माणूस

Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2010 - 05:13

माणूस.....

कसं विचित्र द्वंद्व चालू असते....
...आपल्या आतच ....

एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो

का शनिवारी काही देवळांसमोर लांब रांगा लागलेल्या
एका हाती ब्लॅकबेरी, दुसर्‍या हाती तेल घेतलेल्या

कुठून आलो या जगात ठाव काही लागत नाही
कुठे जाणार शेवटी ते ही ठाऊक नाही

कुणी म्हणो विज्ञानवादी कुणी म्हणो दैववादी
माणूस अखेर माणूसच .....
कळसूत्री बाहुल्यासारखा .....

दृश्य - अदृश्याच्या दोर्‍यांवर ....सदैवच लोंबकळणारा !!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा..छान !! मस्तच लिहीलंय...

मला माझा एक शेर आठवला..

नास्तिकच तरीही शनवारी
लिंबू मम दारातच आहे Happy

मस्त !

<<एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो

का शनिवारी काही देवळांसमोर लांब रांगा लागलेल्या
एका हाती ब्लॅकबेरी अन दुसर्‍या हाती तेल घेतलेल्या >>
अचूक निरीक्षण.

एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो

वा मस्त

धन्यवाद - उमेश, सूर्यकिरण,
अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

दृश्य - अदृश्याच्या दोर्‍यांवर ....सदैवच लोंबकळणारा >>>>वास्तव्य.
सुंदर काव्य.