Submitted by मंदार-जोशी on 30 November, 2010 - 03:02
येऊदे खिलजी किंवा तैमूरलंग कुणी
विठोबाचा वारकरी तो धीट आहे
पाडले बामीयान तोफांनी जरी
हासतो तरीही आज तो बुद्ध आहे
पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा
आज आम्हा प्रत्येकात राम आहे
घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे
असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे
ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे
रक्तात स्वतःच्याच भिजला वारंवार जरी
दिसेल सर्वांना ताठ उभा हिंदूस्थान आहे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पाडा मंदिर कुठेही, आम्ही
पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा
आज आम्हा प्रत्येकात राम आहे.............................हे विशेष आवडले .छान
चोक्कस , मुजरा मित्रा
चोक्कस , मुजरा मित्रा
मंद्या अप्रतिम कविता...
मंद्या अप्रतिम कविता... शेवटचा कडवं खूप आवडलं
विश्ल्या लोळू नको जास्त.. नीट मुजरा कर..
ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना
ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे
खरेच आहे, मस्त
मस्त रे मंदार.......
मस्त रे मंदार.......
एकदम मस्त....
एकदम मस्त....
मंदार, ठेचून काढू सगळेच शत्रू
मंदार,
ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे
मंदार,
जबरदस्त !
अशांना ओळखुण त्यांची यादी प्रसारित केली पाहिजे ..
ह्याला कविता का म्हणावे ? यमक
ह्याला कविता का म्हणावे ?
यमक ...नाही...वृत्त छंद ...नाही...गेयता ...नाही ...
आणि विषया बाबत बोलायचे झाले तर काहींना कितीही जवळचा वाटत असला तरी हा आशावाद ठार पोकळ आहे
पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा >>>> हा हा हा .
(No subject)
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
मलाही आवडली मंदार
मलाही आवडली मंदार
बोधक कविता..!
बोधक कविता..!
प्रवर्तक कविता. आवडेश....
प्रवर्तक कविता. आवडेश....:)
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
जय श्रीराम ! आशावाद छान आहे.
जय श्रीराम ! आशावाद छान आहे.
घरातले भेदी दिसणार आता
घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे
असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे
हे खूप आवडले.मस्त !!
छान कविता
छान कविता
“ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना
“ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे”
हे करणं गरजेचं आहे.
पण त्याबरोबरीने किंवा त्याआधीही
आपल्या समाजमनात घट्ट पाय रोवून बसलेल्या
भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद, फुटीरता, भ्रष्टाचार इ.
शत्रूंनाही नेस्तनाबूद करण्याची आवश्यकता आहे.
या दोषांतून बर्याच अंशी जरी इथला समाज मुक्त होतोय
अशी चुणुक जरी परकीय शत्रूला दिसली तर,
आपल्या देशाकडे वाकडी नजर वळविण्याची कल्पनाही करण्याआधी
त्यांना लाख वेळा विचार करावा लागेल.
सुस्पष्ट मांडणी आहे कवितेची.
सुस्पष्ट मांडणी आहे कवितेची.
असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे
या ओळी आणि वापरलेल्या प्रतिमा तर खासच आहेत. आपले विचार व्यक्त करण्यासाठी योग्य त्या प्रतिमांची निवड करण्याचे तुमचे कौशल्य दाद देण्याजोगे आहे..
छान आहे रे
छान आहे रे
उल्हास काका, अगदी अगदी. लाख
उल्हास काका, अगदी अगदी. लाख मोलाचे बोललात.
सांजसंध्या, अनेक धन्यवाद गं
मंदार, अगदी खरं सांगू, आपला
मंदार, अगदी खरं सांगू, आपला संपूर्ण देश, (स्वातंत्र्य संग्राम सोडला तर ) अशी कुठलीच लढाई एकदिलाने लढलेला नाही. जर तशी लढू, तर मग कूणा शत्रूची हिंमतच होणार नाही, आपल्याकडे नजर वर करुन बघायची.
दिनेशदा, पुर्ण अनुमोदन
दिनेशदा,
पुर्ण अनुमोदन !
शत्रु (पाक) प्रेम दाखवण्यार्यांना नुकताच दणका बसलाय,पण अजुन जोरात तडाका बसला पाहिजे
मंद्या, प्रसाद म्हणाला ते
मंद्या, प्रसाद म्हणाला ते खरय. पण माणूस आशेवर जगतो. मला तू एक हार्डकोर आशावादी हिंदू वाटतोस. त्यात काही चुकीचं नाही. फक्त धर्म देवळापुरता मर्यादीत असावा.
फक्त धर्म देवळापुरता मर्यादीत
फक्त धर्म देवळापुरता मर्यादीत असावा.>>> पुर्णपणे सहमत कौतुकराव.........
मंदार जोशी आगे बढो हम तुम्हारे साथ है..................
छान लिहिलेस मंदार... गझलेचा
छान लिहिलेस मंदार... गझलेचा प्रभाव दिसतोय कवितेवर...
विचार छानच मांडलेस... प्रत्येक ओळीशी सहमत...
असा दुर्दम्य आशावाद बाळगल्याशिवाय कृतीची प्रेरणा येणार नाही...
दिनेशदांशी पूर्णपणे सहमत... आपला संपूर्ण देश, (स्वातंत्र्य संग्राम सोडला तर ) अशी कुठलीच लढाई एकदिलाने लढलेला नाही. एकदिलाने लढण्यासाठी आधी एकदिलाचे असावे लागते. जोवर ते होत नाही, तोवर शत्रूहल्ले होत रहाणार... त्याला इलाज नाही.
चांगली आहे !
चांगली आहे !
सत्य परिस्थिती. छान लिहीलेय.
सत्य परिस्थिती. छान लिहीलेय.
छान आहे माझी जुनी कविता
छान आहे
माझी जुनी कविता अशी
http://www.maayboli.com/node/20951
आवडली फक्त हिंदुस्थान ऐवजी
आवडली
फक्त हिंदुस्थान ऐवजी भारतावर कविता कर ना
Pages