न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. ८ जानेवारी २०११ चांद पॅलेस.

Submitted by अनिलभाई on 23 December, 2010 - 09:29
ठिकाण/पत्ता: 
चांद पॅलेस. 239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444

आरतीला भेटण्यासाठी ए.वे.ए.ठी.

ह्या ए.वे.ए.ठि. वर स्नो पडला. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 8, 2011 - 11:30 to 16:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै, गटग ८ तारखेला आहे. त्यात शुक्रवार रात्र वादळाची आहे (म्हणे). तेव्हा निम्माच स्वयंपाक कर. त्यात नारळ-कोथिंबीर-कांदे-टमाटे-कडिपत्ता-मोहोरी-जिरं जे काय घालशीर सगळं मिळून दोन माणस खपव. आणि मग ये शनिवारी श्रमपरिहारास. हवं तर मी "आंब्याचा शिरा" आणते Proud

नारळ-कोथिंबीर-कांदे-टमाटे-कडिपत्ता-मोहोरी-जिरं जे काय घालशीर सगळं मिळून दोन माणस खपव>> अगदी अगदी!! आमच्या शेजारच्या दातार आज्जी आठवल्या Lol

सिंडे, आजचीच रात्र वादळाची आहे अशी भविष्यवाणी सायोने थोपुवर केलीये Wink

त्यात नारळ-कोथिंबीर-कांदे-टमाटे-कडिपत्ता-मोहोरी-जिरं जे काय घालशीर सगळं मिळून दोन माणस खपव <<

उरलेल्या पदार्थात पाणी की तिखट वाढवायचे एवढंच ठरायचं आहे.. Proud

मैत्रेयी, घरच्या बाईने श्रमपरिहाराला म्हणून मायबोली गटगला न जाता स्वयंपाकघरातल्या कोंदणात खितपत पडायचं ही कुठली रीत? आणि तू खपवून घेतेस? शोनाहो Proud

आमच्या ओळखीत एक बाई पावभाजी करायच्या.. ऐनवेळी माणसं वाढली तर चमचा चमचा तिखट (माणशी) भाजीत जास्त पडायचं. तेव्हा त्यांचा 'अंदाज नेहमीच खरा' ठरायचा..

दुसरी एक विशिष्ठ शहरातली व्यक्ती पळीने सत्यनारायणाचा शिरा वाढायची. 'अख्या वाड्याला' पुरतो म्हणे. मी म्हटलं 'अत्तरदाणीच्या काडीने लावा हाताला' अख्या पुण्याला पुरेल पावकिलो शिरा... Proud

Lol अग चुकून ७ लिहिले , माझी दुसरी पार्टी ८ लाच संध्याकाळी आहे. खूप लोकांनी मिळून त्या दिवसासाठी मला कोंदण केलंय रत्नजडित ! जाऊन बसले झालं ! Wink बर पण मला ८ चा "विशेष" वृत्तान्त २९ ला सांगा. Happy

मला पण यायचे आहे. Happy कसा येऊ हा एक प्रश्न आहेच. कुणी त्याचे समाधान करु शकेल का?

असो. वेळ नक्की कळवा कारण माझ्याकडे गाडी नाही. Sad बस, ट्रेन वगैरे वर अवलंबुन आहे.

सायो तु जंगी गटगला नसलीस तर तुझी गिफ्ट मला आधीच आणावी लागेल असं दिसतय.

माझी गिफ्ट? Uhoh
जंगी गटगला येणारे ना. पण उगाच आधीपासून गाजावाजा न करता जरा भाव खाऊन घेतेय. Proud

केपी, तू कुठे आहेस रहायला सध्या ? आमच्या रस्त्यात असेल तर मी येते तुला घ्यायला. तेवढीच सरप्राइज पाहुण्यांची सोय होइल Proud

उद्या सकाळीही जर स्नो होत असेल/ रस्ते क्लिअर नसतील तर मी येण्यापूर्वी दहादा विचार करेन. थोडक्यात आत्ता डळमळीत आहे.

आमच्याकडे आज दिवसभर आणि थोडा रात्री स्नो आहे. एकूण ३ ते ५ इंच होणार आहे म्हणे.

उद्या सकाळी आठ वाजता इथे चेक करुयात काय ?

आयत्या वेळी कळवतो आहे म्हणून माफ करा, पण सौ. ला घेऊन मी चांद पॅलेसमधे येत आहे. तुम्ही सर्व भेटलात तर आनंद होईल. मग आम्ही अर्थातच तुमच्यातच सामिल होऊ.

अरे वा झक्की तुम्ही येणार म्हणजे आनंदी आनंद Happy

आज संध्याकाळी तरी हाय वे आणि गावातले रस्ते क्लीअर आहेत आमच्याइथे. स्नो झाला त्यातला बराचसा वितळून पण गेला. उद्या सकाळी बघू काय आहे स्थिती.

काय करायचे आहे मंडळी ? तुमच्या इथे दुपारी हलका स्नो आहे असे वेदर काका म्हणत आहेत. लवकर सांगा, आम्हाला कडकडनं यायचं म्हणजे वेळ लागणार Happy

Pages