Submitted by पाषाणभेद on 6 November, 2010 - 01:54
अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
विठ्ठल उभा विटेवरी
भक्ताचीये वाट पाही ||धृ||
पुंडलीक लावी भक्तां मार्गा
कर्म करण्या सोडी योगा
तरची पावें प्रेमे देवा
विठ्ठल पुंडलीक एकची राही ||१||
नामजप करता विठ्ठल
अवघे हरपले भान
कोण विठ्ठल कोण भक्त
दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/११/२०१०
गुलमोहर:
शेअर करा
नामजप करता विठ्ठल अवघे हरपले
नामजप करता विठ्ठल
अवघे हरपले भान
कोण विठ्ठल कोण भक्त
दोन ब्रम्ह वेगळे नाही
मस्तच रे !!!!!!!!