कथाकथी
मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. )
नंतर सहज विचार करत होतो की अश्या मायबोलीवरच्या कथा आठवायच्या ठरवलं तर कोणत्या कोणत्या कथा पटकन आठवतायत ? त्यांची यादी करून त्या शोधून परत वाचल्या. आता लिंका शोधल्याच आहेत तर इथे टाकतो. जेणेकरून अजून कोणाला वाचायच्या असतील तर वाचता येतील. मायबोलीवरच्या बाकीच्या कथा आवडल्या नाहीत असं अजिबात नाही.. पण ह्या अगदी लक्षात राहिल्या..
दिसामाजिं काहीतरी : http://vishesh.maayboli.com/node/95
ही कथा पहिल्यांदा वाचताना मला अगदी भिती वाटली होती. श्र ची मला वाटलेली बेस्ट !!
सांवरा रे : http://vishesh.maayboli.com/diwali-2009/659
खास शोनू टच.. अजून काय लिहिणार ?
सुखात्मे : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/546.html
ही वाचताना खूप अंगावर आली. मी अंकाच्या प्रतिक्रियेत पण लिहिलं होतं.. ह्यावर पुरुषोत्तम मध्ये छान एकांकिका बसवता येईल..
राजामणी : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118160.html?1161287924
शोनूच्या ह्या कथेची पार्श्वभूमी बाकी कथांपेक्षा एकदम वेगळी आहे ! त्यामुळे खूप लक्षात राहिली.
नीरजाची 'एका हरण्यची गोष्ट' : http://www.maayboli.com/node/21285
सह्ही आहे एकदम.. !
एक दिवस : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/597.html
संघमित्राचं साहित्य या कथेआधी फारसं वाचलं नव्हतं. छान वाटली ही एकदम !
जुन्या मायबोलीवर एक एलिझाबेथ की कोणीतरी लेखिका होती. तिने एका सायकिअॅस्ट्रीस्टबद्दल गोष्ट लिहिली होती. मला कथा पूर्ण आठवते आहे. पण नाव आठवत नाहिये आणि लिंक सापडत नाहिये. कोणाला माहीत असेल तर सांगा.
तीन पत्त्यांचा तमाशा : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/570.html
टिपीकल टण्या ! ही पण कथा खूप अंगावर आली...
पुन्हां एकदा शब्द : http://www.maayboli.com/node/17033
नंदिनीची ही कथा योग्य दिवसांमध्ये वाचली आणि आवडली..
इन्व्हाइट : http://www.maayboli.com/node/13608
द ग्रेट साजिरादा...! ह्या कथेतला दिवसातल्या काही घटना दुरुस्त करायचा फंडा खूप आवडला. खास साजिरा शैली आहेच.
ग्रुप - ३ : नांगराचा फंडा : http://www.maayboli.com/node/2697
आधीच्या ग्रुप कथानकात नांगराचा फंडा दादने मस्त गोवला आहे.
चमनची ती दोन मित्रांच्या संवादाची एक कथा होती. ती त्याच्या पाऊलखुणामध्ये सापडत नाहिये !!
आणि http://vishesh.maayboli.com/node/906 इथल्या सगळ्याच कथा एकसे एक आहेत !!! अनेकदा वाचल्या आत्तापर्यंत.
त.टी.: शोनूने ती 'वर्षाची गोष्ट' पूर्ण केली तर ती पण ह्या यादीत अॅड करायचा विचार आहे !!
