वैशाख

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सरता सरेना वैशाख
उन्ह, वाढता वाढता वाढे
वितळलेला डांबरी रस्ता
त्यावरून मृगजळ वाहे..

मृगाची फसवी चाहूल
बळिराज वरती पाहे,
फुटलेल्या कृष्ण ढगातून
लालबुंद सुर्य झळाळे..

घागरीतला चिंब वाळा
मुळामुळातून गंधाळे,
तापमानाचा चाळीस पारा
अंगणातला मोगरा उमले...

- बी

विषय: 
प्रकार: