मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात

Submitted by सावली on 7 October, 2010 - 19:28

नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे या धाग्यावर काही जणांनी मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन कसे आणि कधी शिकवायचे याबद्दल काही प्रश्न विचारले होते. मला सुद्धा हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे. या विषयासाठी वेगळा धागा केला तर चर्चा एकत्रीत राहिल अस वाटलं म्हणुन हा धागा चालु करतेय.

जी मुलं मराठी शाळेत जात नाहीत त्यांना
- मराठी मुळाक्षरे, बाराखडी आणी शब्द वाचन कसे शिकवावे?
- कुठल्या वयापासुन याची सुरुवात करता येईल?
- मराठी वाचनाची आवड कशी लावता येईल?
- आणि त्या पुढची पायरी म्हणजे मराठी लिहायला कसं शिकवता येईल?
याबद्दलची माहिती इथे द्याल का?
याविषयी पुस्तके, सिडी, इंटरनेट स्रोत याविषयी माहिती असेल तर तीहि लिहा.

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीकू २२ महिन्यांच्या मुलीसाठी अल्फाबेट्स / अक्षरे फार लवकर आहेत असं मला वाटतं. एवढी घाई कशाला? त्या पेक्षा तीच्याशी नुसत्याच गप्पा मारा, गोष्टी सांगा, खेळा. वेगवेगळी चित्रांची पुस्तके दाखवा. बहुतेक मुलं स्वतःच वाचनामधे इंटरेस्ट दाखवतात ३ , साडे तीन वर्षात. तेव्हा अल्फाबेट्स /अक्षरे दाखवता येतील.

रूनी आणि सावली, धन्यवाद ! आम्हालाही तेच वाटले की मराठी अक्शरे शिकवायला मुलगी अजून लहान आहे, पण या वयात तिला सर्व english alphabets म्हणता, ओळखता येतात, म्हणून विचार केला की कदाचित मराठीही शिकवता येइल. But I guess, it's best to wait. आता भारतात जाणार आहोत तेव्हा मराठी पुस्तके घेउन येउ.

वेगवेगळ्या भाषा माहिती व्हायला मी १ पर्याय काढला. लेकाला त्याच्या खेळण्यांची नावे ठेवली व शिकवली. जसे - त्याचे नाव - नाव वडीलांचे नाव आडनाव लावतो तसे खेळण्यांचेही असते असे सांगीतले व शिकवले. उदा. - हत्ती हाथी एलीफन्ट हे झाले हत्तीचे नाव. असेच प्राणी, फळे, भाज्यांची नावे मराठी, हिंदी व इंग्रजी मधील शिकवली. हो पण बर्‍याचादा मला निरुत्तर व्हावे लागले होते, कारण आपले हिंदी अगदी खुप चांगले नसते.

मराठी बाराखडी
2009 च्या शासन निर्णयानुसार मराठी बाराखडी मध्ये काही बादल झालेले आहेत मित्रांनो
आता मराठी बाराखडी एकूण 52 वर्णाची आहे.

बाराखडी आता चौदा खादी नावाने ओळखली जाते .
आपण भाषा शिकतांना ज्या मूळ वर्णाची मालिका तयार करतो त्यास वर्णमाला म्हणतात .
मराठी बाराखडी मध्ये आधी 48 वर्ण होते आता एकूण 52 वर्णाचा समावेश आता मराठी वर्णमालेत आहे
आधी एकूण 12 स्वर होते आता ते 14 स्वर झाले आहेत .
अँ ऑ हे दोन स्वर इंग्रजीतून मराठी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत .
अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए अँ ऐ ओ ऑ औ अं अः
14 स्वरांचा क्रम लिहितांना आपणास मित्रांनो “अँ” हा “ए” नंतर व “ऑ” हा “ऐ” नंतर लिहावा .
जीभ न अडवता किंवा हवेचा मार्ग न अडवता ज्या वर्णचा उच्चार केला जातो त्यास स्वर म्हणतात
ज्या वर्णचा उच्चार जीभ अडवून किंवा हवेचा मार्ग अडवून करतात त्यांना व्यंजन म्हणतात .

