Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
सचिन
सचिन धन्यवाद!
तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या संदर्भात हा अर्थ कसा आहे हे कोणी सांगेल का?
(इथे विषयांतर होणार असेल तर कृपया मला विचारपूस मधे लिहा).
धन्यवाद.
सचिन, अर्थ
सचिन, अर्थ साधारण बरोबर आहे. फक्त मीच थोडा वेगळा अर्थ घेतला होता, त्याचे पुढे स्पष्टीकरण देत आहेच.
हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे
घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म
बळीयाचा अंगसंग झाला अता, नाही भयचिंता तुका म्हणे
मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे. गोविन्द हा शब्द बोवांनी अगदी अचूक वापरला आहे. गो या शब्दाचा एक अर्थ गायी असा आहे पण त्याचा इंद्रिये असाही अर्थ होतो. गोविन्द म्हणजे जो इंद्रियांचा व्यवहार जाणतो, त्यांचे नियमन करतो तो.
"घररिघी झाले" या चरणामध्ये "बळे" हा शब्द बळजबरीने या अर्थाचा नसून बळे, म्हणजे जो बलवान आहे, सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी अशा अर्थाने येतो.
याच चरणाचा अजून एक सुंदर अर्थही होतो.
ते म्हणतात घररिघी, घरात ठेवलेली, राहीलेली जी मी, ती आता बळियाची पट्टराणी झाले आहे. यावर थोडा विचार करता आपल्याला लक्षात येते की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत. जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा राहत होता, तोच जीव आता आत्मस्वरुपाच्या आनंदाने, सर्वशक्तिमान अशा परब्रह्माशी एकरूप झाल्याने संपूर्ण, स्वयंभू झाला आहे.
महाराज म्हणतात की आता या सर्वशक्तिमान परब्रह्माची अनुभूती आल्यावर मला कुठलेच, कशाचेच भय नाही.
***
हा अर्थ दुसरीकडे हलवायचा असेल तर काही हरकत नाही. पण दोनतीनदा संदर्भ आला म्हणून इथेच टाकला आहे.
चित् -
चित् - शुद्ध, विषयनिरपेक्ष ज्ञानाची कला किंवा आविष्कार म्हणजे चित्कला. शक्तीचे, जगदंबेचे नाव आहे.>>धन्यवाद क्ष.
हे वरती केलेलं विवेचन पण सुरेख. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
बशी मराठी
बशी मराठी आणि कप मात्र इंग्रजी असं का? हा मेळ कसा काय झाला? विदर्भात शिंगल बशी असेही म्हणतात. पण परत इथेही सिंगल हे इंग्रजी आणि बशी मात्र मराठी!!!!
उपोदघात
उपोदघात आणि उपसंहार ह्या शब्दांचे नेमके अर्थ काय?
बापू करंदीकर
माझ्या
माझ्या माहितीनुसार उपोद्घात म्हणजे preface आणि उपसंहार म्हणजे epilogue.
मुख्य लेखनाची सुरुवात होण्याआधी आणि शेवटानंतर केलेलं तदनुषंगिक लेखन.
चुभूद्याघ्या.
श्रांत
श्रांत ह्या शब्दाचा अर्थ काय?
आणि विश्रांत शब्दाचा सुद्धा अर्थ काय?
पवन
पवन बारिबाह पर
cha arth kay aahe hey mala koni sangel ka?
pranjalbrinjal@gmail.com var mail kela tari chalel!
मनुस्विनी,
मनुस्विनी, श्रांत म्हणजे श्रमलेला - थकलेला.
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
अश्वमी,
अश्वमी, अश्वत्थामा ह्या शब्दांचे अर्थ/ व्युत्पत्ती काय?
आत्ताच वाचले, राम शेवाळकरांच्या नातीचे नाव अपाला आहे. ह्याचा काय अर्थ होतो?
धन्यवाद !
खिस्ती या
खिस्ती या शब्दाचा अर्थ काय??
