Submitted by मंदार शिंदे on 14 November, 2010 - 13:01
चंग आहे बांधला मी, आज सत्य शोधण्याचा
जीवनाशी आजवर माझ्या, खेळणारी तूच ना?
काळजात बसविलेली मूर्ती ती, तुझीच ना?
काळजाला घरे माझ्या, पाडणारी तूच ना?
भांडलो दुनियेशी मी, एका इशार्यावर तुझ्या
एकटा गाठून मज आतून, भांडणारी तूच ना?
मोरपिसे सजवून लावली, मुकुटावर मी तुझ्या
टोचण्या मज त्या पिसांना, धार लावली तूच ना?
विश्वास नव्हता मजवर जितका, तितका तुजवर टाकला
विश्वासाचा श्वास माझ्या, तोडणारी तूच ना?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तूच ना? या शब्दाला खूप धार
तूच ना? या शब्दाला खूप धार दिलिये इथे.
आवडली.
धन्यवाद !
धन्यवाद !
खुप छान जमली
खुप छान जमली
ह्म्म्म... चांगली जमलिये.
ह्म्म्म... चांगली जमलिये. पुलेशु
आवडली
आवडली
व्वा, मित्रा, तोडलस् !
व्वा, मित्रा, तोडलस् !
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
<< विश्वास नव्हता मजवर जितका,
<< विश्वास नव्हता मजवर जितका, तितका तुजवर टाकला
विश्वासाचा श्वास माझ्या, तोडणारी तूच ना? >>
वफा करेंगे, निभाहेंगे, बात मानेंगे......