आमालाबी चित्तरगाणी व्हताना...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर नवनव्या क्लुप्त्या काढून फोटो डकवायची स्टाईल आहे. वरिजिनल आयड्या येण्याइतके आम्ही हुषार नाही, पण आम्हालाबी चित्तरगाणी व्हतात...

उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा !

मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा..॥
दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा..॥

ugavalaa-chandra-punavechaa.JPG

__________

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली..

majalaachhaaymaaze-japata-na-bhaan-aale.JPG

___________

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्यांची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरु

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरु

गोड गारव्याचा मारा, देह शिरिशरे सारा
लाख चुंबनांचा मारा चांद लागला करु

goD-gaaravyaachaa-maaraa.JPG

________

चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफूले

वाहती आकाशगंगा, की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी, तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे, मंदीर ही पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले

गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी
पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे

ge-niLaavanti-kashaalaa.JPG

शब्दखुणा: 

Rofl ....
शेवटचा तर कळस आहे. आणि त्याकरता लिहिलेले गाणे कसलं फिट्ट आहे. Proud Proud Proud याबद्दल तुम्हाला ______/\_____. कसा काय मिळवला हा फोटो?????

शीर्षक आणि विशेषतः 'चित्तरगाणी' शब्द खासम खास बरं का. माबोवर हा शब्द ऑफिशियल होण्यास हरकत नसावी. बाकी तुम्हाला पण चित्तरगाणी झाली हे चांगले झाले. Proud

Pages