Submitted by पुरंदरे शशांक on 1 January, 2011 - 05:54
साथ - संगत
खूप काळाची तुझी साथ एका क्षणात झाली नाहिशी
मनाची सवय थोडीच मोडणार आठवासरशी कासाविशी
तू नाहीस हे वास्तव मन पटवून घेत नाही
आठवांच्या डोहातून बाहेर मुळीच येत नाही
पुसलेल्या पाटीवरचे पाणी हलकेच उडून जाते
कोरड्या पाटीवर मागे ठसे मात्र कायम ठेवते
भर मध्यावर नाव उभी एक वल्हे हरवलेले
हेलकावे जबरदस्त तारू तर भरकटलेले
वल्हे हातात घेतले खरे तारू जरा सावरतंय
दुसरे वल्हे मारताना हे कोण दिसतंय
नाव आता खूपच स्थिर मार्ग पुढे काढते आहे
एकटे किती श्रमणार साथ-संगत जरूर आहे
- माझ्या एका नातेवाईकाची पत्नी अपघातात अचानक गेली - त्याच्या वयाच्या चाळीशीत, पुढे एखाद -दोन वर्षातच त्याचे दुसरे लग्न होउन तो पुन्हा स्थिरावला. त्यातून मला सुचलेले हे काहीसे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
नेमकी कळली नाही.
नेमकी कळली नाही.
शशांक, प्रस्तुत विषय, केवळ
शशांक,
प्रस्तुत विषय, केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न ठेवता
थोडा व्यापक केला असता, तर कविता अधिक प्रभावी
वाटली असती. प्रयत्न चांगला आहे. पु.ले.शु.