Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2010 - 02:33
स्वप्नींचे बन
वार्यावर निवांत डोलतंय फूल
पिंपळ सळसळ घालतीयं भूल
झर्याचा नाद, पाखरांची धून
डोंगरपायथ्याशी विसावलंय ऊन
अशा या रानात
स्वप्नींच्या बनात
एकटेच उडूया ......... भूर भूर
सोडून काळज्या
झटकून चिंता
टाकून निराशा ...... दूर दूर
मनातल्या मनात
स्वप्नात तर स्वप्नात
होऊन राहू .......... चूर चूर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चांगली कविता शशांक.........
चांगली कविता शशांक......... एकच बाब खटकली... डोंगरपायथ्याशी विसावलंय ऊन
डोंगर्याच्या पायथ्याला सावली असते,किंवा उल्लेखली जाते. यास्तव डोंगरमाथ्याशी विसावलंय उन असं केल्यास चांगलं वाटेल. असो. चुभुद्याघ्या.
नमस्कार डॉक्टरसाहेब , तुमच्या
नमस्कार डॉक्टरसाहेब ,
तुमच्या टिप्पण्या नेहेमीच मार्मिक असतात. जरा काही दुरुस्ती वाटली तर मनमोकळेपणे व दुसर्याला न दुखवता तुम्ही सांगता हे ही विशेषच.
या कवितेत दिवसभर तापून सायंकाळी ऊन सावलीकरता डोंगरपायथ्याशी विसावण्याकरता आलंय अशी कल्पना मांडायचा प्रयत्न केलाय - जमलाय का - तुमच्यासारखी जाणकार मंडळीच सांगू शकतात. जमले नसले तर तसे मोकळेपणे सांगितलेत तर राग येणार नाही - उलट सुधारण्याची संधीच समजेन.
तुमच्या टिप्पण्या कधीच वरवर घेता येत नाहीत.
मा बो वर अशी चर्चा करता येते हे ही विशेषच म्हणायचे.
शशांक
दिवसभर तापून सायंकाळी ऊन
दिवसभर तापून सायंकाळी ऊन सावलीकरता डोंगरपायथ्याशी विसावण्याकरता आलंय अशी कल्पना मांडायचा प्रयत्न केलाय
ओहो.... अशी कल्पना आहे होय,.. शशांक्,मी खरंच या दृष्टीने विचार नव्हता केला. वेल... या कल्पनेशी सुसंगत आहेत तुझ्या ओळी. पुलेशु.
कल्पना समजून घेतल्याबद्दल खूप
कल्पना समजून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद डॉ. ,
चूक वाटली अथवा योग्य सुधारणा करावीशी वाटली तरी जरूर करावी. जाणकार रसिकांकडून दाद व योग्य मार्गदर्शन - दोन्ही अपेक्षित आहे.
शशांक
त्यांना डोंगरपायथ्याशी
त्यांना डोंगरपायथ्याशी विसावलंय ऊन
म्हणजे आजु-बाजुची झाडी असल्यामुळे
सावली पडली असे म्हणायचे असेल नाही
बाकी छान
छान!
छान!
धन्यवाद मुक्तेश्वर - तुमचीही
धन्यवाद मुक्तेश्वर - तुमचीही कल्पना छान व योग्य आहे.
धन्यवाद ह बा
सुंदर आशावाद.
सुंदर आशावाद.
स्वप्नं चांगलं रंगवलंय
स्वप्नं चांगलं रंगवलंय
छान्,आवडली.
छान्,आवडली.
शांत निसर्गाच्या सान्निध्यात
शांत निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन रमणं हे खरंच सुंदर स्वप्न. आवडली कविता.