चक्र..
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
2
चक्र...
जेंव्हा आपण लहान असतो
तेंव्हा फुलपाखरासारखे बागडतो,
जेंव्हा आपण वयात येतो
तेंव्हा उंबराचे फुल होतो,
जेंव्हा आपण मोठे होतो
तेंव्हा सरड्यासारखे रंग बदलतो,
जेंव्हा आपण वृद्ध होतो
तेंव्हा कायमचे कोशात जातो,
आणि मग वाट पहात बसतो
कुणा मायेची ऊब मिळण्याची,
कोशातून बाहेर पडण्याची,
पुन्हा एकदा फुलपाखरू होऊन
हे रंगीबेरंगी जग बघण्याची..
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
बी, लिहिलय
बी, लिहिलय चांगल, पण बागळतो का बागडतो? मला वाटलं, तुम्हाला बागडतो अस म्हणायचय...
बरोबर आहे
बरोबर आहे शैलेजा तुझे. चुकीची दुरुस्ती सुचवलीस त्याबद्दल तुझे आभार.