Submitted by पुरंदरे शशांक on 25 February, 2011 - 11:49
चांदोबाची गमाडी - गम्मत !
चांदोमामा गोलम गोल
गोल गोल ढोल मटोल
केला आईकडे हट्ट खूप
कमी झाले साखरतूप
साखरतूप कमी झाले
चांदोबा बिचारे रडू लागले
रडता रडता मुळुमुळु
चांदोबा वाळले हळुहळु
रुसुन चांदोबा दडून बसले
कोणालाही नाही दिसले
आईने पुन्हा देता खाऊ
चांदोबा हसून लागले डोकाउ
हसतात कसे ओठातून
चंद्रकोर दिसते उठून !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच!!!! आवडली रच्याकने,
मस्तच!!!!
आवडली
रच्याकने, शशांक म्हणजे चांदोबाच ना.
<< रच्याकने, शशांक म्हणजे
<< रच्याकने, शशांक म्हणजे चांदोबाच ना. >>
जिप्सी - सारखा पुण्याला येत असतोस का रे? अगदी अशी "ठेवणीतली" कॉमेंट टाकलीये ती!
पण कॉमेंट अगदी दाद देण्यासारखी.....महामिष्किल !!!!!!!!!
जिप्सी - सारखा पुण्याला येत
जिप्सी - सारखा पुण्याला येत असतोस का रे?>>>>
छान
छान
(No subject)
आवडली! छानच आहे.
आवडली! छानच आहे.
छान छान!
छान छान!
मस्त खूप आवडली
मस्त खूप आवडली
सर्व रसिकांचे मनापासून
सर्व रसिकांचे मनापासून आभार...........