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
अश्वत्थाम
अश्वत्थामा जन्मानंतर घोड्यासारखा खिंकाळला होता म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा ठेवले असे म्हणतात.
cult या
cult या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द काय?
cult ==
cult == संप्रदाय ?
cult == पंथ??
cult == पंथ??
महागुरू,
महागुरू, 'अपाला' ही वैदिक कालामधली एक प्रसिद्ध पंडिता होती. (अपाला आणि घोषा ही दोन नावं बरोबर वाचली आहेत, बाकी डिटेल्स यशस्वीरित्या विसरले आहे. ) कुणी अजून माहिती देऊ शकेल का?
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
श्रांत
श्रांत शब्दाचा बरोबर उपयोग या कवितेत केला होता असे मला वाटते.
संप्रदाय
संप्रदाय आणी पंथ हे शब्द चांगल्या अर्थाचे आहेत. मूळ इंग्रजीत कल्ट हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. तो derogatory ( आता याला शब्द काय ? ) आहे.
घररिघी
घररिघी झाले" या चरणामध्ये "बळे" हा शब्द बळजबरीने या अर्थाचा नसून बळे, म्हणजे जो बलवान आहे, ...
>>>
क्ष, थोडीशी असहमती आहे.
घररिघी म्हनजे ग्रामीण भागात अधिकार नसताना,संबंध नसताना ,मागे लागून आलेली , हात धरून आलेली. अशा अर्थाने वापरतात. बायकाही भांडताना 'लग्नाची बायको आहे' मागे लागून आलेली नाही असे अभिमानाने ऐकवतात.
त्यामुळे 'बळे' या शब्दाचा अर्थ वाच्यार्थाने घ्यावा लागेल. बळेच घुसूनही पट्ट राणी झाले असेच म्हणायचे असे मला वाटते. त्यामुळे बलवानाची पट्टरणी झाले आहे हे निरुपण मला तरी पटले नाही. बर्याचदा समीक्षा करताना मूळ कवीना अभिप्रेत नसणारा अर्थही काढला जातो.
बाकी अध्यात्मिक इन्टरप्रिटेशन योग्य वाटले
माझ्यासाठ
माझ्यासाठी माजघर म्हणजे स्वैपाकघर आणि दिवानखाना यांच्यामधील खोली. अर्थात मधली खोली. पण माजघर आणि त्याची रजना वेगळी असते असे मला काही जुन्या कथा वाचताना वाटते. कुणाला जर नक्की माहिती देता येत असेल तर इथे लिहा अशी विनंती.
आभारी आहे.
<<बशी मराठी
<<बशी मराठी आणि कप मात्र इंग्रजी असं का? हा मेळ कसा काय झाला? विदर्भात शिंगल बशी असेही म्हणतात. पण परत इथेही सिंगल हे इंग्रजी आणि बशी मात्र मराठी!!!!>>
ते सगळे आता मराठीच. काही शब्द फारसी, संस्कृतमधून आले, काही इंग्रजीमधून. पण माय मराठीने त्या सर्वांना सामावून घेतले. त्यामुळे भाषा सम्रुद्ध अ प्रगल्भ झाली.
मुंबईत असेहि ऐकू येते:
वाईफची डिलिव्हरी सायन हॉस्पिटलला झाली, तिथून नाईन ट्वेल्व्ह ची फास्ट घेऊन मस्टरवर सिग्नेचर करायला एकदम ऑन टाईम पोचलो.
हे सगळे मराठीच, नव मराठी. समृद्ध व प्रगल्भ.
उदा. निर्णय घेणे कठीण झाले आहे, या ऐवजी डिसिजन घेणे डिफिकल्ट झाले आहे, असे म्हंटले तरच लोकांना समजते, आवडते. ते जुने कठीण, मराठी शब्द कशाला?
प्रत्यक्ष ऐकले मी असे सा रे ग म च्या निवेदिका (सॉरी, होस्ट) कडून.
