प्रतिक्षा

Submitted by आनंद गोवंडे on 25 November, 2010 - 03:34

मी लिहावं... असं आता उरलय काय?
तिनं वाचावं... असं वेगळं घडलय काय?
तिचा अबोला... माझी शिष्टाई...
रोजचाच मामला झालाय सारा....

दवबिंदूंचा ओलावा सोडून,
त्यांच्या लखलखाटात रमलेला मी...
ओलावा कधी विरून गेला, कळलेच नाही
कदाचित तिनेच जपून ठेवला असेल कुठेतरी
हृदयाच्या खोल कप्प्यांत
खोटं चमकणं तीला जमलं नाही,
यात तिची काय चूक म्हणा
मीच समजून घ्यायला हवं होतं...

हे जगच काजव्यांचं...
काजव्यांच्या मागे धावता धावता
चंद्र कधी नजरे आड झाला, कळलेच नाही
कदाचित असेल इथेच कुठेतरी,
तिच्या डोळ्यांत खोल खोल
मला शोधणं जमलं नाही,
यात तिची काय चूक म्हणा
मीच नीट शोधायला हवं होतं...

आता एखादी पौर्णिमा यायला हवी
निदान एखादी स्वच्छ पहाट तरी
धुकं विरघळून जायला हवं
त्याशिवाय
मी लिहीण्यांत काही अर्थ नाही
आणि काही लिहीलच तर...
ती नक्कीच वाचणार नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काही गोष्टी करायच्या राहून जातात आणि हे लक्षात येतं त्यावेळी
फार उशीर झालेला असतो. हा भाव, आशय चांगला व्यक्त झालाय.

उल्हास, शिंदे, रुणुझुणू, सुर्यकिरण .... धन्यवाद
मनु - पुढच्या वेळी अजून चांगलं काहितरी लिहायचा प्रयत्न करीन... Happy

मनु - पुढच्या वेळी अजून चांगलं काहितरी लिहायचा प्रयत्न करीन... >>> नक्की करा नाहितर पुन्हा रट्टा हानाल एखादा असाच... :ह्ह्गलो:

मनु... नक्कि प्रयत्न करीन... एरव्ही प्रयत्न करूनही तुझ्याइतका सुमार दर्जा (भाषेचा आणि एकंदरच) मला जमणार नही म्हणा... बाकी जास्त बोलणे न-लगे...