शौर्य
काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे. 'अ फेव गुड मेन' नावाच्या इंग्रजी चित्रपटावरुन उचलेगिरी केलेली आहे पण त्याला हिंदु-मुस्लिम्(नेहमीप्रमाणे)रंग दिलेला आहे.चित्रपटाच्या समीक्षेपेक्षा त्यात दाखवलेल्या घटनांबद्दल लिहीत आहे. त्यामुळे चित्रपटाची थोडक्यात कथा लिहितो. जावेद खान नावाच्या लष्करातील अधिकार्यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या हत्येचा आरोप असतो.राहुल बोस जावेद खानचा वकील असतो.जावेद खानने आपला वरीष्ठ अधिकारी राठोडची हत्या केलेली असते.राहुल बोसने पत्रकाराला दिलेल्या चुकीच्या मुलाखतीमुळे ब्रिगेडिअर प्रताप (केके मेनन) यात ओढला जातो.नंतर शोध घेता घेता राहुल बोसच्या लक्षात येते की राठोड हा माणुस फार क्रुर होता व त्याला ब्रि.प्रताप पाठीशी घालत असे.शेवटी ब्रि.प्रतापला न्यायालयात बोलावण्यात येते.राहुल बोस त्याला उकसवतो व त्याच्या मृत कुटुंबाबद्दल सांगतो. त्याच्या संपुर्ण कुटूंबाची त्याच्याच मुस्लिम नोकराने निर्घुण हत्या केलेली असते. ब्रि.प्रतापच्या ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कारही केलेला असतो. हे सर्व राहुल बोस कोर्टात सांगुन ब्रि.प्रतापला त्या नोकराबद्दल ऍन्युअल कॉन्फिडेंशिअल रीपोर्टमधे न लिहिण्यामागचे कारण कसले भय तर नाही ना असे विचारतो. स्वतःला शौर्यवान समजणारा ब्रि.प्रताप तोंड उघडतो. सर्व मुस्लिमांना मारुन टाकायला हवे वगैरे सांगतो हे सर्व बोलल्यानंतर ब्रि.प्रतापवरच कोर्टमार्शल होते व जावेद खानला सोडुन देण्यात येते.
केके मेननने जबरदस्त अभिनय केलेला आहे त्याचप्रमाणे राहुल बोसनेही चांगली भुमिका केली आहे.
नेहमीप्रमाणे या चित्रपटात हिंदु कसे कृर आणि मुस्लिम कसे शांतीप्रिय देशभक्त असे दाखवण्यात आले आहे.काश्मिरमधे दहशतवाद आहे पण या दहशतवादाला भारतील लष्करच जबाबदार आहे असेही अप्रत्यक्षपणे दाखवले आहे. म्हणजे लष्करातील मुस्लिमविरोधी अधिकारी निष्पाप मुस्लिमांना मारुन टाकतात व त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवतात.बंदुक डोक्यावर ठेवुन 'माझ्याकडे एके ४७ आहे' हे वदवुन घेउन त्यांना मारुन टाकतात. याला रोखणे शक्यच नाही कारण वरीष्ठ लष्करी अधिकार्यांचा अशा कृत्यांना आशिर्वाद असतो.पण हे करताना शेवटी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या हेडलाईन्स दाखवल्या आहेत. ज्यापैकी बर्याच आसाम,मणिपुर मधील आहेत. म्हणजे दिग्दर्शकाला दाखवायचे आहे की त्याचे म्हणने कसे बरोबर आहे. पण या आसाम्,मणिपुर मधील बर्याचशा घटना हिंदुंवर झाल्या होत्या हे दिग्दर्शक विसरतो.
माझ्यामते हा चित्रपट बनवताना लष्करातील सैनिकांची,अधिकार्यांची मनस्थितीच विचारात घेतलेली नाहीये.लष्करात काम करताना लष्करी अधिकार्यांवर किती दबाव असतो याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले आहे. माझे काही मित्र,नातेवाईक लष्करात होते , आहेत यांनी असे सांगितले आहे की काश्मिरात काम करताना अधिकार्यांवर प्रचंड दबाव असतो. कधी कुठे बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. तो झाल्यानंतर दहशतवादी पळुन जातात त्यांचा शोध घेणेही खुप अवघड असते.शिवाय या दहशतवाद्यांना बर्याचदा जनतेचा पाठींबा असतो. ते दहशतवाद्यांना लपायला मदत करतात. कधीकधी लष्कराचे खबरी चुकीची माहीती देतात्.त्यामुळे दिशाभुल होते. अशा अनेक कारणांमुळे लष्कराकडुन कधीकधी चुका होतात. ज्या होणे स्वाभाविकही आहे.पण चुकांवर लष्करात कारवाईही होते.