क ख ग घ ड
च छ ज झ त्र
ट ठ ड ढ न
त थ द ध ण
प फ ब भ म
य व र ल
श ष स


ज्या वर्णचा पाय मोळतात त्यास व्यंजन म्हणतात.
“ळ” हा स्वर द्रवेडीयन भाषेतून घेतलेला वर्ण असे सुद्धा म्हणतात
‘र” ला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात.
Marathi Barakhadi 1.jpg

काहीतरी गडबड आहे. तुम्ही १४ स्वर म्हणताय आणि १६ स्वर लिहिलेतः अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए अँ ऐ ओ ऑ औ अं अः
ह्यात अ‍ॅ - हा स्वर अनुस्वारासकट का आहे? मग ऑ वर अनुस्वार का नाही? त्या दोघांचे अनुस्वारासकट आणि विना व्हर्जन्स केले तर १८ स्वर होतील. त्यामुळे १४ स्वर म्हणण्यामागे काय तर्क आहे कळला नाही.

“ळ” हा स्वर द्रवेडीयन भाषेतून घेतलेला वर्ण असे सुद्धा म्हणतात >> अहो वैदिक संस्कृतात ळ हा वर्ण आहेच की! उदाहरणार्थ बहुतेकांना माहित असलेल्या मंत्रपुष्पांजलीमध्ये 'पृथिव्यै समुद्रपर्यंताया: एकराळिति' - या वाक्यात ळ आहे. तसंच ओम अग्निमीळे (क्षमस्व, इथे ओम नीट लिहिता येत नाही आहे) - या ऋचेमध्ये ळ आहे.

अं अ: स्वरांत मोजत नाहीत.
अ‍ॅ व रचा अनुस्वार फोनच्या कीबोर्ड मुळे आला असावा.
ही चौदाखडी मी प्रथम माधुरी पुरंदरेंच्या 'लिहावे नेटके' मध्ये पाहिली.

अं अ: स्वरांत मोजत नाहीत - संस्कृतात ते मोजत नाहीत, पण मराठीत मोजतात.

असो. तो मुद्दा ठीक आहे. पण वरती 'क ख ग घ ड' लिहिलं आहे, शिवाय 'च छ ज झ त्र'. यात ड नाही ङ पाहिजे आणि त्र ह्या जोडाक्षराऐवजी ञ पाहिजे. आजकाल बर्‍याच ठिकाणी मित्र, जत्रा, चित्र - हे शब्द मिञ, जञा, चिञ असे लिहिलेले दिसले की चिडचिड होते. त्र आणि ञ चे उच्चार वेगवेगळे आहेत हे कुणीतरी शिकवा यांना! आणि माहीत असूनही केवळ मोबाईलचा कीबोर्ड कुठलातरी भंगार वापरत असाल तर आधी तो डिलीट करून दुसरा चांगला कीबोर्ड वापरा.

आणखीन गंमत म्हणजे त्या https://www.marathigrammar.com/marathi-barakhadi/ वरती आधी चौदा स्वर वगैरे ज्ञान पाजळले आहे, शिवाय त्यात क्ष, ज्ञ ही मुळाक्षरे मानलेली नाहीत (संस्कृतात ती जोडाक्षरे आहेत हे मान्य) आणि पुढे चौदाखडीऐवजी पुन्हा बाराखडीच दिली आहे, त्यात अँ, ऑ वगैरे नाही, अं, अ: आहेत, आणि त्यात क्ष आणि ज्ञ ची पण बाराखडी आहे! म्हणजे तुम्हालाच तुमचे ज्ञान मान्य नाहिये तर. खुळ्यांचा बाजार नुसता!

गूगलवर शोधताना हा धागा सापडला. मराठी जोडाक्षरे कशी शिकवता येतील? माझ्या मुलाला मुळाक्षरे बाराखडी ओळखता येते व्यवस्थित. त्यामुळे पुढे जोडाक्षरं शिकवावी असा विचार करत होते. तसेच माझ्याकडे मराठी पुस्तके नाहीत वाचनासाठी. अजून काय करू शकते वाचनासाठी. वरील app नॉट found म्हणुन दाखवत आहे.

Pages