Submitted by अ. अ. जोशी on 17 October, 2010 - 11:49
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'
भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?
आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे
क्षणाक्षणाला बदलत असते 'हो' की 'नाही'
नशीबासही कोणतेतरी बटण असावे
लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?
देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे
सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या..
थोडकेच, पण जीवनातही लवण असावे
एवढा कसा मोठा झाला इतक्यामध्ये ?
नक्की तेथे कोणते असे कुरण असावे..?
असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे
गुलमोहर:
शेअर करा
मतला,लवण्,स्मरण खूप
मतला,लवण्,स्मरण खूप आवडले.
सगळ्यात आवडलेला शेर म्हणजे,
भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
या शेरावर खूप चर्चा होवू शकते...
चांगली गझल.
एवढेच मी सांगू शकतो सरळ
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
व्वा.........
हे जर खरे आहे तर
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
मग हे वळण टाळण्याचे कारण कळले नाही. यानं माणसाच्या विचार स्वातंत्र्यावर गदा नाही कां येत???
बाकी गझल छान.....
संपूर्ण गझल अप्रतिम
संपूर्ण गझल अप्रतिम अजयजी!!!
ग्रहण, बटण आणि देवपण अत्यंत आवडले
दळण. ग्रहण, स्मरण आवडले..
दळण. ग्रहण, स्मरण आवडले..
दळण. ग्रहण, स्मरण आवडले!
दळण. ग्रहण, स्मरण आवडले!
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद!
कैलास,
विशेष धन्यवाद!
विद्यानंद,
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
मग हे वळण टाळण्याचे कारण कळले नाही. यानं माणसाच्या विचार स्वातंत्र्यावर गदा नाही कां येत???
नेमका प्रश्न कळला नाही.
देव नाकारला पण विवेक सुटला
देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे
सुरेख !
जोशीजी, भेद मोडुया आज असा की
जोशीजी,
भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
हा शेर धर्मवाद दर्शवतो............
तर,
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
या शेरातून मानवतावाद प्रकटतो.........
हा विरोधाभास जाणवल्यामुळे चर्चेत शामील झालो, प्रश्न हा कि आप्ल्याला नेमके काय म्हणायचे आहे? काय साधायचे आहे?
गणेश भुते, धन्यवाद!
गणेश भुते,
धन्यवाद!
विद्यानंदजी, प्रथम गझलबद्दल :
विद्यानंदजी,
प्रथम गझलबद्दल : गझलेत प्रत्येक शेर वेगवेगळा असून तो स्वतःचे अस्तित्व स्वतःच असतो. त्यामुळे दोन शेरांची तूलना होत नाही. दोन शेरांत वेगवेगळे अर्थ अभिप्रेत असू शकतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा विरोधाभास जरी मानला तरी गझलेत तो चालू शकतो.
दुसरे म्हणजे, माझ्यामते दोनही शेरात मानवतावादच सांगितला गेला आहे. केवळ धर्म शब्द आल्याने तो 'धर्मवाद' म्हणून वेगळा करता येणार नाही. ज्या धर्मात जन्म मिळाला त्याच धर्मात मरण असावे असे वाटेल अशा पद्धतीने एकमेकांतील भेद मोडुया - असा अर्थ आहे. त्यातून काही वेगळा अर्थ निघत असेल असे मला तरी नाही वाटत. तुम्ही म्हणता तसा अर्थ निघाला असता, जर मी असे म्हटले असते की, जिथे जन्म मिळाला तिथेच रहावे, अन्यथा ते चूक आहे... वगैरे. मी लिहिलेला शेर पुन्हा वाचावा अशी विनंती.
तिसरे म्हणजे, धर्माची नेमकी व्याख्या कोणती मानायची यावरही बरेच मतभेद आहेत. कारण उपासना पद्धती आणि धर्म यातील फरक लक्षात घेतला जात नाही.
असो.
लक्ष देऊन शेर वाचल्याबद्दल, तसेच त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद!
मनुष्य गौरव दिनाच्या सर्वांना
मनुष्य गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
दळण. ग्रहण, स्मरण
दळण. ग्रहण, स्मरण आवडले!
आणि
वळण विशेष आवडले.
सात्विक वृत्ती अधिक जरा
सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या..
थोडकेच, पण जीवनातही लवण असावे
ह्या द्विपदीने मला माझ्या जीवनातील 'लवणाची' कमतरता विशेष्त्वाने जाणवली. चांगली गजल.
गंगाधर मुटे, बाळकवी धन्यवाद!
गंगाधर मुटे, बाळकवी धन्यवाद!