या चित्रपटात असे दाखवले आहे की राठोड नामक अधिकारी निष्पाप लोकांच्या हत्यांवर हत्या करत असतो व मेडल्स मिळवत असतो.एका ठिकाणी एका निष्पाप मुस्लिम तरुणाची तो हत्या करतो व एका लहान मुलीवरही तो गोळी झाडणार असतो. जावेद खान त्याला म्हणतो की तू जे करतो आहेस ते चुकिचे आहे.पण राठोड अजुन लोकांची हत्या करण्याआधीच जावेद खान त्याची हत्या करतो.जावेद खानची नंतर यातुन सुटका होते. शेवटी राठोड चुक होता हे मान्य पण जावेद खानने त्याच्या वरीष्ठ अधिकार्यावर गोळी घालुन एका प्रकारे कायदा मोडलाच होता ना???मग त्याला का सोडण्यात येते???लष्करात एक शिस्त असते. आदेशाचे कारण न विचारता पालन करणे हा तिथे नियम असतो. जर लष्करातील सर्वच सैनिक स्वतःच काय बरोबर काय चुकीचे ठरवु लागले तर लष्करात अराजक माजेल. सुरक्षा करणे शक्यच होणार नाही.समजा उद्या भारतीय सरकारने व लष्कराच्या अतिवरीष्ठ अधिकार्यांनी एखाद्या देशाबरोबर युध्द करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. जर लष्करातील सैनिक म्हणु लागले 'हा निर्णयच चुकीचा आहे.यामुळे निष्पाप लोकांची फाल्तु जिवितहानी होईल्.त्यामुळे आम्ही या युध्दात भाग घेणार नाही', तर काय होईल??सैन्यातील लोक जर स्वतःच ठरवु लागले की काय चुक आहे,काय बरोबर आहे आणि स्वतःच इतरांवर गोळ्या झाडुन हत्या करू लागले आणि नंतर न्यायालयात स्वतःची बाजु बरोबर आहे हे पटवल्यावर सुटू लागले तर सैन्यात आपापसातच युध्द होईल.या चित्रपटात जावेद खानचे जरी बरोबर होते तरी त्याने लष्करी कायदा व शिस्त मोडली म्हणुन त्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच हवी होती.
केके मेननचा अभिनय चित्रपटात सुंदर आहे पण अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपटात दाखवलेल्या आहेत व त्या चुकीच्या गोष्टी अनेक लोकांना बरोबर वाटत आहेत त्यामुळे हे सर्व लिहिले.
खर आहे
खर आहे चिन्मय. हा जाणून बुजून नियोजित अपप्रचार चालू आहे असे मला वाटते. भारतीय सैन्य, पोलिस यावर असे हल्ले करून मुसलमानांविरुद्ध होणार्या उपाययोजनात राजकीय हस्तक्षेप घडवून आणणे हा उद्देश यामागे असेल असे वाटते.
"भारतीय
"भारतीय सैन्य, पोलिस यावर असे हल्ले करून मुसलमानांविरुद्ध होणार्या उपाययोजनात राजकीय हस्तक्षेप घडवून आणणे हा उद्देश यामागे असेल असे वाटते."
जीएस, हे जरा ओढुन ताणुन होतय..
पण एकुणातच कलाकार मंडळी ही बरेचदा समाजवादी असतात.. समाजवादी आपल्या इथे तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले होतात.. राहुल बोस हा तर कट्टर ""सेक्युलर"" पंथीय आहे.. कुठल्याही विषयावर बोलताना तो गुजरात दंगलीचा विषय काढतोच काढतो..
GS1, यातुनच
GS1, यातुनच सच्चर वगैरे उभे रहातात. टन्या, प्रश्न समाजवादाचा नाहीये. इथे दहशतवादास पुर्णपणे भारतीय लष्करास दोषी दाखवले आहे. हे दुर्दैवाचे आहे.
मी पण
मी पण पाहिला आहे हा चित्रपट. तुम्ही सर्वजण म्हनत आहात ते योग्यच आहे. सध्या एका ठरावीक समाजाला चांगले ठरवण्याचे वेड आले आहे. पण मग प्रत्येक दहशतवादी क्रुत्यात हाच समाज असतो हा योगायोग आहे काय ? आणि समाजवादी काय हो, प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा हेच यांना माहित आहे. राजकीय लोकांचे एकवेळ समजु शकतो, कारण मतांसाठी ते स्व्तःला पण विकतात, पण मग कलाकार मंडळी असे का वागतात. दंगली, स्फोट इ. कडे हे का दुर्लक्ष करतात?
