हिंदूस्थान

Submitted by मंदार-जोशी on 30 November, 2010 - 03:02

येऊदे खिलजी किंवा तैमूरलंग कुणी
विठोबाचा वारकरी तो धीट आहे

पाडले बामीयान तोफांनी जरी
हासतो तरीही आज तो बुद्ध आहे

पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा
आज आम्हा प्रत्येकात राम आहे

घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे

असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे

ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे

रक्तात स्वतःच्याच भिजला वारंवार जरी
दिसेल सर्वांना ताठ उभा हिंदूस्थान आहे

गुलमोहर: 

घरातले भेदी ठेचणे फार आवश्यक आहे. मंदार आशावाद खूपच छान.
विचार एकदम छान आहेत. प्रत्येकातला राम प्रकट झाला तर रावण
ठेचायला वेळ लागणार नाही.

घरातले भेदी ठेचणे फार आवश्यक आहे. मंदार आशावाद खूपच छान.
विचार एकदम छान आहेत. प्रत्येकातला राम प्रकट झाला तर रावण
ठेचायला वेळ लागणार नाही.

घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे>>>

अगदी मन हालवुन सोड्लेस मंदार...!

>>>>>ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे”
हे करणं गरजेचं आहे.

पण त्याबरोबरीने किंवा त्याआधीही
आपल्या समाजमनात घट्ट पाय रोवून बसलेल्या
भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद, फुटीरता, भ्रष्टाचार इ.
शत्रूंनाही नेस्तनाबूद करण्याची आवश्यकता आहे.

या दोषांतून बर्‍याच अंशी जरी इथला समाज मुक्त होतोय
अशी चुणुक जरी परकीय शत्रूला दिसली तर,
आपल्या देशाकडे वाकडी नजर वळविण्याची कल्पनाही करण्याआधी
त्यांना लाख वेळा विचार करावा लागेल.>>>>>
सहमत्.छान काव्य.

Pages