खरी खरी साथ दे (Valentine day special)
(सर्व मित्रांना प्रेमळ विनंती)
आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे
सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे
हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे
मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे
वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे
झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे
हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे
वा वा! सुंदर विचार!
(करतो बुवा मीहे!)
कविता आवडली.
अभिनंदन!
-'बेफिकीर'!
बेफिकीरजींना अनुमोदन . चहा
बेफिकीरजींना अनुमोदन . चहा पर्यंत ठिक आहे पण उपमा नाही जमत , शिरा चालेल का? चेष्टेचा भाग सोडून ,शशांक खूप दिल से जमली कविता. अभिनंदन .
"हातात हात घेतलास लग्नात, आता
"हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे"
.... हे अगदी योग्य.
समस्त नव-यांना हे सुविचार
समस्त नव-यांना हे सुविचार शिकवा! माझे तर डोळे पाणावलेत ...
हो..... म्हणुन म्हणतो
हो..... म्हणुन म्हणतो प्रत्येक नवर्यात एक प्रियकर असलाच पाहीजे..!
छान आहेत विचार.
क्या बात है! तू आदर्श पतीचे
क्या बात है! तू आदर्श पतीचे पोटेन्शियल मटेरीयल आहेस बुवा.
छान आहे, आवडली
छान आहे, आवडली
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार............
शशांक ग्रेट! मानलं
शशांक ग्रेट! मानलं तुम्हाला.क्या बात. याची प्रिंट काढून घेतोय
आणि सार्या नवविवाहिताना देतो.
माझी पत्नि परवा म्हणाली - सुना घरी आल्या रे आल्या की सास्वा कुठे कुठे शोधू तुझे दोष असं वागतात हे बदलायला हवं.