि अभय नातू या मायबोलीकरांनी विकिपीडियावर विविध लेखांमधील माहितीत भर घातली. या अवधीत बर्यापैकी माहिती नोंदवलेले/ भर पडलेले लेख खाली नोंदवले आहेत. (अर्थात, हे लेख यापुढेही वाढत, बदलत जातील; त्यामुळे ही यादी केवळ गेल्या तीन आठवड्यांमधील लक्षणीय कामाच्या निकषावरच बेतलेली आहे. शिवाय ही यादी व्यक्तिश: माझ्या निरीक्षणावर आधारित असल्यामुळे या अवधीतले काही सक्रिय लेख नजरेतून निसटले असण्याचीही शक्यता आहे.)
अणुभट्टी
अपूर्वाई
अरुण म्हात्रे
अशोक नायगावकर
अशोक बागवे
अॅन बुलिन
आयन रँड
आंत्रपुच्छ
इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी
करवत
कार्ले
काळा समुद्र
किशोर कदम
कुर्हाड
कॉरल समुद्राची लढाई
कोयता
गदा
चंद्रपूर किल्ला
चौदावे दलाई लामा
जायफळ
जेम्स जॉइस
त्सुनामी
दयामरण
दुसरा चंद्रगुप्त
दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली
द्राविड विद्या
नलेश पाटील
निरंजन उजगरे
पूर्वरंग
फुकुशिमा
फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प
बीटल्स
भाजे
मनोरमा श्रीधर रानडे
महेश केळुस्कर
मिठाचा सत्याग्रह
मुलाखत
मोडी
यकृत
लहान आतडे
शाळा (कादंबरी)
शाह जहान
श्रीधर बाळकृष्ण रानडे
साप्ताहिक विवेक
सिटी ऑफ लंडन
हिंदुकुश पर्वतरांग
अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा !
अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा !
अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा
अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा माझ्याकडून पण!!
धन्स .. खूप खूप शुभेच्छा ..
धन्स .. खूप खूप शुभेच्छा .. तुमच्यामुळे आमच्या माहीतीतही भर पडतीये..
कौतुकाबद्दल आणि
कौतुकाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद! पण नुसतं त्यावर भागणार नाही - तुमच्याकडूनही मूठ-मूठभर माहितीची भर विकिपीडियावर पडू द्या.
रैने, तुला साहित्याबद्दल रस आहे, तर मराठी साहित्यिक, पुस्तके, अन्य भाषांमधले साहित्यिक यांच्याबद्द्लच्या माहितीत भर घालू शकतेस.
नीधप, तू वेशभूषा व कपडेपट व्यवस्थापनाबद्द्ल इकडे व प्रहारातून लिहिले आहेस; तर कापडांचे प्रकार, कपड्यांचे प्रकार यांवरच्या लेखांमध्ये माहितीची भर घालू शकतेस.
वर्षू नील, तुम्ही चीन व चिनी शहरे/ प्रांत, खाद्यपदार्थ, संस्कॄती यांबद्दल माहिती नोंदवू शकता.
दान पावलं!
खरेच कौतुक. चांगले काम करताय
खरेच कौतुक. चांगले काम करताय सगळे.
.
वा!! खूप कष्ट घेताहात
वा!! खूप कष्ट घेताहात तुम्ही.. अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
संकल्प, हे कसं करायचं मला
संकल्प, हे कसं करायचं मला कळलं नाही
तिथे जाऊन पाहिलं होतं. काम करायची इच्छा होती. सांगणार का?
लई भारी..... आम्ही पण करणार
लई भारी..... आम्ही पण करणार "दान" लवकर "योग" यावा ही अपेक्षा (स्वतःकडेच)...
संकल्प मलाही कळव कसा हातभार
संकल्प मलाही कळव कसा हातभार लावता येईल ते.
संकल्प, भर घालायला आवडेल पण
संकल्प, भर घालायला आवडेल पण जरा सविस्तर इथे सांग ना कसं करायचं ते. म्हणजे विकी फॉर डमीज टाइप.
शैलजा आणि इतर अवघड नाहिये हे
शैलजा आणि इतर अवघड नाहिये हे नक्की, सुरवात करा वाटाडे आहेतच
अगं, कुठे आणि काय सुरुवात
अगं, कुठे आणि काय सुरुवात करु?
