Submitted by मनःस्विनी on 4 November, 2010 - 03:31
सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
ह्या मी स्वनिर्मित पणत्या बनवल्या, ह्यावर टि लाईट ठेवू शकतो. ओळखा पाहु कश्या बनवल्या आहेत.
गरम टी लाईट ने नाजूक रंग जरासा हे झाला,
ह्या घरी गणपतीची उरलेल्या मातीच्या कॉइल पद्ध्तीने केलेल्या पणत्या मग रंगवून. ह्याच्या आत टि लाईट ठेवू शकतो.
गुलमोहर:
शेअर करा
पाने एकदम मस्तच दिसताहेत.
पाने एकदम मस्तच दिसताहेत. कशाची केलीत ते मला तरी सांगता येणार नाही
टी लाईट होल्डर माबोवर बरेच जागी वाचले पण म्हणजे काय मला नेमके कळले नाही. सजवलेल्या दिव्याच्या आत ठेवायचे मेणाने किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थाने भरलेले, वात असलेले भांडे काय?? नेटवर पाहिले पण नीटसे कळले नाही. तुच ह्याच्यात ते ठेऊन दाखव ना...
हे असे दिसतात, तिसर्या रो
हे असे दिसतात, तिसर्या रो मध्ये बघ ना पानांच्या पणती वर ठेवलेत.

हम्म.. म्हणजे मला वाटलेले
हम्म.. म्हणजे मला वाटलेले तसेच... तिसरा रो प्रतिसाद दिल्यानंतर उघडला इथे.
छान गं!
छान गं!
सहीच.... प्लास्टर ओफ पॅरिस
सहीच.... प्लास्टर ओफ पॅरिस आहे का?
पाने अगदि सही जमलीत.
पाने अगदि सही जमलीत.
मनस्विनी, पानं छान आहेत.
मनस्विनी, पानं छान आहेत.
सुरेख, दिसतायत पाने! कसली
सुरेख, दिसतायत पाने! कसली केलेत ते ही लिही ना.
मला तर पेपर कटिंगच वाटतायत.
मला तर पेपर कटिंगच वाटतायत.
मनःस्विनी, ती पाने म्हणजे
मनःस्विनी, ती पाने म्हणजे एल्युमिनीअम फॉईलच्या पणत्या आहेत ना?
पाने आणि त्यावरचे रंगाचे
पाने आणि त्यावरचे रंगाचे शेडींग एकदम मस्त जमले आहे. प्ले डोची केलीत का पाने?
तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
पानं मातीची केलीत, माती उरली
पानं मातीची केलीत, माती उरली होती गणपती केला तेव्हा. रंगवली मस्त. मागची बाजू कंटाळून रंगवलेली नाहीये तेव्हा कडेने दिसतेय ना माती... कंटाळा केला. आईच्या भाषेत एक काहितरी मी चांगले रंगवेल व उरलेले सोडून देतेस.(लहानपणापासूनची सवय......... ):)
रुनी , तू पण प्रेरणा आहेस इथे.. म्हणजे मातीच्या तुझ्या कला कुसरी बघून मी सुद्धा पुन्हा मातीकाम करायला लागले. लहानपणी खूप आवड होती पण मग हि आवड मागे पडली व ते कोपर्यात पडून होते. इथे तुझे बघून वाटले आपण पुन्हा हे करायला लागुया. तेव्हा तु नी मायबोलीला धन्यवाद. तुलाही दिपावली शुभेच्छा!
रंगाचे तीन कोट मारले की चकाकतात पण ह्या मातीचा प्रॉबलेम हा आहे ना, रंग खूप शोषून घेतो आणखी काही दिवसाने. शेवटच्या पणत्या(कॉइल्च्या ) रंगवायला कंटाळा केला व एकच कोट मारला...
पानाच्या कडा कातणी असते ना करंजी तीने कापल्या. आहे कि नाही गंमत..
कल्पकतेची कमाल आहे..कातणी
कल्पकतेची कमाल आहे..कातणी मुळे नाजुकता आली आहे..माती वर अक्रिलिक कलर ने पेंट केल्यास टिकुन रहातो..एक कोट केल्यावर नंतर चा टचिंग साठी करावा लागतो..शॅडिंग साठी एक साथ दोन कलर ही [कोंन्ट्रास्ट]वापरता येतील..
एकदम खरी वाटतायत.
एकदम खरी वाटतायत.:)
पानं खूप सुरेख झालीत.
पानं खूप सुरेख झालीत.
मला तर आधी खरी पानच वाटली ती
मला तर आधी खरी पानच वाटली ती मनू
पानं खूप सुंदर झालीयेत. खूप
पानं खूप सुंदर झालीयेत. खूप छान रंगवली पण आहेत, अगदी खरी वाटतायेत.
मस्तच गं मनू!!! पाने अगदी खरी
मस्तच गं मनू!!! पाने अगदी खरी दिसतायत.
धन्यवाद सर्वांना. मला वाटले
धन्यवाद सर्वांना. मला वाटले मध्ये मध्ये रंगकाम नीट नाही केलेय मी,.. सर्वात पहिल्या पानाची टोकं पातळ नाजूक होती पण तुटली सुकल्यावर इथे तिथे हलवताना...
रंगकाम करताना कापूस, ब्रश, मॅचस्टिक्स ला रंग लावून काहि काही नाजूक काम करावे लागले. टोकाचा/कडेचा काळा रंगाची छटा कापसाने, मधल्या शिरा मॅचस्टिक्सने रंगवल्या.
तुम्हाला आवडली बघून छान वाटले.
त्या पानांचे देठ कसे केलेस?
त्या पानांचे देठ कसे केलेस?
मी ह्याच प्रश्णाची वाट पहात
मी ह्याच प्रश्णाची वाट पहात होते.:)
any guess?
खरी देठं तर नाही लावलीस? तशीच
खरी देठं तर नाही लावलीस? तशीच नाजूक दिसतायत.
मनू, काय अप्रतीम रंगवलं आहेस!
मनू, काय अप्रतीम रंगवलं आहेस! खरीखुरी पानं देठांसगट चिकटवलीत असं वाटावं इतकं अफाट झालंय.
ओके. खरी देठं नाजूक असतात व
ओके. खरी देठं नाजूक असतात व ती माती धरून ठेवत न्हवती ज्या प्रकारे लावली आहेत तशी.
तो प्रयत्न करून झाला ,नुसती खरी देठं लावायचा पण माती सुकायची व देठ गळून पडायची. व उभे देठं रहातच न्हवते. मग एक आयडिया केली. ती देठ वजनदार व्हावी म्हणून गम लावून मातीत घोळली , सर्व बाजूने घोळून मग एका टोकाला extension करून खालच्या बाजूला चिकटवली. मातीला ओले पाणी लावली की गुळगुळीत दिसते व चिकततात पाण्याने. तरी ती देठं रंगवलीच नाही मध्ये मध्ये.
ह्याचे सर्व फोटो व प्रात्यक्षिक दाखवते.
रंगवताना आधी बेस कलर म्हणजे पिवळा लावून घ्यायचा. अलगद पण ओला असतानाच दुसरा गडद कलर लावायचा.
मग सुकल्याव्र आणखी एक कोट. टोकाला कापसाने छटा काढायच्या. मग असे कोट करायचे. सीलर मारायचा.