Submitted by मिल्या on 9 November, 2010 - 08:24
का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते
मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते
रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते
सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?
बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते
चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?
गुलमोहर:
शेअर करा
>>शोधतो मी चांदणे केवळ
>>शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
मस्तच !
बोलणे माझे कसे कोणा
बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
=======
क्या बात है!!!
शोला हूं भडकने की गुजारिश नहीं करता
सच मुंह से निकल जाता है कोशिश नहीं करता
एकदम आवडली.
एकदम आवडली.
शोधतो मी चांदणे केवळ
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
>> वा क्या बात है!!!
मिल्या , आपण लिहीलेलि गझल नेहमीच सुंदर असते....
मिल्या छान गझल.. >>बोलणे माझे
मिल्या छान गझल..:)
>>बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
हा शेर वाचल्यावर उगीच खालचा शेर आठवला,
मेरी आहों की जबां कोई समझता कैसे
जींदगी इतनी दुखी मेरे सिवां किसकी थी
मिल्या सुंदर आहे रे. तू असे
मिल्या सुंदर आहे रे. तू असे हळवे लिहू शकतोस? आता सर्व गजला तुझ्या वाचून काढते.
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते...
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते .. <<<<
अतिशय सूंदर.. आवडली गझल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहवा.... चांगली गझल..
वाहवा.... चांगली गझल..
मतला,आणि.,
मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते
रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते
चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?
हे शेर फार आवडले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त गझल मिलींदजी!! मला अतिशय
मस्त गझल मिलींदजी!!
मला अतिशय आवडलेले शेर
सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते
चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?
छान आहे गझल.
छान आहे गझल.
मस्तच. खूप आवडली
मस्तच. खूप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
धन्यवाद मित्रांनो...
प्रतिक्रीयांबद्दल अनेक धन्यवाद
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते>>>> मस्त
आवडली!!!
आवडली!!!
मस्तच रे मिल्या
मस्तच रे मिल्या
क्या बात है! माझ्या निवडक
क्या बात है! माझ्या निवडक दहात नोंद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ अप्रतिम !!
केवळ अप्रतिम !!
चंद्र तार्यांची नको देऊ
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते
... याचा उपयोग मस्त एकदम.
शोधतो मी चांदणे केवळ
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
या ओळी खूप आवडल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिल्या सुरेखच रे. मस्त मस्त.
मिल्या सुरेखच रे. मस्त मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिल्या, सुंदर... या गझलेमधली
मिल्या,
सुंदर... या गझलेमधली सहजता खूप भावली... आवडली गझल...
मिल्या सुंदर आहे रे. तू असे हळवे लिहू शकतोस?>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(मामी रागवू नका :P)
>>मी दिवसभर कोरडा असतो तसा
>>मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते
क्या बात है!
सुंदर!!! चंद्र तार्यांची नको
सुंदर!!!
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
हे शेर विशेष आवडले.
दिवस माझा कोरडा जातो तसा, पण ...
असं म्हटलं तर?
-सतीश
नेहमीसारखीच सुरेख गझल,
नेहमीसारखीच सुरेख गझल, मिल्या.
बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
हे शेर फारच आवडले. उन्हे नेसण्याचा तर अत्युत्तम !
२, ३, ७ आणि ४,८ ९ यांत किंचित पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते का? एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगीतल्यासारखी?
सुंदर गझल मिल्या, मळभ, जास्त
सुंदर गझल मिल्या, मळभ, जास्त आवडला.
मस्त मस्त
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोलणे माझे कसे कोणा
बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते >> !!!
मिल्या, तुझ्या गझलांच्या उच्च दर्जात सातत्य राखू शकतोस त्याबद्दल विशेष अभिनंदन!
शोधतो मी चांदणे केवळ
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते>>
केवळ अप्रतिम! आशुडीला अनुमोदन.
परत एकदा सर्वांना
परत एकदा सर्वांना धन्यवाद...
क्षिप्रा - बरेच दिवसांनी... रोमात असतेस काय?
सतीश : दिवस कोरडा जाणे आणि मी दिवसभर कोरडा असणे ह्यात अर्थछटा बदलत आहे...
ज्ञानेश : चांगले निरीक्षण... एकाच अर्थछटेचे झालेत खरे काही शेर.. विशेषतः ४ आणि ९...
गाळण्याची छिद्रे अजून छोटी करायला पाहिजेत म्हणजे... repetitiveness येतोय लिखाणात![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रोज अश्रूंचा सडा परसात
रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते
हा शेर अधिक आवडला. गुणी गझल नेहमीप्रमाणे! मात्र या वेळेस किंचित जुनेपणा वाटला मांडणीत! क्षमस्व!
(अर्थात, सतत नावीन्यपूर्ण आशय व मांडणी शक्य नसतेच, चु.भु,द्या.घ्या.)
-'बेफिकीर'!
Pages