-------------------------------------------------------------------------------------------------------
अगो आणि पूनमने सांगितलेल्या
नीरजाची एक होती वैदेही :
http://www.maayboli.com/node/21291
-------------------------------------------------------------------------------------------------------
फारेंडाने दिलेल्या काही लिंक्स :
दाद ची मला अत्यंत आवडलेली, "साधी माणसं"
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125611.html?1178875632
संघमित्रा ने लिहीलेल्या (पण अजून ज्याचे पुढचे भाग टाकलेले नाहीत अशा) सॉफ्टकथा
क्र.१
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119939.html?1164860791
क्र.२
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125257.html?1177725825
आणि पूनम ची होम मिनिस्टर
http://www.maayboli.com/node/5897
--------------------------------------------------------------------------------------------------
सिंडरेलाने दिलेली एक लिंक :
स्वातीची कथा 'उत्तर' : http://www.maayboli.com/node/5306
---------------------------------------------------------------------------------------------------
रैना आणि रूनी ने सुचवलेल्या काही :
कौतूकची : दे कॉल मी इ. झेड : http://www.maayboli.com/node/13598 (ह्यातच पुढच्या दोन भागांच्या लिंक आहेत)
साजिर्याची : गावशीव : http://www.maayboli.com/node/5438
अरे वा मस्तच!!!! जुन्या माबो
अरे वा मस्तच!!!!
जुन्या माबो वरच्या बर्याच कथा आता वाचता येतील.
कौतुकरावांची ...
कौतुकरावांची ... http://www.maayboli.com/node/6778
धन्यवाद नीरजा.. मी वर अपडेट
धन्यवाद नीरजा..
मी वर अपडेट केलं आहे...
बाकीच्यांनी लिंका द्या म्हणजे अपडेट करेन.
मला चिमणची वादळ पण खूप आवडली
मला चिमणची वादळ पण खूप आवडली होती. बहुदा ती सत्यघटनेवर आधारीत होती.
ती एका साधुची कथा होती,
ती एका साधुची कथा होती, त्याने जिवंत समाधी घेतलीये असे मानत असतात प्रत्यक्षात त्याने नदीच्या पात्रात आत्महत्या केलेली असते अशी काहीतरी कथा होती, कोणाची ते आणि नाव दोन्ही आठवत नाही. तेव्हा रोमात असल्याने जास्त लक्ष दिले नव्हते.. अजुन कोणाला आठवतय का?
चिंगे : ही का ग ?
चिंगे : ही का ग ?
चमनने त्याच्या कथा delete
चमनने त्याच्या कथा delete केल्या त्याबद्द्ल चमनचा निषेध!!!!
मस्त लिन्क्स मिळाल्या.
मस्त लिन्क्स मिळाल्या. धन्यवाद पराग. काही वाचलेल्या आहेत यातील.
या आणखी मला आवडलेल्या, बर्याचश्या जुन्या हितगुजवरून (आणि शोधायला एकदम कठीण)
दाद ची मला अत्यंत आवडलेली, "साधी माणसं"
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125611.html?1178875632
संघमित्रा ने लिहीलेल्या (पण अजून ज्याचे पुढचे भाग टाकलेले नाहीत अशा :P) सॉफ्टकथा
क्र.१
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119939.html?1164860791
क्र.२
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125257.html?1177725825
आणि पूनम ची होम मिनिस्टर
http://www.maayboli.com/node/5897
सगळ्यांनी दिलेल्या लिंक्स वर
सगळ्यांनी दिलेल्या लिंक्स वर अॅड केल्या आहेत.
अगो,
काहीकाही कथा वाचताना त्या कथेतल्या स्थळकाळात इतकं गुंगून जायला होतं की आसपासच्या खर्या जगाचा संपूर्णपणे विसर पडतो. >>>> ह्या कॅटेगरीत ललिताची यंदाच्या अंकातली 'सरणार कधी..' कथा आहे.. ही कथा जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा त्यात वर्णन केलेल्या गुढ शांततेत, भितीने भरलेल्या वातावरणात मी इतका गुंतलो की मधे माझा फोन वाजला तर त्या आवाजानेही दचकलो..
ललिता सिरियस लिखाण पण करते हे ही कथा वाचूनच कळलं.. ! आधी तिचं सगळं विनोदी लेखनच वाचलं होतं फक्त..
ललिताची कथा वाचून मलाही बेचैन
ललिताची कथा वाचून मलाही बेचैन वाटलं. मला वाटतं यावर्षीच्या मनोगत दिवाळी अंकातही अशाच टाईपची सिरियस कथा आहे तिची.
अरे वा! छान छान कथा वाचायला
अरे वा! छान छान कथा वाचायला मिळणार आता. धन्यवाद.
दोन तीन भुतांच्या कथा पण छान होत्या ना. पण लेखक किंवा कथांची नावे आठवत नाहीएत.
छान झाले लिन्क्स एकत्र केल्या
छान झाले लिन्क्स एकत्र केल्या ते. बर्याच कथा परत वाचाव्याशा वाटल्या. पूनम ची 'होम मिनिस्टर' ही कथा अशीच एकदम फेवरेट आहे माझी. मस्त वाटले पुन्हा वाचून.
अरे बापरे इकडे तर लोकांनी
अरे बापरे इकडे तर लोकांनी माझा निषेध वगैरे केला आहे.
रैनाने विपूत लिहिलं, रूनीही बाराबाफवर कथांबद्दल म्हणत होती, तेव्हा मला कळेचना अचानक असं काय झालं. आत्ता परागचं हे रंगीबेरंगी पान वाचल्यावर उलगडा झाला.
टाकतो टाकतो कथा पुन्हा. सगळ्या सापडतील की नाही शंकाच आहे पण जेवढ्या सापडतील तेवढ्या नक्की टाकतो.
पराग छान उपक्रम रे! मस्त !
ट्ण्याची 'कलाट' आणि
एका दिवाळी अंकातली एका खेड्यात हेलीपॅड बनवण्यासाठीच्या राजकीय गोंधळाची कथा ही भारी होती. ती बहूतेक संघमित्रा किंवा लोपामुद्राची असावी. ह्या दोन आणखी माझ्या आवडत्या.
बाकी आवडत्या वर आलेल्याच आहेत. त्यात अजून रैनाची 'जगरहाटी की काय' ही फार मोठ्या घडामोडीच्या प्रसंगांची कथा नसूनसुद्धा त्यातल्या भाषाशैलीसाठी मला आवडते.
चमन, जुन्या कथा शोधता शोधता
चमन, जुन्या कथा शोधता शोधता दुस्तरही पूर्ण कर.
श्रद्धाची ती पावसातील एका
श्रद्धाची ती पावसातील एका दिवसाची, वेगवेगळ्या गावातील घटनांची कथा होती ना? (श्रद्धाचीच होती ना?)
ती मला आवडलेली..
ट्युलिपची केशरी संध्याकाळ तर एकदम फेवरीट!
अजुनही खूप.. आठवून लिहते..
हे सही काम केलस बघ आडमा आता
हे सही काम केलस बघ आडमा
आता छान कथा वाचायला मिळतील
पूनमची ती घरातलं म्हातारं
पूनमची ती घरातलं म्हातारं माणूस आणि नवीन लग्न झालेलं जोडपं यांच्यापैकी कुणाची प्रायव्हसी महत्वाची अश्या संदर्भाची कथा होती ना ज्याच्यावर भरपूर चर्चा पण झाली होती. ती पण मला एक आवडलेली कथा.
साजिरा यांची एक पक्ष्याची कथा
साजिरा यांची एक पक्ष्याची कथा (की लेख?) होती. नाव आठवत नाहीये. तिची लिंक मिळेल का? छान होती ती.
ही ती. मलाही जबरी आवडली
ही ती. मलाही जबरी आवडली होती.
http://www.maayboli.com/node/8990
धन्स Fortyniner! आता परत
धन्स Fortyniner! आता परत वाचेन.
नीधप, तु ही कथा म्हणत आहेस
नीधप, तु ही कथा म्हणत आहेस का?
