बास्केटबॉल (NBA) - प्लेऑफ्स २०१०

Submitted by समीर on 28 May, 2008 - 19:22

२०१० च्या प्लेऑफ्स खालील प्रमाणे आहेत.

इस्टर्न कॉन्फरन्स टीम्स

शिकागो वि क्लिवलंड
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ
मिल्वॉकी वि अटलांटा
मयामी वि बोस्टन

वेस्टर्न कॉन्फरन्स टीम्स

ओक्लहोमा वि एल ए
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस
पोर्टलंड वि फिनिक्स
डेनव्हर वि युटा

सध्याचे स्कोअर. २१ एप्रिल

Bulls vs. Cavaliers | Cavaliers Lead 2-0
(शिकागो वि क्लिवलंड)

Bobcats vs. Magic | Magic Lead 2-0
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ

Bucks vs. Hawks | Hawks Lead 2-0

मिल्वॉकी वि अटलांटा
Heat vs. Celtics | Celtics Lead 2-0
मयामी वि बोस्टन

Western Conference First Round

Thunder vs. Lakers | Lakers Lead 2-0
ओक्लहोमा वि एल ए

Spurs vs. Mavericks | Series Tied 1-1
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस

Trail Blazers vs. Suns | Series Tied 1-1
पोर्टलंड वि फिनिक्स

Jazz vs. Nuggets | Series Tied 1-1
डेनव्हर वि युटा

कॉन्फरन्स फायनल्स almost ठरल्या आहेत.
वेस्टर्न कॉन्फरन्सः
The great लेकर्स Happy वि. फिनिक्स सन्स

इस्टर्न कॉन्फरन्सः
ओर्लँडो मॅजिक्स वि बोस्टन सेल्टिक्स / क्लिवलंड कॅवेलियर्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सन्स पहिला गेम हरलेले आहेत. Sad

अहो shugol, त्या कोब्याच्या हातात बास्केट्बॉल ऐवजी खायचा कोबी ठेवला तरी तो बरोब्बर बास्केट टाकेल. भारी आहे तो खेळाडू. आमचे सन्स सरळ चार गेममध्ये हरतील असे खेळले तर. त्यात तो नॅश अर्ध्याहून अधिक वेळा जखमीच असतो.

सेल्टिक्स आणि लेकर्स होईल फायनल असे दिसते.

कोबी ' ला खाऊन टाका.>> Happy

कोबीनेच कच्चं खाल्लंन सन्सना काल. Happy लेकर्स इतके सही खेळले की कोबीला जवळजवळ पूर्ण ४थ्या क्वार्टरमध्ये आराम करता आला. अजून ३ गेम्स मग सेल्टिक्सना पाहून घेऊ या वर्षी.

हो ना फचिन, तो कोबी अनस्टॉपेबल आहे. आमच्या सन्सचं काही खरं नाही. मागच्या वर्षी प्लेऑफ्स पर्यंत पण पोचले नाहीत. यंदा फायनलला गेले हेच खूप आहे.

पहिल्या ६ मिनिटात सन्स भारी होते पण नंतर त्यांना ओडम लागला अन चित्रच बदलले.

आमच्या सन्स? फचिन तू सन्सवाला काय?

केदार अनुमोदन.
लमार ओडमने गेमचा मोमेंटमच बदलून टाकला.. आणि नंतर कोबी सुटला पाSSर!
लेकर्सचा डीफेन्सही सही आहे. काल नॅशला खूप जखडून ठेवलं होतं.

अजून २ गेम्स Happy

काल सन्सनी कोबीला डबल टीम करायाचा प्रयत्न केल्यावर त्याने प्लेऑफ रेकॉर्ड assists केले Happy

ह्यावेळी माझा लेकर्सना पाठिंबा आहे. सध्यातरी ४ ने पुढे आहेत. गसोल रे. (तो थोडा मंदच आहे पण)

वॉव शेवटच्या १.२० मध्ये ४ ३ पॉईंटर्स, दोन फाऊल अन अजून १३ सेकंद बाकी. २ पॉईंटचा लिड.
ज ब री ! व्हॉट अ टर्नअराउंड.

जिंकले !! अभिनंदन.

हार्ड लक सेलटीक्स.. !! आणि अभिनंदन लेकर्स.. Happy
मी कोणत्या टीमला फॉलो वगैरे करत नव्हतो.. पण फायनल पहायला मजा आली.. Happy

शेवटी शेवटी बेक्कार मजा आली. चांगले खेळले लेकर्स.. मी लेकर्सच्या विरुद्ध होतो यावेळी..

