प्राक्तन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तू देवदार नसतानाही
कोसळण्याची भिती न बाळगता
खडतर जमिनीच्या छाताडावर
स्वतःला भरभक्कम रोवून
उचंच उचं निळ्याभोर आकाशात
किती उंच जाऊन पोचलास!

जमिनीपासून तुझ्यामधे
किती अंतर मागे पडले
तरीही आकाश गाठायचे
स्वप्न अर्धवट राहूनचं गेले

तुझ्या पायथ्याशी वेढलेल्या
वेलींना फक्त सरपटायचे होते
सरळ-सरळ तुझ्या अंगाखांद्यावर
तेवढाचं आधार तुला हवा होता.

तुझ्या माथ्यावर उरल्या
सुकलेल्या चार फांद्या
कोर्‍या नभावर रेघ उमटवायला
कुण्या वेड्या पक्षाचं प्राक्तन
एकट्यानेचं गीत तिथे गायला!

प्रकार: