पाव किलो हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी लाल मोहरी
एक टीस्पून हळद
दोन टीस्पून कच्चा हिंग
तीन ते चार टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मेथीदाणे
पाच-सहा लिंबांचा रस
एक टीस्पून तेल
मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.
एक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.
उरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
वरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.
काळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त.
लाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)
चवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.
लिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.
छान पाकृ. करायलाच पाहिजे.
छान पाकृ. करायलाच पाहिजे.
फेसलेलि मोहरी म्ह णजे काय
फेसलेलि मोहरी म्ह णजे काय please explain>>>
सुयोग, मोहोरी आधी मिक्सरमध्ये कोरडीच बारीक करायची मग त्यात तो कूट भिजेल एव्हढा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरात वाटायचं. त्याचा रंग बदलतो - फिका पिवळा रंग येतो, झणकाही जाणवतो. हेच ते मोहोरी फेसणं.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्तच .हे मिरचीच लोणचं
मस्तच .हे मिरचीच लोणचं किती दिवस टिकत?
फ्रीज बाहेर.
प्रभा, मी साधारण जॅमची (बहुधा
प्रभा, मी साधारण जॅमची (बहुधा ४०० ग्रॅम ची) बाटली भर केलं होतं (वर दिलेल्या प्रमाणात तेव्हढं झालं). ते महिना दीड महिना; खरंतर जरा जास्तच गेलं. फोडणी वगैरे घातली होती. फार स्ट्राँग होतं हे लोणचं. पाणी अजिबात वापरलेलं नसल्यानी भरपूर टिकेल खरंतर
आज मी हे मोहरी फेसून केलंय
आज मी हे मोहरी फेसून केलंय मिरचीचं लोणचं. एकदम टेस्टी झालंय . आम्ही कोकणात आंब्याच्या लोणच्यासाठी पाण्यात मोहरी फेसतो तसच केलं. त्यामुळे खार भरपूर सुटलाय. नेहमीचीच मोहरी वापरली पण कडू अजिबात लागत नाहीये. मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे खाऊ शकतेय आरामात.
हा फोटो
मी आजच हे लोणचं करते आहे पण
मी आजच हे लोणचं करते आहे पण माझी रेसिपी थोडी वेगळी आहे.
Pages