तिथे लॉग इन करा, विकी चाळा,
तिथे लॉग इन करा, विकी चाळा, अर्धवट असलेले कितीतरी लेख आहेत, भर घालायचेपण लेख आहेत. इथे दिलेल्या धूळपाटीवर लिहून बघा, तुमचे इंटरेस्टस शोधा, त्यातले लेख पूर्ण करायचे आहेत का? अपूर्ण दिसेल ते पूर्ण करा.
उदा: शैलजा तू गोवा शोध आणि त्यासंदर्भात तिथे तुला काय काय सापडतय ते बघ. अपूर्ण लेख मिळाले की पूर्ण करायला घे.
मी पण चाचपडतेच आहे अजून, पण थोड थोड जमतय.
सविस्तर माहिती संकल्प देईलच.
धन्यवाद! >> म्हणजे विकी फॉर
धन्यवाद!
>> म्हणजे विकी फॉर डमीज टाइप <<
चांगली सूचना आहे. त्या अनुषंगाने इथे काही थोडक्या गोष्टी सुचवतो :
* विकिपीडिया काय आहे ? त्याचा मला काय उपयोग ?
) आणि त्यात भर घालण्यास, माहिती/दर्जा सुधारण्यासही सर्वांना मोकळीक असते. मराठीसह इंग्लिश व जगभरातील २६०+ भाषांमध्ये विकिपीडिया प्रकल्प चालू आहेत. इंग्लिश विकिपीडिया हा सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मोठा व आशयसंपन्न ज्ञानकोश असून त्यात ३५ लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. मराठी विकिपीडिया तुलनेने बाल्यावस्थेत असून त्यात सध्या ३२,०००+ लेख आहेत.
सोप्या भाषेत सांगायचं तर विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. त्यातली माहिती तुम्ही मोफत वाचू शकता (टोल फ्री
विकिपीडियाचा उपयोग सुचेल तेवढ्या अनंत मार्गांनी होऊ शकतो. समजा, तुम्हांला वळू या मराठी चित्रपटाविषयी किंवा शाळा या मराठी कादंबरीविषयी माहिती हवी असेल, तर ती तुम्ही विकिपीडियावर शोधू शकता. किंवा इजिप्तातल्या घडामोडींविषयी काही माहिती जाणून घेताना/ लेख लिहिताना संदर्भ म्हणून माहिती शोधायला मला होस्नी मुबारक या लेखाचा उपयोग होऊ शकतो. एखाद्याला चंगीझ खानाविषयी एकाच ठिकाणी सर्वंकष, तरीही वाचण्याच्या दृष्टीने आटोपशीर विस्ताराची माहिती हवी असेल. तर अशी माहिती विकिपीडियावर मिळायची शक्यता दाट असते.
* विकिपीडियावर मी कोणत्या प्रकारे सहभाग घेऊ शकतो/शकते ? मला कोणत्या मार्गांनी या उपक्रमास मदत करता येईल ?
मराठी विकिपीडियाला मदत करण्याचा सर्वांत परिणामकारक आणि सोपा मार्ग म्हणजे आवडेल त्या विषयावर, जमेल तेवढी आणि जमेल तशी माहिती भरत राहणे.
पहिली पायरी, म्हणजे मराठी विकिपीडियावर साइनप करून एक सदस्य खाते उघडायचे. त्यानंतर लॉगिन होऊन पाहिजे त्या विषयावर माहिती भरायला तुम्ही मोकळे! म्हणजे, समजा तुम्हांला तोक्यो शहराविषयी किंवा नऊवारी साडीविषयी माहिती भरायची असेल, तर मराठी विकिपीडियाच्या कोणत्याही पानावर वरच्या भागात उजवीकडे जी शोधपेटी दिसते, त्यात त्या विषयाचे कीवर्ड टाकून लेख शोधायचा. लेख सापडला की त्या लेखाच्या पानावर माथ्यावरच्या रांगेत "चर्चा, "संपादन", "इतिहास" असे टॅब दिसतील, त्यातल्या "संपादन" टॅबावर जाऊन लेखातील माहिती एडिट करायची. लेख संपादून झाल्यावर त्याची झलक पाहायची आणि जतन करायची मायबोलीवरील एडिट विंडोप्रमाणेच सोय आहे.
संपादन टॅबाखेरीज अन्य टॅबांवर टिचक्या मारून बागडून पाहिलंत, तर त्यांच्याबद्दलही माहिती आपसूक उमगेल. उदाहरणार्थ, "इतिहास" टॅबावर गेलात तर त्या लेखाच्या आजवरच्या सर्व आवृत्त्यांचे आर्काइव्ह दिसतील. आणि "चर्चा" पानावर गेलात, तर त्या लेखाच्या अनुषंगाने सदस्यांनी विविध पैलूंवर केलेला उहापोह, टिप्पण्या, वाद-विवाद रंगलेले दिसू शकतील.
* छे! हे प्रकरण भलतंच काँप्लेक्स दिसतंय. मला मोठमोठाले लेख लिहिण्याइतपत माहिती लिहिता यायची नाही... जाऊ दे, हे कार्य नव्हे मजजोगे
नवागत सदस्यांना काही वेळा नवीन-नवीन गोष्टी पाहताना बिचकायला होते, आणि वर लिहिल्यासारखा विचार मनात येऊ शकतो. पण, थांबा! विकिपीडियावर तुम्ही एखाद्या गोष्टीतले "तज्ज्ञ" असायला हवे, अशी पूर्वअट नाहीच्चे मुळी. तुमच्याकडे दोन-तीन वाक्ये लिहिण्याएवढीच माहिती आहे का ? नो प्रॉब्ज. तेवढीशी माहितीदेखील इतर वाचकांना "काहीतरी नवीन कळल्याचं समाधान" देऊ शकते. त्यामुळे बिनधास्त लिहा. फक्य एक-दोनच पथ्ये तेवढी पाळायची :
* ते सारं ठीक आहे. पण सुरुवात कुठून करू ?!
बाकी, मागे झालेल्या मराठी भाषा दिनाच्या संपादनेथॉनेसंबंधाने दिलेल्या काही उपयुक्त सहाय्य पानांचे दुवे पुन्हा देतो. (टाळाटाळ न करता
) जरूर वाचा :
* विकिपीडिया:परिचय
* विकिपीडिया:सफर
* सहाय्य:संपादन
* विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे
* विकिपीडिया:टाचण (चीटशीट :फिदी:)
आणिक काही, मदत लागल्यास मला इथे कळवा. किंवा विकिपीडियाच्या चावडीवर (= कट्ट्यावर) कळवा.
श्यामले, रिक्षा फिरवायला मदत
श्यामले, रिक्षा फिरवायला मदत करतेस, हाडाची प्रचारक झालीस गो तू.

कांद्या, जपानावर सूट तू.
चिमणराव, शैलजा, तुम्हीदेखील वर लिहिलेल्या सूचनांनुसार आपापल्या पसंतीच्या विषयांवरील लेख शोधून दोन-चार शब्द लिहू शकता.
एका वेळेस तुम्ही शब्दश: दोन-चार मोलाची माहिती सांगणारे शब्द किंवा एखादे वाक्य भरूनदेखील ते सेव्ह केले, तरीही हरकत नाही. दिवसातून पाच मिनिटे काढून दोन वाक्ये भरलीत, तरीही हरकत नाही. मूठभर, चिमूटभर, आपल्या सर्वांसाठी आपणच दान द्यायचं, आणि आपणच त्यावर ताव मारायचा.
दान पावलं म्हणा.
सुरेख माहिती संकल्प. मला एक
सुरेख माहिती संकल्प.
मला एक प्रश्न असा आहे - समजा मला एखाद्याविषयावरची इंग्रजी विकिपिडियावर असलेली माहिती मराठीत भाषांतरित करायची असेल तर मी ते करू शकते का ? यात कॉपीराईट वा इतर काही मालकी हक्काची अडचण येऊ शकते का ?
धन्यवाद संकल्प. हे वेगवेगळे
धन्यवाद संकल्प. हे वेगवेगळे संदर्भ पाहून नक्की काम करेन ह्यावर.