बरोबर आहे
बरोबर आहे तुमच नितिन
चिन्या आज
चिन्या आज हा चित्रपट पाहिला.
(मोजेरबेअर जिंदाबाद)
सर्वात प्रथम केके ला सलाम. ज..ब्..रा.. अभिनय केलाय त्याने. त्याच कॅरॅक्टर फार छान प्रकारे उभा केल आहे त्याने.
दुसरा जो राठोड आहे त्याच कॅरेक्टर नीटपणे आलच नाहिये फिल्म मध्ये. ते हव होत. (ती गाणी नसती तरी चालली असती की.)
राहुल बोसने देखील चांगल काम केल आहे. (प्रत्यक्षात अर्मीमध्ये जे लोक NDA किंवा IMA मधुन जातात ते आपल्या कामात एवढे उदासीन असतात का हा एक प्रश्न फिल्म पाहताना पडतोच म्हणा.)
जावेद जाफरीच्या वाट्याला जेवढ काम केल आहे ते त्याने उत्तम केल आहे. विशेषत: कोर्ट रूम मधील प्रसंग सगळे.
हे झाल चित्रपटासंबंधी आणि त्यातल्या कलाकारांबद्दल.
वर कसांत लिहिलेल्या वाक्याप्रमाणेच अजुन काही शंका आल्या त्या म्हणजे राठोड सारखे लोक खरोखर आर्मीमध्ये असतात का???
खरतर काश्मीर मध्ये प्रत्यक्षातली परिस्थिती आपल्याला माहीत नसली तरी इतकी वाइट नक्कीच नाही.
(मध्ये काही लेख वाचले होते तेव्हा आर्मीने काश्मीरमध्ये ऑपरेशन सदभावना (चु भु दे घे) सुरु केल होत तेव्हा.
तिथे त्याना सपोर्ट नसुन दहशतवाद्याना सपोर्ट मिळायचा हे वाचुन प्रचंड धक्का बसला होता. )
राठोड त्या मुलाला गोळी मारतो हा प्रसंग फारसा पटला नाही.
आणि शेवटी कोर्ट रूम मध्ये जे काही शेवटी घडल ते कळालच नाही. केके असा कसा भरात येवुन सगळ बोलुन टाकतो???
त्यात देखील मीच राठोडला सगळ्या पॉवर दिल्या होत्या आणि ह्या लोकाना मार अस सांगितल हे जरा अनाकलनीय आहे.
तु म्हणतोस तसच म्हणेन काहि गोष्टी चित्रपटात चुकीच्याच दाखवल्या आहेत.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
झकास अगदी
झकास अगदी बरोबर!!
मलाही वाटत नाही की परिस्थिती अशी आहे. एक उदाहरण देतो. आमचे एक नातेवाईक आर्मीत होते. ते श्रीनगरमधुन जात होते. बाजारातुन गाडी जात होती. सर्व बाजुंना लोक होते. यांच्या पुढे व मागे एक एक गाडी होती सशस्त्र सैनिकांची. बाजारातुन एक बुरखाधारी व्यक्तीने आपल्या पिशवीत हात घातला, एक बॉम्ब काढला आणि यांच्यावर फेकला. तो नीट बनला नव्हता त्यामुळे लगेच फुटला नाही. आमच्या नातेवाईकांच्या मागच्या गाडितल्या सैनिकाने तो झेलला. बॉम्ब काही वेळात फुटणार हे नक्की होत, बाजारामुळे आजुबाजुला कुठेच मोकळी जागा नव्हती. त्या सैनिकाने तो बॉम्ब त्याच बुरखाधारी व्यक्तीवर फेकला,तो बॉम्ब उडाला. ती व्यक्ती व आजुबाजुच्या व्यक्ती ठार झाल्या. आता सांगा त्या सैनिकाने अशा वेळी काय करायला हवे होते. पापणी लवते ना लवते इतक्या थोड्या काळात या सर्व गोष्टी झाल्या. बॉम्बमुळे निरपराधी मारले गेले पण तसे केले नसते तर आर्मीच्या गाड्यांमधले सैनिक मारले गेले असते. आता लष्करात गांधीगिरी शिकवत नाहीत. त्यामुळे आपल्यावर बॉम्ब टाकणार्यावर हल्ला करणे लष्कराच्या दृष्टीने बरोबर आहे.
केके ब्रिगेडिअर असतो,तो इतक सगळ कशाला बोलेल्???त्याने दुसर्या पध्दतीने काहीतरी उत्तर दिले असते.