कविता अन् दाद
माझ्या प्रत्येक कवितेची पहिली वाचक
तूच........
तू कविता वाचत असतेस....
अन मी तुझा चेहरा......
तिथेच उमटतो तुझा अभिप्राय,
रुक्ष समीक्षकाचा वा उथळ रसिकतेचा आव न आणता सहज उदगारलं जाणारं... एखादं
वा....
छान...
हं...
फारंच मस्त जमलीये......
मोजकेच शब्द, पण माझ्यासाठी....जमली का नाही हे नेमके सूचित करणारे....
कधी तुला त्रस्त करते एखादी शारीरिक व्याधी
पण त्या व्याधीपेक्षा तू जास्त खिन्न होतेस माझी व मुलींची आबाळ होताना पाहून
अन्
आपसूकच होतो मी आई...
तू मुलगी....
किती कमी काळाकरता हे नातं निर्माण होतं.....
त्या निमित्ताने तुझी देखभाल करताना मला मिळतो तोच आनंद,
जो तू दररोज अनुभवत असतेस.....
तुलाही असते कल्पना माझ्यावर पडणार्या ताणाची....
आणि अगदी सहजपणे तू विसावतेस माझ्या खांद्यावर
एखाद्या बालिकेसारखी.....
विश्वासानं, कृतज्ञतेनं, निर्व्याजतेनं......
अन्
मला वाटतं.....
हीच माझ्या नव्या कवितेची सुरवात
आणि त्याला मिळालेली तुझी खरीखुरी दाद........
"What is most personal is most general" - Carl Rogers, Psychologist.
ह्म्म्म्म. शारीरिक, समीक्षक
ह्म्म्म्म.
शारीरिक, समीक्षक असे हवे.
धन्यवाद भरतदा, दुरुस्ती करत
धन्यवाद भरतदा,
दुरुस्ती करत आहे.
"हीच माझ्या नव्या कवितेची
"हीच माझ्या नव्या कवितेची सुरवात
आणि त्याला मिळालेली तुझी खरीखुरी दाद."
.... छान
तुमच्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा विषय हाताळायचा प्रयत्न चांगला जमलाय.