नाही, कारण विकिपीडियावरील
नाही, कारण विकिपीडियावरील माहिती मुक्त आहे, त्यामुळे तुम्ही श्रेयोल्लेख (क्रेडिट देऊन) देऊन कुठेही त्या माहितीचा वापर करू शकता (संदर्भ : विकिपीडियाच्या प्रत्येक पानावर "Text is available under the Creative Commons Attribution/Share-Alike License; additional terms may apply. See Terms of Use for details." अशी सूचना लिहिलेली असते.) . इंग्लिश विकिपीडियावरची माहिती मराठी विकिपीडियावर अनुवादित करून आणायची असल्यास, काहीही अडचण येणार नाही - कारण हे दोन्ही व अन्य भाषांतले विकिपीडिया प्रकल्प विकिमीडिया फाउंडेशन या सार्वजनिक प्रतिष्ठानामार्फत चालवले जातात.
व्यक्तिश। माझे मत विचारशील, तर थेट अनुवाद करण्याऐवजी ढोबळ मानाने इंग्लिश विकिपीडियावरील माहिती संदर्भ म्हणून बघून त्यातून महत्त्वाचे मुद्दे/टिपणे आपली आपण नोंदवून घेऊन त्यावरून मराठी विकिपीडियावर माहिती भरणे अधिक जैविक (= ऑर्गॅनिक) प्रक्रिया ठरेल.
मी पण काहीतरी काँट्रिब्युशन
मी पण काहीतरी काँट्रिब्युशन करेन म्हणते. इथे लिंक देइन लवकरच.
धन्यवाद संकल्प. सध्यातरी
धन्यवाद संकल्प. सध्यातरी इंग्रजी विकिपिडियामधली माहिती वाचून त्याआधाराने मराठीत माहिती भरता येईल असं वाटतंय. आवडत्या विषयांपासून सुरुवात करायची कल्पना पण छानच.
संकल्प द्रविड ... छान उपक्रम
संकल्प द्रविड ... छान उपक्रम व माहिती.
मी सुमारे ४ वर्षापुर्वी एक-दोन पाने विकिवर मराठीत लिहिल्याचे आठवते.
तुमचे काम पाहुन आणखी भर घालेन.
हं आता कळलं.. माझ्याकडून भर
हं आता कळलं..
माझ्याकडून भर नक्की. जमेल तशी रोजची रोज नाही तरी आठवड्याला तरी नक्कीच टाकत जाणार.
बादवे, विकिपीडियाची उपयुक्तता
बादवे, विकिपीडियाची उपयुक्तता दर्शवणारा एक अनुभव नुकताच विकिपीडियावरील एका लेखाच्या निमित्ताने कळला : 'रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द' या विषयावर एक लेख एका नवागताने बनवला. त्या लेखात माहिती नोंदवायचा प्रामाणिक प्रयत्न होता, मात्र त्या लेखाच्या विषयाची - अर्थात त्या विशिष्ट शाळेची - उल्लेखनीयता स्वतंत्र लेख बनवण्याइतपत आहे का, या मुद्द्यावरून विकिपीडियन समुदायात चर्चा चालू झाली. त्यावेळेस लेखनकर्त्या सदस्यांकडून असे कळले, की "ग्नॉलेज लॅब" (इंग्लिश: Gnowledge Lab), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, या संस्थेतील लोकांनी रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात असलेल्या बोरगाव खुर्द गावात काही मुक्तस्रोत सॉफ्टवेअरांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी माहिती पुरवण्याचा उपक्रम आरंभला आहे. त्यांनी विकिपीडियावरील माहिती शाळेतल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दाखवली, तेव्हा ते लोक माहिती वाचून खूप आनंदित झाले. त्यांनीदेखील या प्रयत्नांत आपला वाटा उचलण्यासाठी आपल्या भौगोलिकतेबद्दल, परिसराबद्दल काही माहिती भरायचे ठरवून त्यानुसार लेखाचा मसुदा बनवला. या शाळेतल्या शिक्षकांनी इंटरनेट फारसे वापरले नसल्यामुळे त्यांच्याकडे ईमेल आयडीही नव्हते; मात्र तरीही विकिपीडियाच्या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलण्याचा उत्साह आणि त्यासाठी माहितीची जुळवाजुळव करण्याची इच्छा वाखाणण्याजोगी होती. त्यांचा हा अनुभव त्यांच्याच लेखणीतून इकडे वाचा : चर्चा:रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द
असेच अनुभव मागेही काही मंडळींकडून ऐकायला मिळाले. होते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमधून अजूनही मराठी माध्यमाची पाठराखण होत असल्यामुळे तेथील शाळांकडून, विद्यार्थ्यांकडून मराठी विकिपीडियाचा वापर घडताना दिसतो. असले अनुभव आले, की कामाचा हुरूप वाढतो.. आणि उपक्रमाचं आपल्या लोकांच्या दृष्टीने काहीएक "मोल" आहे, हे जाणवतं.