कोब्या हा एक अतिभारी खेळाडू आहे असे माझे मत झाले आहे. अतिमहान अ‍ॅक्युरसी आहे त्या माणसाची. त्याचा फ्री थ्रो चुकलेला तर मी क्वचित पाहिला असेन. रीमलाही कधी लागत त्याचा बॉल. डायरेक्ट बास्केट्च होतो.

बरोबर फचिन. पण आजचा महत्वाचा थ्रो ठरला तो त्या आर्टेस्टचा. कसला भारी टाकला त्याने, मी सोफ्यावरुन उडालोच तो थ्रो बघून. तिथेच मॅच हातात आली, पण परत ३ ला ३ सगळं कसं भारी होत. अतिमहान. एकदम १ बॉल ४ रन अन आपला ऋषिकेश पाकड्यांना ढाक्यात चौका मारतो अगदी तशी मजा !

आता लेब्रॉन अन रे अ‍ॅलन हे दोघही कॉन्ट्रॅक्ट मधून मोकळे झालेत. लेब्रॉन बहुदा शिकागोकडे येण्याची शक्यता आहे, मग लेकर्सना बघून घेऊ. Happy

शेवटचा क्वार्टर मस्त झाला. लेकर्सना होम फिल्ड अ‍ॅड्व्हँटेज उपयोगास आले. कोबी मस्तच खेळला.

विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट टु कोबी.. माझ्या मते मायकेल जॉर्डन सारखा बास्केटबॉल खेळाडु मी अजुन तरी पाहीला नाही.. शकील झाला ,लेब्रॉन झाला, कोबी झाला... पण जॉर्डनसारखा कोणी झाला नाही आणी होणारही नाही..

केदार.. तु शिकागोला राहतोस ना? कधीपासुन? जॉर्डनला बुल्सतर्फे युनायटेड सेंटरला खेळतानाचे सौभाग्य तुला लाभले होते का? किंवा नसेल तर तुझ्या तिकडच्या स्थानिक मित्रांकडुन जॉर्डनच्या आख्यायिका ऐकल्या आहेत की नाही?:)

मी इथे अमेरिकेत आलो तेव्हा बॉस्टन सेल्टिक्स व एल ए लेकर्सची रायव्हलरी ऐन बहरात होती. काय टिम्स होत्या त्यांच्या.. सेल्टिक्सतर्फे लेजेंडरी लॅरी बर्ड, केव्हिन मेखेल्,डेनिस जॉन्सन व डॅनि एंज खेळायचे तर लेकर्समधे नन अदर दॅन करिम अब्दुल जब्बार व मॅजिक जॉन्सन आणी त्यांच्या मदतीला जेम्स वर्दी... असे अतिरथी महारथी होते. ८० च्या दशकात काय त्यांच्यात अविस्मरणिय फायनल्स होत होत्या तेव्हा!अन्बिलिव्हेबल!

त्यांच्यात तश्या रेग्युलर फायन्ल्स होत असताना एन बी ए मधे मायकेल जॉर्डन नामक स्टार होउ घातला होता. व १९९१ मधे त्याला स्कॉटी पिपन ची योग्य साथ मिळाल्यावर त्या महाभागाने पुढची ९ वर्षे सिंगल हँडेडली एन बी ए वर सत्ता गाजवली व शिकागो बुल्सची डायनेस्टि निर्माण करण्यास तो जबाबदार ठरला. १९९१ मधे त्याने मॅजिक जॉन्सनच्या लेकर्सला फायनल्सम्धे हरवले, १९९२ च्या फायनल्समधे पोर्टलँड च्या टिमला धुळ चारली तर १९९४ ला चार्ल्स बार्कलीच्या फिनिक्स सन्सना हरवुन लागोपाठ तिसर्‍यांदा एन बी ए चँपिअनशिप मिळवली. १९९४ व १९९५ सालात (त्याच्या वडिलांचा खुन झाल्यामुळे) त्याने बास्केट्बॉलमधुन अकाली निवृत्ति घेतली पण १९९६ मधे तो परत आला व १९९६ मधे सिअ‍ॅटल सुपसॉनिक्सना व १९९७ व १९९८ या दोन्ही फायन्ल्समधे कार्ल मलोन व जॉन स्टॉकटनच्या युटा जाझला फायन्ल्समधे हरवुन परत एकदा त्याने लागोपाठ ३ चँपिअनशीप्स शिकागोला मिळवुन दिल्या.

