स्वातंत्र्याचा अर्थ

Submitted by शांतिनाथ वाघमोडे on 31 January, 2011 - 07:10

सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या आवडत्या ओळी देत आहे . या ओळी कुसुमाग्रजांच्या आहेत_

'विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती,
म्हणून नव्हती भिती तिजला पराजयाची.
जन्मासाठी कधीच नव्हती अडून बसली,
म्हणून नव्हती खंतही तिजला मरावयाची.'

आता माझी कविता

'स्वातंत्र्याचा अर्थ'
(अभंगात्मक रचना)

कुणीही कुणाचे
ऐकू नये काही,
हीच एक द्वाही|उठवावी.

कुणीही कुणाचे
कापावेत गळे,
आणि बळेबळे|बोंबलावे.

कुणीही कुणाला
घालाव्यात लाथा,
अनितीची गाथा|प्रसवावी.

पायामध्ये पाय
नित्य अडकवावा,
माणूस भडकवावा|धर्ममार्गी

खऱ्‍या स्वातंत्र्याचा
हाच एक अर्थ,
बाकी सारे व्यर्थ|मुर्खांसाठी.

(अगामी 'कवितेतून जगण्यासाठी...' या काव्यसंग्रहातून...)

गुलमोहर: 
शब्दखुणा: