सोसायटी नावाची वाचाळ वस्ती. भाग ३

Submitted by Sanjeev.B on 30 November, 2010 - 03:14

भाग ३
श्री

जोशी काका : सर्वानी शांत रहा पाहु, किती गोंगाट, मासळी बाझार आहे नुसता.
माळवणकर आजी : तुम्हाला कसे माहित मासळी बाझारा चा गोंगाट, तुम्ही कधी गेला होता ?
जोशी काका : तुम्ही पहिल्यांदा शांत रहा हो, मासळी बाझारा चा गोंगाट अनुभवण्या साठी तेथे जायलाच हवे का ? असो, आज आपण येथे सर्व जण ३१ डिसेंबर च्या सेलिब्रेशन च्या रुपरेषा ठरवण्यासठी जमलो आहोत.
मेहरा वहिनी : पर ईतने जल्दि क्यो ? ३१ दिसंबर को तो अभी बहुत वक्त हैं.
जोशी काका : ऐन वेळेला धावपळ नको म्हणुन, मागच्या खेपेस खुप पळापळी झाली होती, या वेळेस घाई नको, पुर्व तयारी ला पण वेळ हवा, चला चला सर्वांनी काही न काही तरी सुचवायचं आहे.
मेहता भाभी : गरबा, डांडिया.
मेहरा वहिनी : (नाक मुरडत) भांगडा डांस
मेहता भाभी : गरबा, डांडिया सगळ्यांना येते, तुमचा भांगडा समद्यास्नी कुटे येते ?
माळवणकर आजी : अहो भाभी, त्यात काय आहे, नुसतं दोन्ही हात वर आणि एक तंगडं वर करुन बल्ले बल्ले तर म्हणायचाय, त्यात काय आलंय एव्हढं.
मेहरा वहिनी : मेहता भाभी, आपके गरबा में भी तो सिर्फ गोल गोल घुमके तालिया बजानी है ना और डांडिया में तो पिछली बार इन मालवनकर आजी के दिवट्या ने तो मेरी सारी ऊंगलियों कि हड्डियां तोड दि थी.
सौ : त्या पेक्षा झिम्मा फुगडी ठेऊया का ? आणि हळदी कुंकू चा कार्यक्रम पण ठेऊया
जोशी काका : अहो, आपण ३१ डिसेंबर च्या कार्यक्रमा ची रुपरेषा ठरवत आहोत, सत्य नारायणा ची पुजा नाही घालणार आहोत.
नायर चेची : मेरी बेटी भरत नाट्यम डांस करेगी.
जोशी काका : चला एक आईटम फिक्स झालं
नायर चेची (वैतागुन): आईटम डांस नही जोशी काका, भरत नाट्यम कहा मैंने.
जोशी काका : तेच हो, तेच म्हणटलो मी, एव्ह्ढं वैतागु नका.
माळवणकर आजी : आमचं कार्टं कोळी न्रुत्य करेल.
जोशी काका : एकटा ?
माळवणकर आजी : का, तुम्हाला बी करायचं आहे का ?
जोशी काका : आजी, तुम्ही नेहमी वाकड्यातंच का शिरता हो.
माळवणकर आजी : का, माझा नातु नाही नाचु शकत ??
जोशी काका : पण कोळी न्रुत्य हा समुह न्रुत्या चा प्रकार आहे.
माळवणकर आजी : पण माझा नातु एकटा करेल कि, त्यात काय झालं.
जोशी काका : अच्छा, ठरलं तुमचा नातु कोळी न्रुत्य करेल.
मेहता भाभी : मारी डिक्री बी एकटी गरबा ने डांडिया नाचेल
जोशी काका : कसं शक्य आहे ते, भाभी.
मेहता भाभी : नाय नाय, ते करेल.
हेतल : पर बा, डांडिया रमवा माटे बे माणस जोये छे.
मेहता भाभी : तारे साथ हु आऊ छू.
जोशी काका : वा छान.
मेहरा वहिनी : मेरी जसबीर भांगडा करेगी.
जोशी काका : मागच्या वर्षी पण तुमच्या कुडी ने भांगडा नृत्य केलं होतं ना.
मेहरा वहिनी : ईस बार अलग गाने पर करेगी.
जोशी काका : ऊत्तम.
जाधवीण : मोठ्यांसाठी कोणते कार्यक्रम ठरवुया.
मेहता भाई : जे मोठ्यांसाठी असते ते.
जाधवीण : शी, काही ही काय बोलता.
जोशी काका : अहो, त्यांचं म्हण्णं म्हणजे जे मोठ्यांसाठी असते ना ते.
मेहता भाई : मी पण तेच बोलते.
जाधवीण : मी पण तेच बोलते, अस कसं समद्यां समोर मोठ्यांचे कार्यक्रम करायचे.
मेहता भाई : त्यात काय हाय.
जाधवीण : भाऊ, तुम्हासनी कळत न्हाय, तुमी काय वंगाळ बोलताय ते.
मेहता भाई : वंगाळ ???
जोशी काका : अहो जाधव वहिनी, तुम्ही जरा शांत रहा, त्यांना असे म्हणायचे आहे कि मोठ्यांचे कार्यक्रम म्हणजे जसे नाटक, गायन ईत्यादी.
जाधवीण : असं व्हंय.
जोशी काका : तर मी काय म्हणतोय मोठ्यांसाठी वेषभुषा स्पर्धा ठेऊया.
मेहरा वहिनी : यानी के ?
जोशी काका : Fancy Dress Competition
माळवणकर आजी : पण ते तर लहानांसाठी असतं ना, आणि ह्या वयात थोबाडीला रंग फासायचं का आम्ही ?
मेहरा वहिनी : हा, Fancy Dress तो छोटों का Program हैं ना
जोशी काका : वैच तो मय कह रहा हु छोटों का Program आपण मोठे करु, खुप कॉमेडी होईल, काय म्हणता सगळे.
मेहता भाई : हा फार मजा येईल.
जोशी काका : तर ठरलं मोठ्यांसाठी वेषभुषा स्पर्धा, आणखी काही सुचना आहेत का.
माळवणकर तात्या : अरे 31st शेलिब्रेट करताय, काही खाणं "पिणं" हाय का न्हाय, ते तुमच्या मोठ्या लोकांच्या Pogram मंदी.
जोशी काका : ओ तात्या, तसलं काही पण नाही.
माळवणकर तात्या : मग काय वरण भात आहे.
जोशी काका : तात्या शांत रहा, ते अजुन डिस्कस झालेलं नाही.
माळवणकर तात्या : मग करा कि डिस्कस, कापु की ७-८ कोंबड्या आणि करु धमाल.
जोशी काका : तात्या ते खाणारे तुम्ही एकटेच आहात, ७-८ का लागणार
माळवणकर तात्या : हैत कि पुष्कळ जण. मेहरा आहेत, नायर आहेत, जाधव आहेत, तुम्ही पण कराल की सपोर्ट.
जोशी काका : फाझील काही पण बोलु नका, ते सगळं तुमच्या कंपु पर्यंत मर्यादित ठेवा. सांसकृतिक कार्यक्रम ठरविण्याचे काम माझे आहे ते मी केले आहे, ऊगाच मिटींग मध्ये व्यत्यय आणु नका, मागच्या खेपेस सुध्दा पिण्याच्या कार्यक्रमा नंतर फार गदारोळ झाला होता.
माळवणकर तात्या : पिण्या नंतर तर गदारोळ होणार.
जोशी काका : पहिला पिण्यासाठी गदारोळ आणि नंतर पिऊन गदारोळ.
माळवणकर तात्या : मग काय गदारोळा शिवाय शेलिब्रेट करायचं 31st.
जोशी काका : तात्या, तुम्ही मला शिकवु नका 31st कसा सेलिब्रेट करायचे ते.
माळवणकर तात्या : मी तुम्हाला फक्त सांगतोय हो, तुम्हाला कोण शिकवणार.

जोशी काका आणि माळवणकर तात्या चे भांडण सर्वेच enjoy करत होते म्हणुन भांडण कोणि सोडवत नव्हतं, म्हणुन मिटींग बरखास्त झाली.

****************************************************

मी : कशी काय काय झाली मिटींग
सौ : अहो, कसली मिटींग, नुसता आरडा ओरड, गोंगाट.
मी : अगं त्याशिवाय मजा नाही मिटींगला.
सौ : तुमच्या ऑफिस ची मिटींग्स पण असेच होतात वाटत ?
मी : मग काय, पण सगळं कसं सभ्यपणे असतं. चिखलफेक, टांगखिचाई असतं पण सभ्यपणे.

Happy

- संजीव बुलबुले

गुलमोहर: