या दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का !!!
[दिवाळीत मला सोडून "फराळ" करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणी माझ्हे हे original समर्पण.... ]
अमेरिकेत मी ऑफीस मध्ये असताना
दिवाळी ची तुझ्ही गडबड सुरु असेल
आजुबाजू ला माणसांची वर्दळ असली तरी ...
त्यात पहिल्या सारखी मज्जा नसेल .......
बघ माझ्ही आठवण येते का ........ [१]
सकाळ होईल ...भूक लागेल
"फराळ" आई स्वतःच आणेल ....
कारंजी आवडीने खाशील ग तू .......
पण तुझ्या ताटातल्या चकल्या पळवणारे कुणीच नसेल ...
बघ माझ्ही आठवण येते का ....... [२]
दुपार होईल ...बोअर होशील ...
ऑफीस चा ग्रुप CCD मध्ये जमेल ....
Profession Gossip खूप करशील ग तू ....
पण त्यात तुझ्ही "शाळा" घेणारे कुणी नसेल ........
बघ माझ्ही आठवण येते का ....... [३]
संध्याकाळ होईल ..... बाहेर जाशील
फटाके उडवायची फार इच्छा असेल
"फुलबाज्या " खूप उडवशिल ग तू ....
"सुतळी" बॉम्ब उडवून देणारे मात्र कुणी नसेल ....
बघ माझ्ही आठवण येते का ...... [४]
कंटाळा येयील ..देवाला जाशील
तीच "निळी" पैठणी अंगावर अन नाकात नथ असेल .....
"छान दिसतेस" बरेच जण सांगतील तुला ....
पण देवळा बाहेर गजरा घेऊन देणारे कुणीच नसेल "
बघ माझ्ही आठवण येते का .. [५]
"आठवण" येत असणार तुला माझ्ही नक्की
तस आपल् नात आहेच जरा निराळ
माझ्या "उचाक्यांची " झ्हाली इथे सेन्चुरी
तरीही पाठवला नाहीस तू "फराळ" [६]
पत्ता माहीतच आहे तुला माझ्हा
कर मग एक पार्सल तयार
तुझ्ही "फराळ" रुपी आठवण
थोडी अमेरिकेतही हि पाठवून दे यार [७]
- जगदीश
८/११/२०१०
मस्त रे जग्या!!! आवडली कविता
मस्त रे जग्या!!! आवडली कविता खुप!!!!!!!!
काय राव लोकं पण, इतका फराळ
काय राव लोकं पण, इतका फराळ पाठवुनही अश्या कविता करतात.
मस्त लिहलेय,
मस्त लिहलेय,
सानी, प्रसिक - खूप खूप
सानी, प्रसिक - खूप खूप धन्स....
मिनी - फराळा बद्दल धन्स ...... कधी कधी अश्या कविता केल्या कि लोक शुद्धलेखनाच्या चुका काढायला विसरतात ....