आधी माझाही
आधी माझाही तर्क असाच होता. त्याची पुढची ओळ "बळीयाचा अंगसंग झाला अता, नाही भयचिंता तुका म्हणे" अशी आहे. ती लक्षात घेऊन हा अभंग जीवदशा ते जीवब्रह्मैक्य या आध्यात्मिक स्थितींचे वर्णन करतोय हे लक्षात ठेवले पाहिजे आणि मग त्याच आधारावर बाकीच्या अभंगाचा अर्थ निघतो.
"घररिघी झाले पट्टराणी बळें, वरीले सावळे, परब्रह्म" याचा वाच्यार्थ "मी बळेंच सावळ्या परब्रह्माची पट्टराणी झाले आहे" असा घेतला तर त्यांतून काहीच पारमार्थिक अर्थ निघत नाही (मी बळेच ब्रह्मैक्य घडवून आणलंय?!) आणि बुवांच्या अभंगात अर्थहीन कधीच काहीच नसतं.
घररिघी हा शब्द फक्त मागे लागून आलेली, अंगवस्त्र, एवढ्याच अर्थाने न वापरता, घरातली दासी, मोलकरीण, अशा अर्थानेसुद्धा वापरला गेला आहे. (संदर्भ: ज्ञानेश्वरांचा अभंग "या गोपाळाचे घर रिघेन गे बाईये, कामाडी कामाडी होईन")
पुढच्या "बळीयाचा अंगसंग" या ओळीचा संदर्भ घेऊनच या बळीयाच्या घरात मी जी घररिघी होते ती पट्टराणी झाले आहे असा अर्थ घेतला आहे. आणि म्हणूनच पुढचं "नाही भयचिंता" हे ही सुसंगत होते. बळाने हे घडवून आणलं असतं तर भयचिंता सुटण्याची शक्यताच नाही.
असो. आपण जसा अर्थ घेत आहात त्यावरुन जर अभंगाचा अर्थ त्याच दिशेला जात असेल तर नक्की सांगा.
पवन
पवन बारिबाह पर
चा अर्थ काय आहे हे मला कोणी सांगेल का?
जरा अर्जेंट आहे!
pranjal13, मी
pranjal13, मी लावलेला अर्थ असा:
पवन म्हणजे वारा, बारिबाह (वारिवाह - पाणी वाहून नेणारा) म्हणजे ढग.
'पवन बारिबाह पर' म्हणजे, वारा जसा ढगांना उधळून लावतो तसा.
- गौरी
खिस्ती या
खिस्ती या शब्दाचा अर्थ काय??
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
पवन
पवन बारिबाह पर
चा अर्थ काय आहे हे मला कोणी सांगेल का? >>
गौरीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे... खालील पानावर चिन्याने पूर्ण कवितेचा अर्थ दिलेला आहे, तो पहा...
http://www.maayboli.com/node/2229?page=6
मी सध्या
मी सध्या करत असलेल्या मराठी-इंग्रजी भाषांतरात एक शब्द (एक शॉर्टफॉर्म आहे) अडला आहे. कुणाला ठाऊक असल्यास सांगावे,
Context:
एका ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर काही मजकूर आहे (अमुक एक व्यक्ती या विभागात रहात आहे वगैरे)
त्या लेटरहेडवर ग्रामपंचायतीच्या तालुका-जिल्हा वगैरे दिलेल्या पत्त्याखाली 'जा.नं.________' असं लिहिलं आहे.
हा कसला नंबर असावा?
बहुधा जावक
बहुधा जावक नंबर असावे ते. जावक म्हणजे outgoing. Outgoing communications Recording number.
असामी सही
असामी सही बोलरेलाय. जावक नंबर म्हणजे रेफ. नं असे म्हटले तरी चालावे.
~~
तिल तिल तारा मिरा तेली का तेल, कौडी कौडी पैसा पैसा पैसे का खेल.
चल चल सडकोंपे होगी ढॅण टॅण. - ढॅण्टॅणॅण ...
येस्स!
येस्स! जावकच असणार ते. अनेक धन्यवाद असामी आणि नकुल
एकदम लवकर मिळालं उत्तर.
Pages