न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. ८ जानेवारी २०११ चांद पॅलेस.

Submitted by अनिलभाई on 23 December, 2010 - 09:29
ठिकाण/पत्ता: 
चांद पॅलेस. 239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444

आरतीला भेटण्यासाठी ए.वे.ए.ठी.

ह्या ए.वे.ए.ठि. वर स्नो पडला. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 8, 2011 - 11:30 to 16:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे, लांबनं येणार्‍यांपैकी तू आणि भाई, विनय, केपी आहात. परत जाताना स्नो लागायची शक्यता आहे.. रीस्क घ्यायची आहे का?

आमच्याकडे हलका स्नो... तुमच्याकडे जास्त असेल तर नका येऊ... उगाच अडकायला नको.

(मी इथून येऊ शकतो).. भाईंना उचलून..

'प्रिय..' आज रिलीजसाठी हापिसात गेलाय. त्यामुळे मला ईशानला घेऊन यायचे आहे. म्हणून जरा धाकधुक वाटतेय.
आजचं रद्द करुयात काय ? Sad

आरतीचं परत जाणं लांबतय बहुतेक दोनेक आठवड्यांनी. मग २९ च्या गटगला ती असेल तर भेट होइलच.

चालेल.. हो हो नाही नाही नको.. आणि हिम म्हटलं की अडकण्याची शक्यता ही आलीच..
भेटू २९ ला.. तिला जाऊ देऊ नको...
मी पापलेट खायला घालीन म्हणावे Happy

एक बार खाओगे तो खुद जान जाओगे.. Happy

तिच्यासाठी व्हेजकरी.. मी स्वतः बनवलेली.
किंवा तिला माझ्याकडे रहायला पाठव एक दिवस. Happy

बारगळलं का? Sad (कॉकॉ एवेएठि करा. :P) असो, कमितकमी झक्की आणि सौ. झक्की तिथे त्यांचा मायक्रो ए. वे. ए. ठि. करतील. Happy

विनय, माहेरपणं करतायत का? ईबा, मैत्रेयी, शोनू, सिंडी, पन्ना, सायो, मी..आम्ही सगळ्या यायला तयार आहोत. Proud

माहेरपणं Lol आजचं जमले नाही तरी आरतीला २९ ला घेऊन ये सिंडे. बाराचा पाहूणचार घेतला पाहिजे ना.
** त्या वेळी स्नो चे इंच काय ढीग जमले तरी क्यान्सल होणार नाही गट्ग, हे ध्यानात घ्यावे.
अडकायची वेळ आल्यास लग्नकार्यालयासारखे झोपण्याची व्यवस्था त्या हॉलमधेच करू हवंतर Happy
तसेही दुसर्‍या दिवशी पण मीच बुक केला आहे हॉल, लेकीच्या बड्डे करता!

कांपो, २९ करता आत्तापासून नटायची गरज नाही Wink

मै, त्या हॉलमध्ये २९ च्या विकेंडला एकदम घरचंच कार्य आहे म्हण की Proud

कांपो, कुठे चांद पॅलेस नी कुठे तुझं रदरफोर्ड. Uhoh

१ जानेवारीला चांद पॅलेसला म्हणे जबरी बफे होता. एकदम हटके पदार्थ होते. मारवाडी दालबाटीटाईप सिंधी काहीतरी पखवाज नावाचा अप्रतिम पदार्थ होता. जिलब्या वगैरेही मस्त होत्या. लोकं ताटंच्या ताटं भरुन नेत होते.

हमको क्या मालुम कुठे काय आहे.

आदमा तु भयंकरच दात विचकत आहेस कँसल झाल्यावर. Wink सायोने १० वेळा कुणी येणार नाही हे चेक केलेले दिसतय खरच. Happy

उलट माझीतर यायची तयारी होती स्नो थांबलाय हे बघून. दुपारी पुन्हा सुरु झाला तर मात्र नक्की पंचाईत होईल लांब रहाणार्‍यांची.
बुधवारी पण मोठं स्टॉर्म अपेक्षित आहे असं ऐकलं.

अरे काय झालं? इथे रस्ते एकदम साफ आहेत. आज स्नो पडायचे पण चान्सेस नाहीयेत ना? Sad
असो, २९ तसं काही फार लांब नाहीये. Happy

अर्र.. रद्दच का?
आता हिरमुसलेल्या मनाला आधार म्हणून शॉपिंगला जावं का Proud

अगदी अगदी सायो. मलाही स्नो थांबलाय बघुन आशा वाटत होती. असो. २९ अब दुर नही. Happy

आरतीला थोपवा तोवर.

चला आता कँसलच झालंय तर मी जातो जर्सी सिटीत एका मित्राला भेटायला. आहे का कुणी तिकडे?

आम्हाला मुलीला गाडीवर सोडायला कुठेतरी जावेच लागणार होते, तिथून मग घरी जाण्या ऐवजी चांद पॅलेसला जेवावे असा बेत होता, पण आता ए. वे. ए. ठि. च कॅन्सल झाल्याने तीपण घरी थोडा वेळ जास्त राहिली. तिला पोचवून सरळ घरी. जेऊन दोन तीन तास वामकुक्षी, म्हणजे रात्री ८ वा. चा जेट्स चा गेम बघायला जाग राहिल!!

स्वाती_आंबोळे, किंवा आज त्यांचे जे काय नाव असेल (बाइ, इबा, विनानि) वगैरे, त्यांनी मला मुद्दाम फोन करून ए. वे. ए.ठि. रद्द झाल्याचे कळवले. धन्यवाद.

अशी एक म्हण आहे की No good deed goes unpunished. त्याचा त्यांना प्रत्यय आला. पंधरा सेकंदाचा निरोप सांगायला फोन केला नि पुढे मी पंधरा मिनिटे काहीतरी(च) बडबड करत बसलो होतो. शेवटी मुलीने आठवण करून दिली की इतर लोकांना कामे असतात!
असो. २९ जानेवारी - खिचडी, भरली वांगी, गुळाच्या पोळ्या!! आजपासूनच उपास करावा म्हणतो.

अरेरे, बरेच दिवसांनी गटग ला जाणार होते तर ते ही कँसल झाले Sad

२९ ला येण्याचा प्रयत्न करते, कारण बरेच चेहरे आहेत ज्यांना मी एकदाही भेटले नाही. सगळ्यांना भेटण्याची उत्सुकता आहे. शिवाय व्हेजकरी आहेच Happy

कांपो, तु क्धी पर्यंत आहेस ?

अशी एक म्हण आहे की No good deed goes unpunished. त्याचा त्यांना प्रत्यय आला. पंधरा सेकंदाचा निरोप सांगायला फोन केला नि पुढे मी पंधरा मिनिटे काहीतरी(च) बडबड करत बसलो होतो. शेवटी मुलीने आठवण करून दिली की इतर लोकांना कामे असतात!>>>>

Lol

अरे हो, आम्ही आलो चांद पॅलेसला जेऊन. येता येताच स्नो चालू झाला.

Pages