Submitted by girish_123 on 27 November, 2010 - 10:17
मी VLCC मध्ये जाणयाचा विचार करत आहे.. कुणाला अनुभव आहे का VLCC चा ...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी VLCC मध्ये जाणयाचा विचार करत आहे.. कुणाला अनुभव आहे का VLCC चा ...
मी VLCC चे काही सेशन्स घेतले
मी VLCC चे काही सेशन्स घेतले होते. तुम्ही वजन कमी करण्यासाठी जाणार आहात का? तसे असेल तर VLCC मधे प्रचंड पैसा खर्च होतो फक्त. बाकी वजन हे तुमच्या व्यायामामुळे आणि डाएटमुळेच कमी होउ शकेल. वजन कमी करण्यासाठी जाणार असाल तर त्यापेक्षा तेच पैसे चांगले जीम लावण्यात खर्च करा असे मी सुचवेन.
मला वजन कमी करण्यासाठी लॉ कॉलेज रोडवर निर्मिती दुकानाच्या वर डॉ. गुप्ते यांचे जीम आहे त्याचा खुप उपयोग झाला होता. तुम्ही पुण्यातले असाल आणि हे लोकेशन तुम्हाला जवळ असेल तर नक्कीच चौकशी करुन पहा.
डेलिया शी सहमत. 'वॄषालीज' मधे
डेलिया शी सहमत.
'वॄषालीज' मधे साध्या साध्या व्यायामप्रकारानीही वजन नक्की कमी होतं.
गिरिष, हर्बालाईफ ट्राय करुन
गिरिष,
हर्बालाईफ ट्राय करुन बघा.... इट वर्क्स
हर्बालाईफचे साईड
हर्बालाईफचे साईड इफेक्ट्सबद्दल वाचल्याशिवाय कृपया ते घेऊ नका!!!
अजुन एक VLCC बद्द्ल. मी साधरण
अजुन एक VLCC बद्द्ल. मी साधरण ३-४ वर्षापुर्वी त्यांचा २ महिन्याचा कोर्स (लॉ कॉलेज रोडवरचे सेंटर ) केला होता. साधारण २० सेशन्स असतील. त्यातील एक अतिशय वाईट प्रकार म्हण्जे तुमचे सर्व सेशन्स ठराविक काळात पुर्ण करावाच लागतात आणि तुम्ही त्या काळात पुर्ण करु शकला नाहीत तर चक्क यापुढे आम्ही सेशन देणार नाही असे सांगतात. माझे ३-४ सेशन्स राहेलेले अस्ताना , आणि सुरवातीलाच मी सगळे पैसे भरलेले असुन सुद्धा यापुढे सेशन देणार नाही असे सांगण्यात आले. सेशन्स वेळेत न होण्याचे कारण म्हण्जे पहिल्या सेशन ला तुमचे जे वजन असेल ते पुढच्या सेशनला तुम्ही जेव्हा येता तेव्हा वाढले असेल , किन्वा तेव्हढेच असेल तरी ती बाई पुढचा सेशन द्यायची नाही. मागच्या वेळेपेक्षा २०० - ४०० ग्रॅम ने कमी वजन भरले तरच पुढचा सेशन व्हायचा. आणि सेशन एक दिवसाआड असायचे. त्यामुळे २ नच दिवसात एव्हढे वजन कसे कमी होणार. तसेच तेव्हा लोड शेडींग खुप जोरात होते आणि त्यांचा इन्व्हर्टर बॅकअप बंद पडल्याने पण माझे २ सेशन कॅन्सल झाले होते. त्यामुळे जेव्हा ती बाई मला पुढचे सेशन मिळणार नाहीत म्हणाली तेव्हा त्या सेंटरच्या ओनरशी जाउन मी बरीच भांडले होते. त्यामुळे मग तिने पुढचे सेशन घेउ दिले.
त्यामुळे तुम्ही जर यदा कदाचित तिथे जायचा निर्णय घेतलातच तर त्यांना सगळी प्रोसिजर काय , नियम काय आहेत ते सगळे नीट विचारुन, जमल्यास लेखीच लिहुन घ्या. आणि सुरवातीलाच सगळे पैसे अजीबात भरु नका. टप्प्या टप्प्प्याने भरा.
मिनोती, माझा आणि माझ्या
मिनोती,
माझा आणि माझ्या परिचयातल्या बर्याच जणांचा हर्बालाईफ बद्द्लचा अनुभव चांगला आहे!
तुम्ही कोणत्या साइड इफेक्टस बद्दल बोलत आहात?
ऋजुता दिवेकरचे dont lose your
ऋजुता दिवेकरचे dont lose your mind, lose your weight हे पुस्तक वाचा (मुळ इंग्रजीत, मराठी अनुवादही उपलब्ध आहे). चरबी घटवण्यासाठी नेमके काय करावे आणि करु नये याचा अंदाज येईल. मग त्यावरुन पुढचे ठरवा
मी पुण्यात आले होते तेव्हां
मी पुण्यात आले होते तेव्हां टाईमपास म्हणून त्या सेंटरला भेट दिली होती. .वजन कमी करण्याचा प्रश्नच नव्हता तर मला हे सेशन्स केल्यानं तुमचा दृष्टीकोन कसा बदलेल.. तुम्ही आत्ता आहे तसंच दहा वर्षांनीही मेंटेन कसं करू शकाल आणि व्हीएलसीसी मधे याचं रहस्य कसं शिकवलं जातं यांवर बौद्धिक घेतलं गेलं. मला वेळकाढूपणाच करायचा होता. पंण त्यांची मागं लागायची पद्धत पाहील्यावर आता ही बाई माझं चेकबुक हिसकावून घेऊन सही करायला लावते कि काय असं वाटायला लागलं होतं.
शेवटी रहायचा पत्ता विचारल्यावर त्या बाईचा चेहरा पडला.. इतरांना मेंटेन करायला सांगणारी ती बाई स्वतः इतकी अजागळ दिसत होती ( आणि त्यातून तिचे ते भयानक कपडे) कि माझं मत एकदम नकारात्मक झालं होतं.
ज्यांनी जॉईन केलेलं होतं
ज्यांनी जॉईन केलेलं होतं त्यांची मतं येऊद्यात जरा...
<<ज्यांनी जॉईन केलेलं होतं
<<ज्यांनी जॉईन केलेलं होतं त्यांची मतं येऊद्यात जरा...>>
किरण तुम्ही प्रतिसाद नीट वाचलेले दिसत नाहीत. मी स्वतः VLCC जॉईन केले होते आणि माझा स्वतःचाच अनुभव लिहिलाय सुरवातीलाच
अरे VLCC चा अर्थ काय हो
अरे VLCC चा अर्थ काय हो !
कोणी माहिती देतील का हो !
गुगलवर Vandana Luthra Curls
गुगलवर Vandana Luthra Curls and Curves
डेलिया. हो मी वाचलेली तुझी
डेलिया.
हो मी वाचलेली तुझी प्रतिक्रिया. अजूनही असे(च) अनुभव येऊ द्यात असा माझ्या म्हणण्याचा अर्थ.. मी ही एकदा चौकशीला जाऊन आलोय. (वजन वाढतंय तेव्हां जीम, सायकल, बॅडमिंटन कि सकाळी पळायला जाणे हा विचार करतोय म्हणून ..)
>>मी VLCC चे काही सेशन्स
>>मी VLCC चे काही सेशन्स घेतले होते.
सेशन्स म्हणजे नक्की काय असते? बौद्धिक घेतात का व्यायाम करवून घेतात का दोन्ही?
सकाळी उठुन १० किमी पळुन या ,
सकाळी उठुन १० किमी पळुन या , कशाला डोंबलाला वजन वाढतयं

<<सेशन्स म्हणजे नक्की काय
<<सेशन्स म्हणजे नक्की काय असते? बौद्धिक घेतात का व्यायाम करवून घेतात का दोन्ही?>>
नाही , बौद्धिक किन्वा व्यायाम दोन्ही नाही. काही वायर्स अंगाला चिकटवुन व्हाय्ब्रेशन्स देतात. त्यामुळे मेटॅबोलिझम रेट वाढतो म्हणे.
आणि मसाज सेशन्स , जर तुम्ही घेत्तलेत तर. पण मसाज करणार्याचे वजन कमी होईल की करवुन घेणार्याचे ??
अरे हो , एक राहिलेच की. एक डाएटिशियन असते. ती तुम्हाला डाएट डायरी मेन्टेन करायला सांगुन डाएट चे मार्गदर्शन करते.
पण मसाज करणार्याचे वजन कमी
पण मसाज करणार्याचे वजन कमी होईल की करवुन घेणार्याचे ?? >>> ते कोण करतय ह्यावर पण अवलंबुन असेल ना ? जर एखादा सुमो पहिलवान अंगावर गदागदा नाचला तर वजनच काय आयुष्य पण कमी होईल.
श्री
श्री
मला वाटतं फक्त आपल्या
मला वाटतं फक्त आपल्या बटव्याचे वजन कमी होत असेल.
श्री
श्री
वरचे वाचुन vlcc मध्ये बटवा
वरचे वाचुन vlcc मध्ये बटवा सोडुन बाकी कसलेच वजन कमी होणार नाही हे पटले.
आणि जरी शारिरीक वजन कमी झाले तरी ते स्नायु झडल्यामुळे होईल, चरबी झडल्यामुळे नाही. त्यामुळे vlcc च्या भानगडीत न पडता सरळ योग्य आणि वेळच्यावेळी अन्न आणि सोबत पुरक व्यायाम सुरू करा. वजन नक्की कमी होईल शिवाय आरोग्यही सुधारेल. vlcc सारख्यांच्या नादी लागुन लोकांनी आपले वजन, आरोग्य, वेळ आणि पैसा सगळेच गमावलेले आहे.
सल्ल्याप्रमाणे आज पळायला जावं
सल्ल्याप्रमाणे आज पळायला जावं म्हणून काल लवकर झोपलो तर रात्री सासूला अॅडमिट करावं लागलं.. मग कसली झोप नि कसलं पळणं
नकटीच्या लग्नाला..
पळापळ झालीच असेल
पळापळ झालीच असेल की.
रच्याकने, दिवेकरचे पुस्तक जरी वाचायला मिळाले नाही तरी तिने खालिल नियम पाळायला सांगितलेत, जे आपण पाळले तर वजन कमी होते आणि आरोग्य नीट राहते -
१. रोज सुर्योदयाच्या वेळी उठायचा प्रयत्न करावा, उठल्यावर चहा/कॉफी अजिबात न पिता काहीतरी खावे - एखादे फळ, लहान लाडु किंवा इतर काही. तळलेले/मैद्याचे पदार्थ नको.
२. वरचे खाऊन झाले की तासाभराने आपला रोजचा नाश्ता पोटभरुन करावा.
३. दिवसभरात दर २-२.५ तासांनी काहीतरी खावे - चणे, शेंगदाणे, पोहे/इडली/दोसा/उपमा/सँडविच, चिज, दुध, दही, काकडी, गाजर, उकडलेले अंडे/ऑमलेट, प्रोटिन बार, नारळपाणी, लस्सी...... किंवा इतर काही जे पौष्टीक आहे. मैद्याचे पदार्थ, गोड, तळलेले सगळे टाळा - शक्य नसल्यास आठवड्यातुन एकदाच खा. खाताना फक्त तेच खा, सोबत इतर काही घेऊ नका. जसे गुलाबजाम खायचे झाल्यास वाटीत घेऊन नुसते खा, नंतर दोन तासांनी जेवा. जेवल्यानंतर स्विट डिश म्हणुन नको. दिवसभरात किती खावे हे तुम्ही दिवसभरात काय काय करणार यावर ठरवा. जास्त धावपळ असेल तर थोडे जास्त खा, आरामाचा दिवस असेल तर थोडे कमी खा.
४. रात्रीचे जेवण आणि अंथरुणात पडायची वेळ यात कमीत्कमी २ तासाचे अंतर ठेवा.
करुन पाहा. दिवसभर खाणे सुरवातीला थोडे जड जाते पण सवय झाली की काही वाटत नाही. आणि याचे वजन घटते. माझे घटले.
लहान लाडु हा शब्द सापेक्ष
लहान लाडु
हा शब्द सापेक्ष आहे असे माझे मत आहे...:)
लहान लाडु हा शब्द सापेक्ष
लहान लाडु
हा शब्द सापेक्ष आहे असे माझे मत आहे...
>>>>>

वरचे सगळेच सापेक्ष आहे...
वरचे सगळेच सापेक्ष आहे...
दर दोन तासांनी खावे म्हटलेय ते किती खावे हे सापेक्ष आहे. जर पोट
फुटेपर्यंत खाल्ले तर पुढचे १० तास इच्छा असली तरी काहीच खाता येणार नाही
वर जे पौष्टीक म्हटलेय तेही सापेक्ष आहे. काहीजणांच्या मते डायेट कोक हा अतिशय चांगला.. ते भरभक्कम १२ इंची भरपुर टॉपिंग्सचा पिझ्झा मागवतात आणि मग कॅलरीक्षालनार्थ डायेट कोक ढोसतात.
साधना अनुमोदन अगदी सुन्दर
साधना अनुमोदन अगदी सुन्दर पुस्तक आहे. माझ्याकडे आहे.
मामीजी , नुसते पुस्तक जवळ
मामीजी , नुसते पुस्तक जवळ असून वजन कमी होत नाही...
"दिवसभरात दर २-२.५ तासांनी
"दिवसभरात दर २-२.५ तासांनी काहीतरी खावे"
याचा अर्थ एकाच वेळी(५-६ तासांच्या अंतराने) भरपेट न खाता दर २-२.५ तासानी थोडे थोडे खावे.
भरत अगदी बरोबर... आपण फळे
भरत
अगदी बरोबर...
आपण फळे जेवल्यानंतर स्विट म्हणुन खातो. त्यावेळी त्यांचे डायरेक्ट साखरेत आणि पर्यायाने फॅटमध्ये रुपांतर होते. फळ सकाळी उठल्यावर उपाशीपोटी खावे असे मत पुस्तकात दिलेय. फळांचे रस टाळणेच उत्तम. त्याने आपल्याला काहीही मदत होत नाही.
Pages