मी जमेल तशी भर टाकायचा
मी जमेल तशी भर टाकायचा प्रयत्न करणार आहे..
अभिनंदन, सर्वांचे. किती करता
अभिनंदन, सर्वांचे. किती करता तुम्ही सर्वजण खरचं! अफाट!!!
मला माहितीत जरूर भर घालायची
मला माहितीत जरूर भर घालायची आहे आणि मी सदस्यत्व पण घेतलेलं आहे. पण मी 'माहिती मराठीत आणि देवनागरी लिपीतच भरायची' या सूचनेवरच अडलो. कितीतरी इंग्रजी शब्द असे आहेत की जे आपण मराठीत जसेच्या तसे वापरतो.. ज्याला मराठी प्रतिशब्द असतीलही पण वापर इंग्रजी शब्दांचाच जास्त होतो. उदा. टेबल, बँक वगैरे. अशा वेळेला मला जे शब्द वापरात आहेत तेच लिखाणात घ्यायला आवडतील. जेव्हा प्रतिशब्द उपलब्धच नसतील तेव्हा मला ते तयार करून वापरण्यात काहीही अर्थ दिसत नाही.
कारण, (१) या सर्व उपक्रमाचा उद्देश लोकांना माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी असा आहे. (२) माहिती सहजपणे समजावी असाही आहे.
जितके आपण बोली भाषेतले शब्द वापरू तितकं दोन नंबरच्या उद्दिष्टाजवळ जाऊ. यावर तुझं म्हणणं काय आहे ते सांग. उदाहरण म्हणून तूच लिहीलेला एक वरचा पॅरा खाली टाकतो.. अगदी इतकं जरी नाही तरी साधारण असं लिहीलेलं चालेल का असा प्रश्न आहे.
अर्थात, तुम्हांला कशाचंच कधीही क्रेडिट मिळणार नाही, असा याचा अर्थ नाही - कारण प्रत्येक लेखाच्या "इतिहास" टॅबावर अगोदरच्या आवृत्त्यांमध्ये तुमचा लॉगिन आयडी, व तुम्ही केलेले बदल यांची फूटप्रिंट सदैव उपलब्ध असते.
चिमणराव, लिहा तर खरं आधी
चिमणराव, लिहा तर खरं आधी (शंका अन प्रश्नांमध्येच फार अडून राहू नका
).
>> टेबल, बँक <<
हे शब्द मराठीतील व्याकरणनियमांप्रमाणे चालतात, याचाच अर्थ त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे.
बाकी, तुम्हांला शक्य असेल, तितकी माहिती भरायला लागा. हळूहळू सराव होईल. प्रश्न असतील, तर चावडीवर मांडू शकता.
क्रेडिट ला श्रेय, लॉगिन आयडी
क्रेडिट ला श्रेय, लॉगिन आयडी ला सदस्य नाम, अन फूट प्रिंट ला पाउलखुणा हे सहज समजणारे , बर्याच संस्थळावर वापरता येणारे शब्द आहेत.
टेबलला सुद्धा (माहितीचा ) तक्ता शब्द चालू शकेल
यात श्रेय असे नाही
यात श्रेय असे नाही (विकीवरच्या लेखांचे कसले श्रेय?) पण विकिवर अतिशय अॅक्टीव्ह असलेले आणि विकीचे खंदे पुरस्कर्ते सदस्य निनादचा उल्लेख तुमच्या यादीत नसलेला पाहून आश्चर्य वाटले. वरील सुमारे ४६ लेखात ९ लेख तर पहिल्यापासून निनादने लिहिलेले आहेत असे कळते. निनाद मायबोलीचा सदस्यही आहे, पण तुमच्या लेखकांत उल्लेख दिसला नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच केला.
Pages