Submitted by मितान on 16 January, 2011 - 16:50
मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय ॥
प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥
खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥
समोर फुटली लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय ॥
घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान
विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
बघुन नाचतो एकच पाय
उपयोग नाय
दुसरा पाय शंखात चिकटुन
पाय नाचरा ओढू जाय
मन माझं गोगलगाय
खुट्टं होता शंखात जाय ॥
गुलमोहर:
शेअर करा
गोगलगायच्या हळूवार आणि
गोगलगायच्या हळूवार आणि मऊपणाइतकीच मऊ नि अलवार कविता.
खूप दिवसांनी कविता वाचली..
खूप दिवसांनी कविता वाचली.. छान वाटली..
आवडली.खरेच आहे हे.
आवडली.खरेच आहे हे.
मितान खुप आवडली कविता. जसजसे
मितान खुप आवडली कविता. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं हे होत असेल का? वाढत्या वयातही बालपणातलं कुतुहल आणि तारुण्यातली 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन' ही रग ज्याच्यात असेल त्याला आयुष्य अधिक भरभरून जगता येईल नाही का?
मस्त ! मस्त !
मस्त ! मस्त !
मितान, सुरेख कविता. बर्याद
मितान, सुरेख कविता. बर्याद दिवसानंतर कविता विभागात ( ? ). नॉर्वेच्या दरीखोर्यात दिसलेली गोगलगाय काय?
कायम भेदरलेल्या मनाचं नेटकं
कायम भेदरलेल्या मनाचं नेटकं चित्रण.
..... आवडली कविता.
शांतीनाथ, पराग, नोरा, श्री,
शांतीनाथ, पराग, नोरा, श्री, उल्हासभिडे धन्यवाद
मामी खरं आहे तुझं म्हणनं. जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्या कम्फर्ट झोन मध्ये जास्त रुतत जातो.आणि मग हळुहळू नव्या अनुभवांना नाकारण्यातच सुख वाटू लागतं !
सुकी, कविता हा माझा प्रांत नाही. पण ही खळबळ कवितेतूनच बाहेर आली
खूप मस्तय गं.
खूप मस्तय गं.
छान!
छान!
मस्तच..
मस्तच..
सुरेख
सुरेख
खूप वेगळी पण छानच कविता
खूप वेगळी पण छानच कविता -मनावर नेमके भाष्य करणारी.
एकदम मस्त
एकदम मस्त
एकदम मस्त ग... आवडलिच मला..
एकदम मस्त ग...
आवडलिच मला..
अगदी सहज आलीय.. 
मला आवडली कविता
मला आवडली कविता
खूपच हळूवार कविता आहे छानच
खूपच हळूवार कविता आहे छानच नेहमीप्रमाणे
अगदी अगदी! फार पटली.. in fact
अगदी अगदी! फार पटली..
in fact high society-new generations गोगलगायीच होतील -अशी काळजी वाटते
अतिशय गोड कविता,
अतिशय गोड कविता, मितान...प्रचंड आवडली
मितान मी ही कविता तिसर्यांदा
मितान मी ही कविता तिसर्यांदा वाचतेय. मला ही खुपच आवडलीये.
एक सुचना करू का? 'समोर फुटती लाट अनावर' या ओळीत 'फुटती' च्या ऐवजी 'फुटली' घातलस तर? फुटती अनेकवचनाकरता वापरतात. आणि इथे तर एकच लाट आहे म्हणून.
छाने गं मितान, आवडली
छाने गं मितान, आवडली
बेहद्द खूष आहे ह्या
बेहद्द खूष आहे ह्या कवितेवर..... किती सहज उतरलेत विचार....
निवडक दहात! खास खास !
निवडक दहात! खास खास !
सुरेख!!
सुरेख!!
सर्वांचे आभार मामी तू
सर्वांचे आभार
मामी तू सांगितलेला बदल केलाय. तोच शब्द बरोबर वाटतोय.
क्युट आहे. आवडली.
क्युट आहे. आवडली.