या दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का !!!

Submitted by जग्या on 8 November, 2010 - 09:09

या दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का !!!

[दिवाळीत मला सोडून "फराळ" करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणी माझ्हे हे original समर्पण.... ]

अमेरिकेत मी ऑफीस मध्ये असताना
दिवाळी ची तुझ्ही गडबड सुरु असेल
आजुबाजू ला माणसांची वर्दळ असली तरी ...
त्यात पहिल्या सारखी मज्जा नसेल .......
बघ माझ्ही आठवण येते का ........ [१]

सकाळ होईल ...भूक लागेल
"फराळ" आई स्वतःच आणेल ....
कारंजी आवडीने खाशील ग तू .......
पण तुझ्या ताटातल्या चकल्या पळवणारे कुणीच नसेल ...
बघ माझ्ही आठवण येते का ....... [२]

दुपार होईल ...बोअर होशील ...
ऑफीस चा ग्रुप CCD मध्ये जमेल ....
Profession Gossip खूप करशील ग तू ....
पण त्यात तुझ्ही "शाळा" घेणारे कुणी नसेल ........
बघ माझ्ही आठवण येते का ....... [३]

संध्याकाळ होईल ..... बाहेर जाशील
फटाके उडवायची फार इच्छा असेल
"फुलबाज्या " खूप उडवशिल ग तू ....
"सुतळी" बॉम्ब उडवून देणारे मात्र कुणी नसेल ....
बघ माझ्ही आठवण येते का ...... [४]

कंटाळा येयील ..देवाला जाशील
तीच "निळी" पैठणी अंगावर अन नाकात नथ असेल .....
"छान दिसतेस" बरेच जण सांगतील तुला ....
पण देवळा बाहेर गजरा घेऊन देणारे कुणीच नसेल "
बघ माझ्ही आठवण येते का .. [५]

"आठवण" येत असणार तुला माझ्ही नक्की
तस आपल् नात आहेच जरा निराळ
माझ्या "उचाक्यांची " झ्हाली इथे सेन्चुरी
तरीही पाठवला नाहीस तू "फराळ" Happy [६]

पत्ता माहीतच आहे तुला माझ्हा
कर मग एक पार्सल तयार
तुझ्ही "फराळ" रुपी आठवण
थोडी अमेरिकेतही हि पाठवून दे यार Lol [७]

- जगदीश
८/११/२०१०

सानी, प्रसिक - खूप खूप धन्स....
मिनी - फराळा बद्दल धन्स ...... कधी कधी अश्या कविता केल्या कि लोक शुद्धलेखनाच्या चुका काढायला विसरतात .... Lol