वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही
आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.)
तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.
दुर्गाबाई
दुर्गाबाईंच्या तुलनेत साधलेंचा अभ्यास तोकडा असण्याची शक्यता नक्कीच बरीच आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"आनंदध्वजा
"आनंदध्वजाच्या कथा" नि "हा जय नावाचा इतिहास आहे" ही दोन्ही पुस्तके "कठीण" आहेत. दुर्गाबाईंनी एका दिवाळी अंकामधे त्यांच्याविषयी लिहिलेले (बरेचसे ओझरते).
धारप, मतकरींचे कुणी चाहते?>> त्यावर प्रचंड चर्चा जुन्या हितगुजवर झाली आहे रे.
जगन्नाथ
जगन्नाथ कुंटे यांची पुस्तके:
१. नर्मदे हर हर
२. साधनामस्त
३. नित्य निरंजन
तिन्ही पुस्तके मस्त आहेत. नुकतीच वाचुन संपवली.
बरोबर,
बरोबर, नर्मदे हर हर आणि साधनामस्त ही नर्मदा परिक्रमेवर आहेत आणि "नित्य निरंजन" हे आत्मनिवेदन किंवा कादंबरी किंवा आत्मनिवेदनात्मक कादंबरी.
पैकी पहिली दोन मला जास्त आवडली.
विलास
विलास सारंग - "एन्कीच्या राज्यात" - झकास!
आणि "पारधी"
आणि "पारधी" ले. गिरीश प्रभुणे - आपापल्या जबाबदारीवर वाचावं. कारण माझ्यासारख्या इतर काही क्रियाशून्य जिवांना वांझोटं अपराधीपण किंवा तसलीच लाज वाटू शकते - परंतु मी "निलाजरेपण कटिस नेसण्याची" अक्कलहुशारी पण केली आहे!
नात्या,
नात्या, तुझं 'हा एक फेज असावा' हे पटतय पण वपु आणि अनिल अवचट ह्यांच्या लिखाणाची (कदाचित तुझ्या न कळत) तुलना करतोयस आणि तसं आवश्यक नसावं. मला दोन्ही तितक्याच ताकदीचे वाटतात आणि जवळचे ही.
वर व पु आणि पु लं ची केलेली तुलना अशीच अप्रस्तुत वाटते, समकालीन लेखक म्हणून होत असेलही तसं पण ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्यांनाच समृद्ध केलय.
व. पुं नी माणसांचा विचार करायला शिकवलय, वर आशु म्हणाल्या तसं की एकच माणूस वेगवेगळ्या परिस्थ्तीत वेगळा वागू शकतो आणि तरीही ते सयुक्तिक असू शकतं हे व पु नी खूप जवळून समजवून दिलं. त्यांच्या गोष्टीतली काही माणस अगदी जवळपास दिसलीही, म्हणजे ती आधीही होतीच पण त्यांच तस अस्तित्व जाणवलं ते व पु नी दिलेल्या दृष्टीने. अगदी पु लं च्या व्यक्ती आणि वल्लीं बद्दलही हेच म्हणता येईल. असं घडू शकतं ह्या शक्यतेपर्यंत विचार करायची त्या योग्य वयात सवय लागली ती व. पु ना वाचतानाच, त्यामुळे त्यांच लिखाण आजही माझ्या मनाची पटकन पकड घेत विचार करायला लावतं.
कारण
कारण माझ्यासारख्या इतर काही क्रियाशून्य जिवांना वांझोटं अपराधीपण किंवा तसलीच लाज वाटू शकते - परंतु मी "निलाजरेपण कटिस नेसण्याची" अक्कलहुशारी पण केली आहे!>> लई खास !!! प्रविण पाटकरांचे "सती" वाचून माझे असेच झालेले.
खरच.. खुप
खरच.. खुप छान पुस्तकांची नावे इथे समजली...
राधेय.. स्वामी.. श्रीमान योगि... तर वाचलेच ..पन राजेश्री खुप भावले मनाला...
आजही थेउर.. गनपतिपुळे ला गेलो कि स्वामी तील प्रसंग दोळ्यासमोर उभे राहतात..
रारंगढांग .. खुपक्ष्ह छान आहे....
आनंद
आनंद साधलेंचं "आनंदध्वजाच्या कथा" - प्रचण्ड करमणूक (थोडं प्रौढांसाठी आहे). विश्वास बसत नाही की "हा जय नावाचा इतिहास आहे" हे पुस्तक लिहिणार्या लेखकानेच हे लिहिलं आहे. "हा जय नावाचा इतिहास आहे" - महाभारतावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर मराठीत लिहिल्या गेलेल्या चांगल्या पुस्तकांपैकी एक. >>>>>>
आनन्द साधले हे उथळ आनि पोटभरू असे थर्ड क्लास लेखक होते. गोपुरांच्या प्रदेशात हे अत्यन्त दर्जाहीन पुस्तक आहे. आश्चर्य म्हनजे गाडगीळ ते विद्या पीठाच्या अभ्यासक्रमात लावण्यात यशस्वी ठरले.
भारतीय प्रवास वर्णनात आचार्य काका कालेलकर व रा.भि . जोशी यांचा विसर का पडावा? काका तर हिन्दीतूनही लिहीत.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2681 या संकेतथळावर चिन्मय ने ईंग्रजीतील आणि मी मराठीतील मला माहिती असलेल्या प्रवास वर्णनांची यादी दिली आहे टोणगा.
रा. भि. जोशींची पुस्तकं मिळतात का आता? मी त्यांची बहुतेक पुस्तकं ही मराठी शब्दोपत्ती, अलंकार ह्यावरच जास्त वाचलेली आहेत. खरचं छान लिखान आहे त्यांचं.
आचार्य काका कालेलकर यांच्या पुस्तकांबद्दल माहिती असेल तर कुणी लिहू शकेल का?
नीरजा, तू
नीरजा, तू सांगितल्यावरुन केतकरवहीनी वाचले (अनायसे एकीकडुन मिळाले पण). छान आहे. धन्यवाद.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
पुलंचे एक
पुलंचे एक अप्रतिम पुस्तक कालच वाचलं -- "रवीन्द्रनाथ - तीन व्याख्याने"
रवीन्द्रनाथांबद्दल तीन ठिकाणी पुलंनी केलेल्या व्याख्यानांचं कलेक्शन आहे.
'टिपीकल' पुल वाचायला आवडत असेल तर नका वाचू पण 'वेगळं काही लिहिणारे' पुल आवडत असतील तर जरूर वाचाव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे मिळेल
कुठे मिळेल ? शण्डेला तु येणार आहेस का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडे
माझ्याकडे आहे. तुझी पुस्तकं वाचून होत आली आहेत. त्या बरोबर पाठवीन पाहिजे तर. इतरही तुला माझ्याकडली कुठली हवी असतील तर कळव.
ओह म्हणजे
ओह म्हणजे तुला माझे पत्र मिळाले नाही
मी "एका कोळीयाने" पाठवशील का असे विचारले होते. आणि हे "रवीन्द्रनाथ - तीन व्याख्याने". एव्हढी दोन पाठवलीत तर खूप छान ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रविन्द्रन
रविन्द्रनाथ - तीन आख्याने नाही वाचलं अजुन. मुक्काम शांतिनिकेतन वाचलंय.. तेही छान आहे..
नारायण
नारायण धारप यान्चे निधन झाले काही दिवसांपुर्वी...
=========--------============
मी पण
मी पण नुकतेच केतकरवहिनी वाचले. चांगले आहे पुस्तक.
सिन्ड्रेल
सिन्ड्रेला, एक आगाउ सल्ला देउ का? एका कोळियाने वाचण्यापेक्षा मूळ Old Man and The Sea वाच.. मला तरी पुलंनी केलेले भाषांतर अजिबात आवडले नाही..
ते पण
ते पण वाचते आणि हे पण वाचते
खरे तर मी जास्त इंग्रजी बुकं वाचलेली नाहीत. मराठीतलीच कितीतरी वाचायची आहेत अजुन. म्हणुनच ह्या दोन बी बी वर गेलं की अगदीच क्षुद्र वाटायला लागतं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
.
माझा पण एक (फु) सल्ला- सल्ला हा आगाउ कमी आणि फुकट जास्त असतो
टण्या अगदि
टण्या अगदि खरय तुझ. पु.लं. चा एका कोळियाने अनुवाद मलाहि नाहि आवडला. शब्दशः भाषांतर करण्यावर अधिक जोर दिल्याने त्यातला आत्माच हरवल्या सारखा वाटतोय.
काल गौरी
काल गौरी देशपांडेंची 'गोफ' वाचली .
****************************
'गोफ'
'गोफ' तुझ्याकडे असेल तर मला देशील का रे दिप?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला माझ्या लायब्ररीत मिळालं नाही..
अगं कालच
अगं कालच परत केली लायब्ररीत
, माझं एका दिवसात झाल ना वाचुन म्हणुन ..तुला पाहिजे असेल तर परत घेइन लायब्ररीतुन .![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आमच्या इथल्या लायब्ररीत गौरी देशपांडेच तेवढ एकच पुस्तक मिळालं
कोणाकडे आहेत का अजुन काही पुस्तकं त्यांची ??
****************************
माफ करा
माफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा.
दक्षिणा,
दक्षिणा, गोफ माझ्याकडे आहे. मी चिंचवडला राहते. आपण coordinate करुया कसं द्यायचं/घ्यायचं ते. मी एकदा चेक करते घरीच आहे ना की कोणी घेउन गेलं आहे ते...
फक्त
फक्त मराठीच पुस्तक पारायण टाकायच का??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
सरिविना...
सरिविना... धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगायोगाने गोफ माझ्या एका फ्रेंडने मला गिफ्ट केलं.
तुझ्याकडे अजून पुस्तकांचा खजिना असेलच, एखादं दुसरं देशिल ना वाचायला?
अगं हो
अगं हो भरपुर संग्रह आहे. जमल्यास तू ये एकदा. म्हणजे तुझ्या आवडीप्रमाणे तुला निवडता येतील..
Pages