हल्ली बरेच जण ऑनलाईन पुस्तकं वगैरे वाचतात. मला मात्र आजही पुस्तक हातात धरून वाचायला आवडतं. पुस्तक, मासिक असं काहीही. एक तर ते जवळ बाळगता येतं. डोळ्याला उजेडाचा त्रास नाही. लोळत वाचता येतं. सगळ्यातमहत्वाचां म्हणजे दीर्घ कथा असेल तर कुठपर्यंत आलीय कथा हे पान क्रमांक पाहून किंवा मार्कर, पेन, पेन्सिल असं काहीही ठेवून लक्षात ठेवता येतं. थोड्या वेळानं मग पुढची कथा कंटिन्यू करता येते.
ऑनलाईन काही वाचताना शक्यतो ते शॉर्ट असेल हे पाहूनच मग वाचायचं कि नाही हे ठरवावं लागतं. पण हल्ली लोक्स इतकं छान लिहीताहेत कि ते वाचायलाच पाहीजे. मार्ग काढायलाच पाहीजे. ऑनलाईन कादंब-यांच्या बाबत एका ठिकाणी प्रतिसादात लिंकचा उल्लेख झालेला वाचला. मलाही असच वाटतं. म्हणजे कादंबरीचं प्रत्येक प्रकरण वेगळ्या थ्रेडवर असणं हे सोयीचं वाटतं. कुठलाही भाग वाचायला घेतल्यावर सुरूवातीला आधिच्या भागाची तर प्रत्येक भागाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक असली तर शोधणं सोपं जाईल. ( पीडीएफ स्वरूपात कादंबरी लिहून तिची लिंक देणं हा उपाय असू शकतो का ?)
वाचकांची / लेखकांची मतं... सूचना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. .
ता.क. : गद्य लिहायचा हा पहिलाच प्रयत्न आहे..
पीडीएफ स्वरूपात कादंबरी लिहून
पीडीएफ स्वरूपात कादंबरी लिहून तिची लिंक देणं हा उपाय जास्त योग्य वाटतो. पीडीएफ फाईल मधे बुकमार्क्स आणि पानाचे क्र. बघून हवे तेच प्रकरण वाचता येते.
अर्थात लोळत पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच.
पीडीएफ एकदम मस्त. पीडीएफ
पीडीएफ एकदम मस्त.
पीडीएफ वाचण्यासाठी आयपॉडसारखी गॅझेटस आलीत का बाजारात ?
http://www.gadgetgeek.in/gadgets/e-readers
गूगळून पाहील्यावर लिंक सापडली. मी एकदम अनभिज्ञ आहे. कुणी वापरत असेल तर कसं आहे ते सांगतीलच.. लोळत वाचण्यासाठी बरं वाटतंय
इ-पुस्तकांबद्दल कदंब दिवाळी
इ-पुस्तकांबद्दल कदंब दिवाळी अंकात किरण येले यांचा खूप छान लेख आला आहे.
त्यात त्यांनी छापील पुस्तके आनि इ-पुस्तके दोन्हीचे फायदे तोटे सांगितलेत.
एक तर हल्ली इतके लोक
एक तर हल्ली इतके लोक लिहितात... त्यात वरून चांगले लिहितात.. आता वाचायचे तरी किती... आणि वाचत बसले तर आपण स्वतःचे लिखाण करायचे कधी..
सांजसंध्या.. मला पण अजून छापील पुस्तक वाचायला आवडते आणि मी तसे सोबत देखील ठेवतो.. कितीही ओन्लाईन वाचले तरी झोपायच्या आधी १५-२० मिनिटे मी छापील पुस्तक वाचतोच..
>>> अर्थात लोळत पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच.
पीडीएफ वाचण्यासाठी आयपॉडसारखी
पीडीएफ वाचण्यासाठी आयपॉडसारखी गॅझेटस... >>>
एक 'कान्डेल' म्हणून आय-पॅड सारखे गॅझेटआहे. त्यामध्ये pdf वाचता येतात. बुक मार्क करून ठेवता येतात. हवेतर झूम-इन करता येते. अनेक सोयी आहेत त्यात...
<<अर्थात लोळत पुस्तक
<<अर्थात लोळत पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच. >> अगदी अगदी.
ते सेम सुख ऑनलाईन पुस्तकं वाचण्यात नाही.
अर्थात लोळत पुस्तक वाचण्याची
अर्थात लोळत पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच
शंभर टक्के अनुमोदन...
पण नुसतेच लोळत वाचण्यातली नाही तर जेवताना, सोफ्यावर आरामात रेलून, केनच्या झुल्यावर बसून, संध्याकाळी गच्चीच्या कडठ्यावर बसून, प्रवासात खिडकीशेजारी बसून भणाणता वारा अनुभवताना पुस्तक वाचण्यातील मज्जाही वेगळीच आहे
रात्री सगळे झोपल्यावर
रात्री सगळे झोपल्यावर धारपांची पुस्तकं वाचलीत का ?
ती मजा वेगळीच राव !! असली भीती वाटायची आणि पुस्तकही खाली ठेवता यायचं नाही.
एका कुशीवर आडवं होऊनपण वाचता
एका कुशीवर आडवं होऊनपण वाचता येईल अशी सवय लावून घेतली होती शाळेत असतानाच....

जाड मोठी पुस्तकं, पुढे engineering चीपण...अशी एका कुशीवर...खूप वाचली..
आणि निवांत आरामखुर्चीत बसून, कॉफीचा कप घेऊन वाचायचं, मधेच काही जुनं आठवलं की पुस्तकात बोट ठेवून डोळे मिटून घ्यायचे...
पुस्तक पालथं ठेवायचं नाही...कोपरे दुमडायचे नाहीत्...पान उलटताना थुकी लावायची नाही..पुस्तकांना एखाद्या तान्हुल्यासारखं जपायचं....
निवांत आरामखुर्चीत बसून,
निवांत आरामखुर्चीत बसून, कॉफीचा कप घेऊन वाचायचं, मधेच काही जुनं आठवलं की पुस्तकात बोट ठेवून डोळे मिटून घ्यायचे...
अहाहा....
यातलं काहीच माहीत नाही. काही
यातलं काहीच माहीत नाही. काही शंकांची उत्तरं मिळाली तर आभारी राहीन.
ऑनलाईन कादंबरी / दीर्घ कथा पोस्ट करताना ती कशी करावी याचे आधीपासून काही संकेत आहेत का ? समजा वर्ड मधे आधी कॉपी पेस्ट करून पाहीली आणि पोस्टताना त्या त्या ओळीनंतर (वाचकांच्या सोयीसाठी) पृष्ठ क्रमांक दिले तर ते चालेल का ?