वड....

Submitted by उमेश वैद्य on 10 March, 2011 - 04:00

वड... (वृत्तबद्ध)
डोंगरमाथ्या वरी संपते वाट जिथे अवघड
एकाकी हा उभा कधीचा तरुराज योगी वड ||१||

पर्णांचा संभार हरित तो घेऊनी माथ्यावर
पारंब्या करड्याच केशिका लोलंगती भूवर ||२||

तोलोनि घरकुले खगांची फांद्यावरी निश्चल
पांथस्था वरी धरी कुणीअसो हा सावली शीतल ||३||

फळे लाल गोमटि देतसे पक्षा पिला खावया
पारंब्या-सूर मौज लुटविसि पोरांसी खेळावया ||४||

जेष्टाच्या मासात येतसे हरसाल वटपौर्णिमा
गाती सुवासिनी पतिव्रता सावित्रिचा महिमा ||५||

वर्षाकाळी कधी चमकते आकाशी विद्युल्लता
एखादी ती पडे तव शिरी देई तुला छीन्नता ||६||

ऐसा तू स्थितप्रज्ञ भोगिसी सुखदुख:सम भावना
देसी बहू मागिसि कधीही ना वृक्षा तुला वंदना ||७||

उमेश वैद्य २०११.

गुलमोहर: 
शब्दखुणा: