Submitted by भूत on 26 November, 2010 - 02:35
आताशा फक्त हे मौन माझे वाटते |
माणसांच्या गर्दीतही एकटेसे वाटते ||
ती भेटते चोरुनि आजही चाफ्यातळी|
पण कळेना ती आता का अबोली माळते ||
शब्द सारे संपलेले एकांत हा चोहीकडे
प्रश्ण जे नजरेत, ती त्याक्षणीही टाळते ||
जो स्वर्ग होता एककाळी अन आता अस्वस्थता
" ती चुंबने " मी मागता, पाणी डोळा दाटते ||
विसरुन सारे , मांडतो मैफीली मी एकटा
आणि सच्चा मित्रापरी दु:ख मजला गाठते ||
मी तयाला मागतो मुक्तता ह्या सार्यातुनी |
मौन देतो तो इतुके , झोळी माझी फाटते ||
गुलमोहर:
शेअर करा
.
.
४, ६ वे कळले नाही
४, ६ वे कळले नाही प्रसाद..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी कडवी आवडली.
आणि काकाक नाहीए. (प्रश्ण - प्रश्न..एककाळी- एकेकाळी.)
छान!!!
छान!!!
हि चांगली कविता आहे पंत, इथून
हि चांगली कविता आहे पंत, इथून हलवा हो.
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शब्दसारे मध्ये २ वेगवेगळे
शब्दसारे मध्ये २ वेगवेगळे शब्द असल्याकारणाने मध्ये स्पेस हवी आहे.
भावासाकट कविता आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काकाक मधून हलविणे अपेक्षित आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रे....तू मौनातच रहात
छान रे....तू मौनातच रहात जा.... चांगल्या कविता लिहिशील.....
पंत, सुंदर आहे. का.का.क. मधून
पंत, सुंदर आहे. का.का.क. मधून हलव आधी.
प्रचंड आवडली.
मनातला विषण्णतेचा भाव,
मनातला विषण्णतेचा भाव, प्रत्येक ओळीतून
चांगला व्यक्त झालाय.
आताशा फक्त हे मौन माझे वाटते
आताशा फक्त हे मौन माझे वाटते |
माणसांच्या गर्दीतही एकटेसे वाटते ||
जबरदस्त आहे तुमची कविता. असेच लिहा.
छान
छान
प्रगो, काकाक मधून हलवलीत ते
प्रगो,
काकाक मधून हलवलीत ते बरे झाले...छान आहे.
लय भारी गड्या
लय भारी गड्या
अरे ए इब्लिस माणसा... काकाक
अरे ए इब्लिस माणसा...
काकाक मध्ये इतकी सुंदर कविता?
आधी हलव इथून.
शेवटच्या दोन ओळी म्हणजे खूपच भन्नाट आहेत!!
-चैतन्य
पंत, आवडली कविता.
पंत, आवडली कविता.