काय तो त्याचा खेळ.. काय तो त्याचा..हमखास जेव्हा पाहीजे तेव्हा क्रिटिकल बास्केट करण्याचा हातखंडा आणी काय ते त्याचे अंडर प्रेशर गुड्स डिलिव्हर करण्याचे कौशल्य.. शेवटचा सेकंद आहे व त्यांना जिंकण्यासाठी बास्केट पाहीजे आहे.. असे असताना मायकेल जॉर्डनने.. हमखास २..किंवा पाहीजे असेल.. तेव्हा ३ पाँइंटर टाकुन.. शिकागोला असंख्य वेळा जिंकुन दिले आहे.

८०च्या दशकात मॅजिक जॉन्सन्,लॅरी बर्ड व करिम अब्दुल जब्बारसाठी मी एन बी ए नियमीत बघायचो. पण मायकेल जॉर्डनमुळे मी एन बी ए बास्केटबॉलचा फॅन झालो.

पण १९९८ मधे त्याने परत निवृत्ती घेतल्यावर मात्र परत एन बी ए मधे माझे मन रमले नाही.. त्याने बास्केटबॉल खेळाची पातळी एवढ्या उंचावर नेउन ठेवली आहे( हि हॅज सेट द बार सो हाय!) की आता प्रत्येक खेळाडु बघताना जॉर्डनच्या तुलनेत अगदी फिक्काच वाटतो.(हो.. कोबी ब्रायंट सुद्धा!)मायकेल जॉर्डनला ज्यांनी ज्यांनी खेळताना पाहीले आहे ते हेच सांगतील की त्याच्या सारखा बास्केटबॉल खेळाडु त्याच्याआधी झाला नाही व त्याच्यानंतरही होणे नाही.... त्यामुळे १९९८ नंतर मी एन बी ए बघतो पण मनापासुन नाही..

तरीही लेकर्स व त्यांच्या फॅन्सचे अजुन एका चँपिअनशिपबद्दल हार्दिक अभिनंदन..

तळटीपः सध्याचा लेकर्सचा जो लेजेंडरि कोच आहे( फिल जॅक्सन) तोच मायकेल जॉर्डनने शिकागो बुल्सना जेव्हा सहा चँपिअनशिप्स मिळवुन दिली होती तेव्हा शिकागो बुल्सचा कोच होता.. बुल्सबरोबर ६ व आता लेकर्सबरोबर ५ अश्या ११ एन बी ए चँपैअनशिप्स त्याच्या खात्यात आहेत!आणी कोणाला जर मायकेल जॉर्डनच्या सहाही एन बी ए फायनल्सच्या होल गेम डी व्ही डी व झालच तर त्याच्या ६ मोस्ट एक्सायटिंग फुल गेम्स्च्या डी व्ही डी बघायच्या असतील तर तो सगळा डी व्ही डी संच माझाकडे आहे.

बहुतेक सगळा गेम सेल्टिक्स च्या बाजूने झाला तरी शेवटी लेकर्स चांगले खेळले आणि जिंकले ...
लेकर्स आणि लेकर्स फॅन्स चे अभिनंदन Happy
मी फिल जॅक्सन बद्दलच लिहायला आले खरं तर..पण मुकुंद, तू ते आधीच लिहिलं आहेस ...
डीव्हीडी कधी पाठवतोस? Happy

मी शिकागोत राहतो, पण मी तेवढा नशीबवान नाही. इथे मी त्याचा कालावधी नंतर आलो. जॉर्डनमुळेच भारतात कधीमधी बास्केटबॉल पाहत होतो. शिकागोत यायच्या आधी मी इंडी ला राहत होतो, तेथून पहिल्या शिकागो ट्रिप मध्ये मी टॅक्सीवाल्याला युनायटेड सेंटर कडे घे, मला जॉर्डनचा पुतळा बघायचा आहे असे सांगीतले. टॅक्सीवाल्याने नेले. अन माझ्याकडून पैसे घेतले नाही !! तो पठ्या पण जॉर्डनचा फ्यान निघाला. तो देशी होता. पण इथे अनेक जॉर्डनच्या काळापासून राहयचा. अमेरिकेतला माझा तो NBA फॅनचा पहिला अनुभव.

यथावकाश गोर्‍या / अफ्रिकन अमेरिकन मित्रांनी कथा सांगीतल्या, त्यामुळे तर अजूनच त्याच्या बद्दलचा आदर वाढला. पण माझा पहिला आयकॉन म्हणजे ज्याचा खेळ पाहिला तो रेजी मिलर होता. ईंडियाना पेसर्स. त्याकाळी त्याची मॅच चुकविली तर फार त्रास व्हायचा. तेंव्हा शिकागोचा बहर संपला होता व कोबी उदयास येत होता. शिकागोला मुव्ह झाल्यावर सिझन मध्ये युनायटेड सेंटरवर पडिक राहने आपोआप सुरु झाले.

आजच मी व माझा मित्र बोलत होतो जर लेब्रॉनला शिकागोने घेतला तर सिझन टिकिटच घ्यायचे !

त्या डिव्हीडी आताही मिळतात का? त्यांचे लेबल काय? मी शोधतो. घ्यायलाच हव्यात.

रार.. बोल कधी पाठ्वु? बदल्यात मला कंदिसा व तत्सम गाण्यांची सि डी पाठव्.(आठवते का कंदिसा?) Happy

अरे केदार मी २-३ वर्षांपुर्वी अ‍ॅमेझॉन वरुन ते दोन्ही सेट्स घेतले होते. आत्ता मी घरी नाही पण एकाचे नाव बुल्स डायनेस्टी असे आहे व दुसर्‍याचे अल्टिमेट जॉर्डन असे काहीतरी टायटल आहे. उद्या घरी जाउन तुझ्या विचारपुशीत टायटल्सची नावे टाकतो. आणी ते सेट्स आता मिळत नसतील तर रारने परत केल्यावर तुलाही मी ते सेट्स पाठवायला तयार आहे.

रार्,केदार.. तुम्ही दोघेही त्यातला एक शॉट जरुर निट बघा.. १९९१ फायनल्समधे लेकर्स बरोबरच्या एका गेममधे... अ‍ॅज युज्वल लेन मधे ड्राइव्ह करुन..सॅम पर्किन्स हा डिफेंडर त्याच्यावर कोलॅप्स होत असताना.. हा बास्केटबॉल उजव्या हातात घेउन... डिफेंडरच्या वर हात करुन.. उजव्या हाताने बास्केटबॉल डंक करणार असतो.. तितक्यात त्याला बहुतेक वाटले की धिस इज टु इझी फॉर हिम.. म्हणुन तसे तो हवेत सस्पेंड असतानाच तो बास्केटबॉल उजव्या हातातुन डाव्या हातात ट्रांसफर करतो व सॅम पर्किन्सला पुरा गंडवुन.. इन्स्टेड ऑफ डन्क.. डाव्या हाताने ले अप पुर्ण करतो... माइंड यु.. हे सर्व व्हाइल सस्पेंडेड इन मिड एअर बर का! अक्षरशः टाइम सस्पेंड केल्यासारखा वाटतो त्या वेळेला..

हा शॉट तु नळीवर जरुर सापडेल.. कोणी तरी त्या शॉटची लिंक इथे टाकता का प्लिज? म्हणजे सगळ्यांना तो अमेझींग शॉट इथे बघता येइल.

कोणी यंदाच्या प्लेऑफ्स बघतय का ?
लेकर्स हरले ना यंदा !!

आम्ही काल हॉक्स वि बुल्सचा गेम पहायला गेलो होतो.. जबरी मजा आली... हॉक्स जिंकल्यामुळे लोकं फुल उत्साहात होती.. शिवाय शेवटच्या क्वार्टरमध्ये हॉक्सनी भक्कम बचाव आणि जोरदार अ‍ॅटॅक केला.. त्यामुळे पॉईंट्समधला फरक जो अगदी कमी होता तो वाढत गेला.. बुल्सकडुन रोज मस्त खेळला.. पण शेवटी शेवटी झाझा आणि कंपनीने त्याला जखडलं. एकंदर बास्केटबॉलचा गेम स्टेडियमवर जाऊन पहायला खूप धमाल आली...
बेसबॉलच्या अगदी विरुद्ध (मुकुंद, अश्विनी वाचताय का? Wink )

एकंदर बास्केटबॉलचा गेम स्टेडियमवर जाऊन पहायला खूप धमाल आली >>>> आमचा चान्स हुकला यंदा Sad आता आमची टीम पुढल्या वर्षी बरी खेळेल तर बघू Happy

Pages