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/130906.html?1188454341
धन्स नंद्या. हीच ती कथा.
अरे वा वा! भरपूर मोठं कलेक्शन
अरे वा वा! भरपूर मोठं कलेक्शन होणारसं दिसतंय हे.. न वाचलेल्या सगळ्या आता वाचून काढणार
हा धागा माझ्या निवडक दहांत
वर पूनमने उल्लेख केलेल्या माझ्या कथेची लिंक - 'रस्ता' http://www.maayboli.com/node/12281
परागादमा - एकदम बेस्ट आयडिया
परागादमा - एकदम बेस्ट आयडिया सर जी. परिश्रम पूर्वक प्रत्यक्षात उतरवल्या बद्दल धन्यवाद.
हा तर नीरक्षीरविवेक योग जाहला.
असच कुणी तरी कविता डिस्टील करा.
चिमणची 'वादळ' कथा - भाग १ -
चिमणची 'वादळ' कथा -
भाग १ - http://www.maayboli.com/node/3079
भाग २ - http://www.maayboli.com/node/3235
कविता नवरेची मला आवडलेली -
कविता नवरेची मला आवडलेली -
'फिरुनी नवी जन्मेन मी... ' http://www.maayboli.com/node/14520
ललिची रस्ता बेस्टच
ललिची रस्ता बेस्टच होती...
कविता डिस्टिलेशन सगळ्यांना डिस्टिल्ड लिक्विडस प्राशन करून करावे लागेल
मस्त रे पराग! मी माझी आवडत्या
मस्त रे पराग! मी माझी आवडत्या कथांची लिस्ट एकदा पुपुवर टाकली होती, शिवाय काहींना मेलही केलेली. त्यातल्या बर्याच कथांची नावे इथे बघून आनंद झाला. ती लिस्ट शोधून इथे टाकतो थांब. ही बरोबर जागा आहे ती टाकायला.
-साजिरा
बेनजीर काय म्हणेल -
बेनजीर काय म्हणेल - शोनू
गोष्ट अनवाणी गेनची - रैना
क्लिक - पूनम
एक केशरी संध्याकाळ - ट्युलिप
ती लिस्ट आता सापडत नाही. पण
ती लिस्ट आता सापडत नाही. पण आठवतेय तसे लिहितो.
सांवरा रे - शोनू
सुखात्मे - स्वाती आंबोळे
दिसामाजि काहीतरी - श्रद्धा
गणित - आशूडी
क्लिक - पूनम
अ लव्ह साँग - ट्युलिप
only a genius.. - स्लार्टी
एक होती वैदेही - नीरजा
वन्ही - रैना
शब्द - नंदिनी
झूला - कौतुक शिरोडकर
चिठ्ठी - संघमित्रा
दंडोबा - टण्या
याव्यतिरिक्त आठवले तर अपडेट करेन.
शिवाय बो-विश, दाद, सिंडरेला यांचेही लिखाण आवडते. तो भूतवाला चाफ्फा कुठे गायब आहे, देव जाणे. येडा की खुळा छान विनोदी लिहायचा. तो पण गायब. आता चिमण छान विनोदी लिहितो.
मी जुन्या मायबोलीवर नव्हतो. त्यामुळे बरेच चांगले लिखाण सुटले असण्याची शक्यता आहे.
--
कथांशिवाय अवांतर - चिनूक्सच्या लेखमालेतल्या त्याच्या प्रस्तावना खूप आवडल्या होत्या. केदार आणि रॉबिनहुडाचेही लिखाण आवडते.
(याव्यतिरिक्त-झक्कींच्या पोष्टी आवडतात. त्यांनी पाणी ओतओतओतूनही त्या उथळ आणि पांचट होत नाहीत. लोक उ.पां. म्हणतात ते वेगळे. शिवाय ते स्वतःच स्वतःला उ.पां. म्हणतात तेही वेगळे. :फिदी:)
सही
सही
Pages