मोडी लिपी

Submitted by अवल on 27 January, 2011 - 23:34

मोडी लिपीबद्दल आपल्याला माहिती असते पण ती नक्की कशी होती हे आपल्यातल्या नव्या पिढीतील काहींना माहिती नसते. तिची तोंड ओळख करून देण्याचा हा माझ्या अल्पमतीचा प्रयत्न. तज्ज्ञ यात अजून प्रकाश टाकतीलच.
मोडी ही एका अर्थाने मराठीची शॉर्ट हँड लिपी... खरं तर धावती लिपी ( रनिंग लिपी) . प्रामुख्याने कारभारी मंडळी ही वापरत. सरकारी कागदपत्रे राजे लोक/ वरिष्ठ कारभारी सांगत अन हाताखालील कारकून ते मोडी लिपीत भराभर लिहून काढत. शिवकाळापासून पेशवाई पर्यंतची बहुतांशी कागदपत्र मोडी लिपीत आहेत. मी एम. ए. करताना त्यातली अनेक वाहीली, वाचली. त्या वेळेस शिकलेल्या मोडी लिपीवरची थोडी माहिती आपणाशी शेअर करतेय.
ही मोडी लिपीतली बेसिक अक्षरे : पहिल्या ओळीत मोडी अक्षरे, त्याच्या खाली देवनागरी अक्षरे.


यातली शेवटच्या ओळीत मुदाहून ककाकीकुकेकैकोकौकंकः संपूर्ण लिहिली आहे. त्यावरून समजेल की ही किती क्लिष्ट लिपी आहे ते... प्रत्येक अक्षर त्याच्या आकार,इकार, उकार... इ. मध्ये बदलत जाते. त्यामुळे ही लिपी वाचणे अन लिहिणेही अनोळख्याला खुप अवघड जाते... किंबहूना वाचायची नेहमी सवय असेल तरच ती नीट वाचता येते.
तशात त्यातली काही अक्षरे अतिशय गोंधळात टाकणाती आहेत जसे कु आणि मु यात फार कमी फरक आहे. अशी अनेक अक्षरे आहेत.
तसेच ही लिपी एकाला जोडून एक अक्षरे लिहिली जात असल्याने अनेकदा दोन अक्षरे एकात एक मिसळून जातात. अन मग ती वाचणे अवघड होते.
तशात प्रत्येकाच्या अक्षरानुसार, त्याच्या वलणानुसारही ही लिपी बदलत जाते. उदा माझे आरती खोपकर हे नाव असे लिहिले जाईल :
ack.jpg
अजून माहिती हळूहळू लिहीन.

{मोडी लिपीचा इतिहास http://www.maayboli.com/node/22813 इथे आहेच, म्हणून वर नाही लिहिला :)}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान..माझे आजोबा मोडी लिपीतच लिहीत ,,बिना रेघेच्या कागदावर त्यांचे मोडी त लिहीलेले सुंदर्,रेखीव ,काळ्या शाईने बोरुने लिहीलेले आठवते..ती आठवण झाली..मी मुळाक्षर लिहुन घेतली आहेत..आता ३ व ४ अक्षरी शब्द लिहीशील का?

हो गं, मोडी रेघेवर नाहीच लिहित... मी आपले समजावे म्हणून रेघा आखल्या ... पण खरे तर रेघा नकोच होत्या मारयला मी.... धन्स Happy

मस्तच, शाळेत मोडी लिपिच हवी होती म्हणजे माझ्या सुंदर हस्ताक्षरासाठी ज्या शिव्या मी खाल्ल्या आहेत, त्यातल्या बर्याच वाचल्या असत्या Happy

अमित अरुण पेठे

अवल, हा दस्ताऐवजच आहे. आपण पल्ली सारख्या एखाद्या कलाकाराला विनंती करू शकतो. ती हि अक्षरे, सुलेखन पद्धतीने काढून देऊ शकेल.

मस्त

अरे वा सानी मस्त माहिती आणि साईट्सही मस्त. इथल्या वाचकांच्या सोई साठी (ज्यांना मी शिकवावं असं वातलं त्यांच्यासाठी ) एक साईट जी ती सांगीतली ती इथेच देते : http://ghates.com/modi/index.php
सानी हे बरं आहे आपणच प्रश्न विचारायचा अन मग आपणच उत्तर द्यायचं Wink
जोक अपार्ट मनापासून धन्यवाद. मला ही साईट कशी माहिती झाली असती नाही का ? धन्स Happy

सानी हे बरं आहे आपणच प्रश्न विचारायचा अन मग आपणच उत्तर द्यायचं >>> अगं अवल, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मलाच इतरत्र शोधल्यावर सापडली. मग मीच ती मायबोलीकरांशी शेअर करायला नकोत का? ज्या अर्थी इथले बरेच लोक उत्तर देत नाहीत, त्याअर्थी त्यांना एकतर त्या विषयात रस नसावा किंवा त्यांना त्यातली माहिती नसावी, असाच मी घेते.
असो, पण त्यानिमित्ताने तुला हा धागा काढावासा वाटला आणि ती लिपी जाणून घेण्यात, शिकण्यात रस असलेले लोक येथे आले, हे ही नसे थोडके. Wink

अवल खुप छान माहिती देत आहेस.
एक शंका आहे की वरती तु को काढताना क ला २दा गाठ (काय म्हणायच ) दिली आहेस मग त्या प्रमाणे मायबोली मधल बो लिहिताना मोडीतला ब आणी त्याला मात्रा दिसत आहे तिथे म्हणजे ब ह्या अक्षराला बो लिहिताना २दा गाठ द्यायची नसते का?

माझे आजोबा मोडी लिहितात.. लवकरच त्यांच्या कडून सगळी बाराखडी लिहून घेऊन इथे देतो.. कारण मोडी मध्ये कोणते अक्षर आहे त्यानुसार त्याच्या काना, मात्रा, वेलांट्या, उकार बदलत असतात.

हिरकु, मी वाट बघतोय. आजोबांनाच मोठ्या अक्षरात लिहायला सांगणार का आमच्या वतीने ?

किश्या, ही Link पहा. मागे मी माबोवर मोडी वर्गाबाबत विचारपुस केली होती.

मला मोडी शिकायची होती, पण कुठुन ते काही कळत नव्हत. एक दिवस लोकसत्ता मधे अच्युत पालव यान्च्या Calligraphy workshop ची माहीती आली. पटकन जाउन नाव नोन्दवल. दोन फायदे झाले. आता छापील मोडी वाचता येते (हस्ताक्षर अजुन वाचता येत नाही), आणि Calligraphy मुळे अक्षर सुधारले. माझ्या वहीवर कोम्बडी नाचुन गेली का? असे विचारणारे माझ्या घरचे, आता "अक्षर सुधारल हो पोराच!!!" अस बोलतात.

अनु३ ... मोडीत प्रत्येक अक्षराचा नियम वेगला आहे. म्हणजे आपण मराठीत जसे मात्रा म्हणजे प्रत्येक अक्षराला सारखीच देतो तसं नाही मोडीत. एकाला गाठ वाढवतील तर दुसर्‍याच्या मध्ये उ लिहितील.... त्यामुळे सगळी बाराखडि लक्षात ठेवावी लागते.
देते : http://ghates.com/modi/index.php
सानी इथे छान माहिती आहे. पण खरच कोणाला शिकायची असेल तर शिकवेन मी ती इथे... अर्थात तुम्ही गृहपाठ करणार असाल तरच बरं का Wink

Pages